Realme 5G स्मार्टफोन दिसला अनेक सर्टिफिकेशन साइटस वर, लवकरच होऊ शकतो लॉन्च

चिनी स्मार्टफोन कंपनी Realme वेगाने आपल्या मोबाईल फोन्सचा पोर्टफोलियो वाढवत आहे. हि यादी वाढवत आता Realme आपला नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करू शकते जो अनेक सर्टिफिकेशन साइट वर मॉडेल नंबर RMX2142 सह दिसला आहे. लिस्टिंग मध्ये माहिती समोर आली आहे कि फोन 5G आहे आणि यात फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

मॉडेल नंबर वरून वाटते कि फोन Realme X3 असू शकतो, जो नुकताच थाईलँडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर दिसला होता. मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन Realme X3 SuperZoom Edition नावाने बाजारात येईल.

MySmartPrice च्या रिपोर्टनुसार Realme स्मार्टफोन मॉडेल नंबर RMX2142 सह चाइनीज सर्टिफिकेशन साइट 3C सह MIIT सर्टिफिकेशन वेबसाइट वर दिसला आहे. दोन्ही लिस्टिंग मध्ये मॉडेल नंबर RMX2142 5G सपोर्ट सह दिसला आहे. तसेच 3C लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. MIIT सर्टिफिकेशन वर याची माहिती देण्यात आलेली नाही.

वर सांगितल्याप्रमाणे या मॉडेल नंबर सह स्मार्टफोन थाईलँडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर दिसला होता. वेबसाइट वर हा फोन RMX2086 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता आणि मीडिया रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन Realme X3 SuperZoom Edition नावाने बाजारात येईल. नावावरून समजते कि हा फोन रियलमी एक्स2 चा अपग्रेडेड वर्जन असेल आणि चांगल्या झूम क्वॉलिटी लेंस सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीक्सनुसार Realme X3 SuperZoom Edition कंपनीचा पावरफुल स्मार्टफोन तर असेल पण रियलमी हा फोन 5जी फोन म्हणून लॉन्च करणार नाही. हा फोन एक 4जी फोनच असेल जो दमदार स्पेसिफिकेशन्स सह येईल. चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचच्या आधारावर सांगण्यात आले आहे कि हा रियलमी एक्स3 फोन को12 जीबी रॅम वर लॉन्च केला जाऊ शकतो. गीकबेंच वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे तसेच सिंगल-कोर मध्ये या फोनला 788 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये या फोनला 2624 स्कोर मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here