Realme नंतर आता येत आहे Nokia Smart TV, बघा या 43 इंचाच्या टीव्ही मध्ये काय खास आहे, 4 जूनला होईल लॉन्च

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

Realme ने स्मार्टफोन बाजारात सफलता यश मिळवल्यानंतर आता स्मार्ट टीव्हीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने भारतात ब्रँडचा पहिला Smart TV लॉन्च केला आहे जो दोन मॉडेल्स मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. रियलमी नंतर आता Nokia पण भारतात आपला नवीन स्मार्टटीव्ही घेऊन येत आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 4 जूनला भारतात Nokia Smart TV पण लॉन्च केला जाईल.

Nokia Smart TV बद्दल ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने सांगितले आहे कि कंपनी येत्या 4 जूनला भारतात आपला नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च करेल. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टटीव्ही 43 इंचाच्या डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला जाईल. डिसेंबर मध्ये लॉन्च झालेल्या 55 इंचाच्या टीव्ही प्रमाणे हा नवीन नोकिया स्मार्टटीव्ही पण कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 43 इंचाचा Nokia Smart TV भारतीय बाजारात 31,000 ते 34,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Realme Smart TV चा 43 इंचाचा मॉडेल 21,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. त्यामुळे किंमतीतला फरक पाहता असे म्हणता येईल कि नोकिया आपल्या स्मार्ट टीव्ही मध्ये अनेक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व आधुनिक प्रीमियम फीचर्स देऊ शकते.

शानदार साउंड क्वॉलिटी

Nokia ने आपल्या Smart TV साठी JBL शी हातमिळवणी केली आहे. उपलब्द असलेल्या Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात. Nokia Smart TV आवाजाच्या बाबतीत खूप खास आहे. या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशनचा शानदार अनुभव मिळेल तसेच हा नोकिया स्मार्टटीव्ही 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करतो. नवीन 43 इंचाच्या नोकिया टीव्ही मध्ये पण हेच फीचर्स मिळू शकतात.

Nokia Smart TV

बाजारात उपलब्ध असलेल्या Nokia Smart TV बद्दल बोलायचे तर हा 55 इंचाच्या 4K UHD LED डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हा डिस्प्ले खूप चांगल्या रंगांसोबत इंटेलिजेंट डीमिंगचा अनुभव देतो. कंपनीने हा टेलीविजन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो बिल्ट इन क्रोमकॉस्ट सह चालतो.

नोकियाच्या या स्मार्टटीव्ही मध्ये मोबाईल प्रमाणे डेटा सेविंग मोड पण आहे. यूजरच्या सहज वापरासाठी कंपनीने Nokia Smart TV मध्ये गूगल असिस्टेंट दिला आहे. Nokia Smart TV मध्ये Netflix आणि YouTube साठी शार्टकट बटण देण्यात आले आहेत. हा टेलीविजन 2.25जीबी रॅमला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंगसाठी Nokia TV मध्ये PureX क्वॉड-कोर प्रोसेसर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here