Realme Smart TV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 28 May 2020 12:04:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme नंतर आता येत आहे Nokia Smart TV, बघा या 43 इंचाच्या टीव्ही मध्ये काय खास आहे, 4 जूनला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-43-inch-launch-in-india-on-4-june-specs-details-sale-price-offer/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-43-inch-launch-in-india-on-4-june-specs-details-sale-price-offer/#respond Thu, 28 May 2020 12:04:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7125 Nokia ने आपल्या Smart TV साठी JBL शी हातमिळवणी केली आहे. उपलब्द असलेल्या Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात.

The post Realme नंतर आता येत आहे Nokia Smart TV, बघा या 43 इंचाच्या टीव्ही मध्ये काय खास आहे, 4 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने स्मार्टफोन बाजारात सफलता यश मिळवल्यानंतर आता स्मार्ट टीव्हीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने भारतात ब्रँडचा पहिला Smart TV लॉन्च केला आहे जो दोन मॉडेल्स मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. रियलमी नंतर आता Nokia पण भारतात आपला नवीन स्मार्टटीव्ही घेऊन येत आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 4 जूनला भारतात Nokia Smart TV पण लॉन्च केला जाईल.

Nokia Smart TV बद्दल ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने सांगितले आहे कि कंपनी येत्या 4 जूनला भारतात आपला नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च करेल. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टटीव्ही 43 इंचाच्या डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला जाईल. डिसेंबर मध्ये लॉन्च झालेल्या 55 इंचाच्या टीव्ही प्रमाणे हा नवीन नोकिया स्मार्टटीव्ही पण कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 43 इंचाचा Nokia Smart TV भारतीय बाजारात 31,000 ते 34,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Realme Smart TV चा 43 इंचाचा मॉडेल 21,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. त्यामुळे किंमतीतला फरक पाहता असे म्हणता येईल कि नोकिया आपल्या स्मार्ट टीव्ही मध्ये अनेक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व आधुनिक प्रीमियम फीचर्स देऊ शकते.

शानदार साउंड क्वॉलिटी

Nokia ने आपल्या Smart TV साठी JBL शी हातमिळवणी केली आहे. उपलब्द असलेल्या Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात. Nokia Smart TV आवाजाच्या बाबतीत खूप खास आहे. या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशनचा शानदार अनुभव मिळेल तसेच हा नोकिया स्मार्टटीव्ही 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करतो. नवीन 43 इंचाच्या नोकिया टीव्ही मध्ये पण हेच फीचर्स मिळू शकतात.

Nokia Smart TV

बाजारात उपलब्ध असलेल्या Nokia Smart TV बद्दल बोलायचे तर हा 55 इंचाच्या 4K UHD LED डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हा डिस्प्ले खूप चांगल्या रंगांसोबत इंटेलिजेंट डीमिंगचा अनुभव देतो. कंपनीने हा टेलीविजन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो बिल्ट इन क्रोमकॉस्ट सह चालतो.

नोकियाच्या या स्मार्टटीव्ही मध्ये मोबाईल प्रमाणे डेटा सेविंग मोड पण आहे. यूजरच्या सहज वापरासाठी कंपनीने Nokia Smart TV मध्ये गूगल असिस्टेंट दिला आहे. Nokia Smart TV मध्ये Netflix आणि YouTube साठी शार्टकट बटण देण्यात आले आहेत. हा टेलीविजन 2.25जीबी रॅमला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंगसाठी Nokia TV मध्ये PureX क्वॉड-कोर प्रोसेसर आहे.

The post Realme नंतर आता येत आहे Nokia Smart TV, बघा या 43 इंचाच्या टीव्ही मध्ये काय खास आहे, 4 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-43-inch-launch-in-india-on-4-june-specs-details-sale-price-offer/feed/ 0
Realme Smart TV इंडियन साइट वर झाली लिस्ट, लवकरच येईल बाजारात आणि Xiaomi Mi TV ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-43-inch-display-listed-on-bis-jsc55lsqled-specs-price-launching-soon-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-43-inch-display-listed-on-bis-jsc55lsqled-specs-price-launching-soon-india/#respond Mon, 06 Apr 2020 12:47:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7003 Realme Smart TV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्सच्या दृष्टीने टीवी मध्ये कंटेंट पण मिळेल.

