Realme Narzo 30 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Feb 2021 10:15:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 8GB रॅमसह लॉन्च झाला Realme चा स्वस्त आणि पावरफुल 5G फोन Narzo 30 Pro, होईल का Xiaomi ची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-launch-in-india-with-8gb-ram-5000mah-battery-sale-price-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-launch-in-india-with-8gb-ram-5000mah-battery-sale-price-flipkart/#respond Wed, 24 Feb 2021 10:15:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10150 Realme Narzo 30 Pro 5G फोनचा लुक पाहता, फ्रंटला टॉप लेफ्टवर होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच-होल मध्ये फ्रंट कॅमेरा आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी उपयोगी पडेल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 8GB रॅमसह लॉन्च झाला Realme चा स्वस्त आणि पावरफुल 5G फोन Narzo 30 Pro, होईल का Xiaomi ची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme Narzo 30 सीरीजची प्रतीक्षा आज संपली आहे. कंपनीने या सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन्स Narzo 30A आणि Narzo 30 Pro 5G लॉन्च केले आहेत. इतकेच नव्हे तर आजच्या इवेंट मध्ये कंपनी स्मार्टफोन्स व्यतिरिक्त Realme Buds Air 2 TWS आणि आपली पहिली मोशन ऍक्टिव्हेटेड नाइट लाइट पण लॉन्च केली आहे. नवीन फोन्स बद्दल बोलायचे तर हे कंपनीच्या नारजो 20 सीरीजचे अपग्रेडेड वर्जन म्हणून आले आहेत. सादर केल्या गेलेल्या दोन्ही फोन्स पैकी नराजो 30 प्रो 5G जास्त पावरफुल आहे. या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Narzo 30 Pro 5G ची माहिती देणार आहोत. (realme narzo 30 pro 5g launch in india with 8gb ram 5000mah battery sale price flipkart)

असा आहे लुक

Realme Narzo 30 Pro 5G फोनचा लुक पाहता, फ्रंटला टॉप लेफ्टवर होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच-होल मध्ये फ्रंट कॅमेरा आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी उपयोगी पडेल. होल-पंचमुळे फोनच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत. तसेच, बॉटमला थोडा चिन पार्ट दिसत आहे. स्मार्टफोन मध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागे आयताकृती ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॉटमला 3.5एमएम जॅक, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहेत. लुकच्या बाबतीत हा रियलमीच्या जुन्या फोन सारखा आहे.

5G प्रोसेसरची ताकद

या स्मार्टफोनचा सर्वात खास फीचर म्हणजे 5जी कनेक्टिविटी आहे. कंपनीने यात मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट दिला आहे. मीडियाटेक च‍ि‍पसेट मीडियाटेक 5जी अल्‍ट्रासेव टेक्‍नोलॉजीसह येतो. या चिपसेट मध्ये 2.3जीबीपीएस पर्यंत डाउनलोड स्‍पीड मिळू शकतो. इतकेच नव्हे तर हा 7एनएम प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. यात डुअल क्‍लस्‍टरसह एक ओक्‍टाकोर सीपीयू आहे, ज्यात 2.4गीगाहर्ट्ज क्‍लॉक स्‍पीडसह दोन आर्म कॉर्टेक्‍स-ए76 प्रोसेसर आहेत.

कमालीचा डिस्प्ले

रियलमी नारजो 30 प्रो 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 405पीपीआई पिक्सल डेंसिटी आहे. इतकेच नव्हे तर या डिस्प्ले मध्ये तुम्हाला 90.5% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो मिळेल.

दमदार फोटोसाठी शानदार कॅमेरा

Narzo 30 Pro 5G मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागच्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सलची मेन 6P लेंस देण्यात आली आहे. तसेच f/2.3 अपर्चरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये f/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन

पावर बॅकअपसाठी रियलमीच्या या नवीन 5G फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30W डार्ट चार्ज टेक्नोलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे कि नवीन अपडेट 30W डार्ट चार्जसह 65 मिनिटांत 5000mAh ची बॅटरी 100% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते आणि फक्त 25mins मध्ये हा फोन जवळपास 50% करता येईल.

