Realme X3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 Jun 2020 13:33:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X3 SuperZoom लवकरच होईल भारतात लॉन्च, कंपनीने केला शिक्कामोर्तब https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-to-be-launched-in-india-soon-come-with-60x-zoom-power/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-to-be-launched-in-india-soon-come-with-60x-zoom-power/#respond Fri, 08 May 2020 13:23:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7298 Realme X3 सीरीज गेल्या वर्षी सादर केल्या गेलेल्या Realme X2 ची अपग्रेड म्हणून सादर केली जाईल.

The post Realme X3 SuperZoom लवकरच होईल भारतात लॉन्च, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme X3 SuperZoom च्या इंडिया लॉन्च बद्दल कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे. रियलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ यांनी एक ट्विट करून यावर शिक्कामोर्तब केला आहे. Realme India च्या CEO नी Realme X3 SuperZoom मधून शूट केलेल्या आकाशातील ताऱ्यांच्या एका फोटो सह एक ट्वीट पोस्ट केले आहे. ट्वीट मध्ये असे पण समोर आले आहे कि स्मार्टफोन 60x झूम आणि ‘Starry Mode’ फीचर सह येईल. पण अजूनही लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आशा आहे कि Realme X3 SuperZoom लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. तसेच या डिवाइसच्या आधी कंपनी 11 मे ला भारतात आपली नवीन Narzo 10 सीरीज सादर करणार आहे. या सीरीज मध्ये नारजो 10 आणि नारजो 10A सादर केला जाईल.

https://www.91mobiles.com/hi/realme-narzo-10a-price-in-india

Realme X3 सीरीज गेल्या वर्षी सादर केल्या गेलेल्या Realme X2 ची अपग्रेड म्हणून सादर केली जाईल. कंपनीने Realme X3 SuperZoom 60X च्या लॉन्चची माहिती दिली आहे. पण आम्हाला अशा आहे कि या सीरीज मध्ये Realme X3 पण सादर केला जाईल.

काही दिवसांपूर्वी टिप्सटर सुधांशू अंभोरने ट्वीट करून सांगितले होते कि Realme X3 SuperZoom मध्ये 30 वॉट फास्ट चार्जिंग सह 4,200 एमएएच ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर पण दिला जाऊ शकतो.

तसेच कंपनी या स्मार्टफोन मध्ये 6.57 इंचाचा एमोलेड डिस्प्ले पण देऊ शकते. तर दुसरीकडे या फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेंसर आणि 2-2 मेगापिक्सल सेंसर असतील. तसेच फ्रंटला 16 आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. टिप्सटर नुसार स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच हा स्मार्टफोन अनेक कलर वेरिएंट मध्ये सादर केला जाईल.

इतर लीक्स पाहता Realme X3 SuperZoom ब्रँडचा हाईएंड डिवाईस असल्याचे सांगण्यात आले आहे जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला जाईल. लीक नुसार हा फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वर लॉन्च होईल. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गीकबेंच वर पण हा फोन 12 जीबी रॅम सह दाखवण्यात आला होता. लीकनुसार हा फोन एंडरॉयड 10 आधारित असेल जो रियलमी यूआई वर चालेल.

The post Realme X3 SuperZoom लवकरच होईल भारतात लॉन्च, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-to-be-launched-in-india-soon-come-with-60x-zoom-power/feed/ 0
Realme 5G स्मार्टफोन दिसला अनेक सर्टिफिकेशन साइटस वर, लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/new-realme-5g-smartphone-with-30w-fast-charging-support-gets-3c-certification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/new-realme-5g-smartphone-with-30w-fast-charging-support-gets-3c-certification-launch-soon/#respond Mon, 13 Apr 2020 14:03:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7068 मॉडेल नंबर वरून वाटते कि फोन Realme X3 असू शकतो, जो नुकताच थाईलँडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर दिसला होता.

The post Realme 5G स्मार्टफोन दिसला अनेक सर्टिफिकेशन साइटस वर, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी Realme वेगाने आपल्या मोबाईल फोन्सचा पोर्टफोलियो वाढवत आहे. हि यादी वाढवत आता Realme आपला नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करू शकते जो अनेक सर्टिफिकेशन साइट वर मॉडेल नंबर RMX2142 सह दिसला आहे. लिस्टिंग मध्ये माहिती समोर आली आहे कि फोन 5G आहे आणि यात फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

मॉडेल नंबर वरून वाटते कि फोन Realme X3 असू शकतो, जो नुकताच थाईलँडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर दिसला होता. मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन Realme X3 SuperZoom Edition नावाने बाजारात येईल.

MySmartPrice च्या रिपोर्टनुसार Realme स्मार्टफोन मॉडेल नंबर RMX2142 सह चाइनीज सर्टिफिकेशन साइट 3C सह MIIT सर्टिफिकेशन वेबसाइट वर दिसला आहे. दोन्ही लिस्टिंग मध्ये मॉडेल नंबर RMX2142 5G सपोर्ट सह दिसला आहे. तसेच 3C लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. MIIT सर्टिफिकेशन वर याची माहिती देण्यात आलेली नाही.

वर सांगितल्याप्रमाणे या मॉडेल नंबर सह स्मार्टफोन थाईलँडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर दिसला होता. वेबसाइट वर हा फोन RMX2086 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता आणि मीडिया रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन Realme X3 SuperZoom Edition नावाने बाजारात येईल. नावावरून समजते कि हा फोन रियलमी एक्स2 चा अपग्रेडेड वर्जन असेल आणि चांगल्या झूम क्वॉलिटी लेंस सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीक्सनुसार Realme X3 SuperZoom Edition कंपनीचा पावरफुल स्मार्टफोन तर असेल पण रियलमी हा फोन 5जी फोन म्हणून लॉन्च करणार नाही. हा फोन एक 4जी फोनच असेल जो दमदार स्पेसिफिकेशन्स सह येईल. चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचच्या आधारावर सांगण्यात आले आहे कि हा रियलमी एक्स3 फोन को12 जीबी रॅम वर लॉन्च केला जाऊ शकतो. गीकबेंच वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे तसेच सिंगल-कोर मध्ये या फोनला 788 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये या फोनला 2624 स्कोर मिळाला आहे.

The post Realme 5G स्मार्टफोन दिसला अनेक सर्टिफिकेशन साइटस वर, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-realme-5g-smartphone-with-30w-fast-charging-support-gets-3c-certification-launch-soon/feed/ 0