The post Realme Smart TV इंडियन साइट वर झाली लिस्ट, लवकरच येईल बाजारात आणि Xiaomi Mi TV ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आधीच सांगितले आहे कि कंपनी स्मार्टफोन बाजारात नाव कमवल्यानंतर आता स्मार्ट गॅजेट्स आणि टेलीविजन बाजारात पण पाऊल टाकणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने घोषणा केली होती कि कंपनी आपल्या स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि कंपनी जगात सर्वात आधी Realme Smart TV भारतात लॉन्च करेल. तर आता Realme TV संबंधित एक मोठा लीक समोर आला आहे ज्यात समजले आहे कि ब्रँडचा हा आगामी स्मार्ट टेलीविजन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट पण करण्यात आला आहे आणि या टीव्हीच्या डिस्प्ले साईजचा पण खुलासा झाला आहे.

Realme Smart TV BIS म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर लिस्ट केली गेली आहे आणि या लिस्टिंगची माहिती प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मा यांच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर या लिस्टिंगचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे ज्यावरून समजले आहे कि रियलमी टीव्ही बीआईएस वर JSC55LSQLED मॉडेल नंबर सह लिस्ट केली गेली आहे. या लिस्टिंग मध्ये टीव्हीच्या स्क्रीनची पण माहिती मिळाली आहे. इथे Realme TV 43 इंचाच्या पॅनल सह लिस्ट आहे. आशा आहे कि रियलमी टीव्हीचा बेस मॉडेल 43 इंचाचा असेल आणि कंपनी या साईज पेक्षा मोठे डिस्प्ले असलेले मॉडेल्स पण बाजारात आणेल.

रियलमीने आधीच सांगितले आहे कि कंपनी भारतात आपली स्मार्टटीवी पण लॉन्च करेल. Realme ब्रँडच्या पहिल्या स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि हि स्मार्ट टीवी यावर्षी दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. Realme TV बाबत माधव म्हणाले कि जगात पहिल्यांदा भारतातच लॉन्च होईल आणि भारतीय यूजर्सना केंद्रस्थानी ठेऊन रियलमी टीवी मध्ये खास कस्टमाइजेशन केले जात आहे. Realme Smart TV एप्रिल पासून जून दरम्यान भारतात लॉन्च होईल. आशा आहे कि Realme Smart TV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्सच्या दृष्टीने टीवी मध्ये कंटेंट पण मिळेल.

Realme Watch

Realme Watch ची माहिती स्वतः रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी दिली आहे. माधव सेठ यांनी फक्त हे बाब स्पष्ट केली तर कंपनी लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे त्याचबरोबर माधव यांनी या Smart Watch चा लुक पण शेयर केला आहे. कालच म्हणजे 25 मार्चला झालेल्या आस्क माधवच्या सेशन मध्ये माधव सेठ यांनी इंटरव्यू मध्ये रियलमी की स्मार्ट वॉच हातात घातला होता. स्मार्ट वॉच मनगटावर बांधून माधव सेठ यांनी आगामी रियलमी वॉचचा लुक समोर ठेवला आहे.

रियलमी स्मार्टवॉच चौकोनी आकाराच्या डॉयलचा आहे. वीडियो मध्ये माधव यांनी ब्लॅक कलरचा स्मार्टवॉच परिधान केला होता. माधव यांनी आगामी Realme SmartWatch ची माहिती दिली नाही पण स्पष्ट केले आहे कि कंपनी या स्मार्टवॉचच्या कमला लागली आहे आणि येत्या काही दिवसांत लवकरच हा इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या सेशन मध्ये माधव सेठ यांनी Realme 6 Pro स्मार्टफोनचा पर्पल कलर वेरिएंट पण लॉन्च होणार असल्याची माहिती दिली आहे.

Realme Band

रियलमीने अलीकडेच भारतात पहिला फिटनेस ट्रॅकर Realme Band लॉन्च केला होता. याची किंमत 1499 रुपये ठ्वली होती. हा डिवाइस 24 तास हेल्थ असिस्टेंटच्या रूपात काम करतो. यात हार्ट रेट मॉनिटर, आइडल अलर्ट आणि वॉटर ड्रिंक रिमाइंडर सारखे फीचर्स मिळतात. कंपनीचा दावा आहे कि जास्त चांगल्या परिणामांसाठी याचा हार्ट रेट मॉनिटर खासकरून भारतीयांच्या दृष्टीने बनवला गेला आहे.

The post Realme Smart TV इंडियन साइट वर झाली लिस्ट, लवकरच येईल बाजारात आणि Xiaomi Mi TV ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-43-inch-display-listed-on-bis-jsc55lsqled-specs-price-launching-soon-india/feed/ 0