फोन realme UI बेस्ड अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तसेच कंपनीने दावा केला आहे कि फोनमध्ये लवकरच realme UI 2.0 अपडेट दिला जाईल. कनेक्टिविटी फीचर्स पाहता फोनमध्ये 5G+5G डुअल सिम डुअल स्टॅण्डबाय, 2.4/5 GHz, 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.1 आणि GPS/AGPS/GLONSS/ GALILEO सारखे ऑप्शन आहेत.

वेरिएंट्स आणि किंमत

रियलमी नारजो 30 प्रो दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. Realme Narzo 30 Pro 5G चा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 16,999 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जो 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा पहिला सेल 4 मार्चला दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर होईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 8GB रॅमसह लॉन्च झाला Realme चा स्वस्त आणि पावरफुल 5G फोन Narzo 30 Pro, होईल का Xiaomi ची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-launch-in-india-with-8gb-ram-5000mah-battery-sale-price-flipkart/feed/ 0
24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-flipkart-sale-know-specification-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-flipkart-sale-know-specification-price/#respond Fri, 19 Feb 2021 11:59:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10095 Realme ने गुरुवारी अधिकृतपणे रियलमी नारजो 30 सीरीजची भारतीय लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A सोबतच Realme Buds Air 2 भारतात 24 फेब्रुवारीला लॉन्च केले जातील.

The post 24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गुरुवारी अधिकृतपणे रियलमी नारजो 30 सीरीजची भारतीय लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A सोबतच Realme Buds Air 2 भारतात 24 फेब्रुवारीला लॉन्च केले जातील. रियलमी नारजो 30 प्रो 5जी च्या प्रोसेसरच्या माहितीसह फोनच्या डिजाइनची माहिती पण सार्वजनिक करण्यात आली आहे. Realme Narzo 30 सीरीज अंतगर्त लॉन्च होणारे हे दोन स्मार्टफोन अनेक दिवसांपासून ऑनलाइन लीक्सवर पण समोर आले होते. यांनी लीक आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर आम्ही Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A च्या सर्व स्पेसिफिकेशनची माहिती पुढे दिली आहे. (realme narzo 30 pro series india launch flipkart sale know specification price)

असा असेल लुक

डिजाइन पाहता टीजर पेजमध्ये दिसले होते कि रियलमी नारजो 30 प्रो 5जी फोन मध्ये सेल्फीसाठी होल-पंच डिस्प्ले दिला जाईल. फोन मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आयताकृती असेल. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी ग्रेडिएंट फिनिशसह येईल. बोलले जात आहे कि लुकच्याबाबतीत नारजो 30 प्रो सारखाच नारजो 30ए असेल. रियलमी नारजो 30 प्रो मध्ये बाजूला तर रियलमी नारजो 30ए मध्ये मागे फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 सीरीज भारतात होईल 4 मार्चला लॉन्च, दमदार फीचर्ससह Realme ला देईल आव्हान

सेल आणि किंमत

ई-कॉमर्स साइट Flipkart वर दोन्ही स्मार्टफोनसाठी टीजर पेज लाइव करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनीच्या साइटव्यतिरिक्त दोन्ही फोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. किंमतीबद्दल अजूनतरी कोणताही लीक समोर आला नाही. पण, बोलले जात आहे कि फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आत असले.

Realme Narzo 30 Pro 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

टिप्स्टर मुकुल शर्माने रियलमी नारजो 30 प्रो 5G आणि रियलमी नारजो 30ए चे काही स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. Narzo 30 Pro 5G संबंधीत लीकमधून माहिती मिळाली आहे कि फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाईल. तसेच हँडसेटमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो जो 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरसह येईल. रियलमी नारजो 30 प्रो 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असू शकते जी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनमध्ये डॉल्बी ऍटमॉस आणि हाय-रिजोलूशन ऑडियो मिळू शकतो. नारजो 30 प्रो 5G मध्ये डिस्प्लेवर उजवीकडे एक होल-पंच कटआउट पण दिला जाईल.

हे देखील वाचा : रियलमीचा पावरफुल फोन Realme GT 5G स्मार्टफोन 4 मार्चला होईल लॉन्च, कंपनीने केला खुलासा

तसेच एका टेक वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत realme चे CEO Madhav Sheth यांनी माहिती दिली आहे कि Narzo 30 सीरीजचा एक फोन MediaTek Dimensity 800U सह येईल जो रियलमी 30 प्रो असेल.

Realme Narzo 30A चे लीक स्पेसिफिकेशन्स

रियलमी नारजो 30ए स्मार्टफोनबद्दल लीक मध्ये सांगण्यात आले होते कि फोनमध्ये वाटरड्रॉप-स्टाइल नॉच असलेला 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर असू शकतो. त्याचबरोबर फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो आणि यात 13 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेऱ्यासह 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाईल.

पावर बॅकअपसाठी हँडसेटमध्ये 6000mAh बॅटरी असू शकते जी 18वाट फास्ट-चार्जिंग सपोर्टसह येईल. फोन ब्लॅक आणि लाइट ब्लू कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. याबाबत कोणतीही माहिती ऑफिशियल करण्यात आली नाही त्यामुळे हा फक्त एक लीक म्हणता येईल.

The post 24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-flipkart-sale-know-specification-price/feed/ 0
Realme Narzo 30 Pro वेबसाइटवर झाला लिस्ट, Realme Narzo 30 सोबत लवकरच होईल लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-listed-on-tenaa-4880mah-battery-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-listed-on-tenaa-4880mah-battery-specs-leaked/#respond Thu, 11 Feb 2021 12:26:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10002 Realme Narzo 30 Pro चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर स्पाॅट केला गेला आहे. चायनीज वेबसाइटच्या हवाल्याने जीएसएम एरिनाने बातमी दिली आहे त्यावरून समजले आहे कि रियलमी नारजो 30 प्रो टेनावर RMX3161 मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे.

The post Realme Narzo 30 Pro वेबसाइटवर झाला लिस्ट, Realme Narzo 30 सोबत लवकरच होईल लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme संबंधित माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती ज्यात समजले होते कि हि टेक कंपनी आपल्या ‘नारजो’ सीरीजच्या विस्ताराची योजना बनवत आहे त्याअंतर्गत Realme Narzo 30 लाॅन्च केला जाईल. रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर रियलमी नारजो 30 च्या रिटेल बाॅक्सचे फोटोज पण शेयर करण्यात आले होते. आता अजून एक मोठी बातमी समोर येत आहे त्यानुसार या सीरीजचा Realme Narzo 30 Pro स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट केला गेला आहे.

Realme Narzo 30 Pro चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर स्पाॅट केला गेला आहे. चायनीज वेबसाइटच्या हवाल्याने जीएसएम एरिनाने बातमी दिली आहे त्यावरून समजले आहे कि रियलमी नारजो 30 प्रो टेनावर RMX3161 मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो समोर आल्यामुळे नारजो 30 प्रो च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे तसेच हा या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

असा असेल लुक

टेनावर समोर आलेल्या फोटोज मध्ये कथित रियलमी नारजो 30 प्रो पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर बनलेला दाखवण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा असलेला हा पंच-होल स्क्रीनच्या वर डावीकडे देण्यात आला आहे. फोटो मध्ये डिस्प्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्ससह दिसत आहेत. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे बनलेल्या चौकोनी आकारात आहे. फोनच्या डाव्या पॅनलवर वाल्यूम राॅकर देण्यात आहे तर उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 30 Pro म्हणजे RMX3161 टेनानुसार 6.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोनचे डायमेंशन 162.5 x 74.8 x 8.8एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 सह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे ज्या अंतर्गत फोन मध्ये रियलमी युआय देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,880एमएएचची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे. Realme Narzo 30 Pro मध्ये प्रोसेसर कोणता दिला जाईल, याची माहिती समजली नाही पण सर्टिफिकेशन्स मध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे कि रियलमीचा हा फोन एक 5G स्मार्टफोन असेल.

Realme Narzo 30

अलीकडेच रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर रियलमी नारजो 30 फोनच्या 6 रिटेल बॉक्सचे फोटोज शेयर केले गेले होते. हि पोस्ट शेयर करून फॅन्सकडून अभिप्राय मागवण्यात आला होता कि यातील कोणता बाॅक्स त्यांना सर्वात चांगला वाटला आहे. म्हणजे यातील तो बॉक्स फाइनल होईल आणि बाजारात येईल. विशेष म्हणजे रियलमी एक्स7 सीरीजच्या लॉन्चच्या आधी पण कंपनीने अश्याच रिटेल बॉक्सेजचा फोटो शेयर करून फॅन्सकडे अभिप्राय मागितला होता. आता नारजो 30 सीरीजच्या लॉन्च बद्दल कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Realme Narzo 30 Pro वेबसाइटवर झाला लिस्ट, Realme Narzo 30 सोबत लवकरच होईल लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-listed-on-tenaa-4880mah-battery-specs-leaked/feed/ 0
Realme करणार आहे नारजो सीरीजचा विस्तार, पुढल्या महिन्यात लाॅन्च होतील Realme Narzo 30 आणि Narzo 30 Pro https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-might-launch-in-january-2021/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-might-launch-in-january-2021/#respond Thu, 10 Dec 2020 14:24:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9259 लीक मध्ये या सीरीज मध्ये लाॅन्च होणाऱ्या दोन स्मार्टफोनची नावे सांगितली आहेत जे बाजारात Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro नावाने येतील.

The post Realme करणार आहे नारजो सीरीजचा विस्तार, पुढल्या महिन्यात लाॅन्च होतील Realme Narzo 30 आणि Narzo 30 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘नारजो सीरीज’ चा विस्तार केला होता. कंपनीने एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 20A चा समावेश होता. कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन्स भारतीयांना आवडले होते. तसेच आता बातमी येत आहे कि रियलमी पुन्हा आपल्या नारजो सीरीजची नेक्स्ट जेनरेशन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. माहिती समोर आली आहे कि पुढल्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2021 मध्ये कंपनीने Realme Narzo 30 सीरीज लाॅन्च केली जाणार आहे.

Realme Narzo 30 सीरीजची माहिती एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टर स्टफलिस्टिंग्सचा हवाला देत वेबसाइटने सांगितले आहे कि रियलमी कंपनी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये आपल्या नारजो सीरीजचा नेक्स्ट जेनरेशन सादर करणार आहे. लीक मध्ये या सीरीज मध्ये लाॅन्च होणाऱ्या दोन स्मार्टफोनची नावे सांगितली आहेत जे बाजारात Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro नावाने येतील. बातमी मध्ये स्पष्ट झाले नाही कि नारजो 30 सीरीज मध्ये दोन्ही फोन लाॅन्च होतील कि कंपनी अजून काही फोन पण यात जोडेल. सीरीजच्या लाॅन्चसाठी आता कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

Realme Narzo 20 सीरीज

Realme Narzo 20 चा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 10,499 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जो 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. Realme Narzo 20A चा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 8,499 रुपये आणि 9,499 रुपये आहे. हे दोन्ही फोन Glory Silver आणि Victory Blue कलर मध्ये लॉन्च झाले आहेत.

Realme Narzo 20 बद्दल बोलायचे तर हा फोन पण दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन White Knight आणि Black Ninja कलर मध्ये विकत घेता येईल.

The post Realme करणार आहे नारजो सीरीजचा विस्तार, पुढल्या महिन्यात लाॅन्च होतील Realme Narzo 30 आणि Narzo 30 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-might-launch-in-january-2021/feed/ 0