Realme X50 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Jan 2020 12:13:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme चा पहिला 5G फोन लॉन्च, यात आहे डुअल पंच-होल डिस्प्ले, 12GB RAM आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-phone-officialy-launched-sa-nsa-dual-mode-specification-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-phone-officialy-launched-sa-nsa-dual-mode-specification-price/#respond Tue, 07 Jan 2020 12:13:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6210 या फोनची एक मोठी खासियत अशी आहे कि Realme X50 ब्रँडचा पहिला डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन पण आहे.

The post Realme चा पहिला 5G फोन लॉन्च, यात आहे डुअल पंच-होल डिस्प्ले, 12GB RAM आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ब्रँडचे नाव त्या टेक कंपन्यांमध्ये येते ज्यांनी कमी काळात प्रसिद्धी मिळवली आहे. भारतात रियलमीची फॅन फॉलोइंग वेगाने वाढत आहे. Realme त्याच वेगाने आपली टेक्नॉलॉजी बदलत आहे आणि प्रोडक्ट्स एडवांस बनवत आहे. अलीकडेच भारतात Realme X2 Pro स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर आज कंपनीने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला पहिला 5G स्मार्टफोन पण सादर केला आहे. कंपनीने Realme X50 च्या रूपाने आपला पहिला 5जी फोन लॉन्च केला आहे. या फोनची एक मोठी खासियत अशी आहे कि Realme X50 ब्रँडचा पहिला डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन पण आहे.

लुक व डिजाईन

Realme X50 ब्रँडचा पहिला असा फोन आहे जो डुअल पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला डावीकडे दोन होल आहेत. यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. रियलमी एक्स50 कंपनीने कर्व्ड ऐज डिजाईन सह बाजारात आणला आहे. फोनच्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर त्यावर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. हा कॅमेरा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये सर्वात वर असलेली लेंस ‘येलो सर्कल’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. Realme ने फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट बटण दिला आहे तसेच डिवाईसच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे.

कॅमेऱ्याची कमाल

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Realme X50 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.5 अपर्चर असलेला 2x झूम 12 मेगापिक्सल सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची चौथी लेंस आहे. Realme X50 ब्रँडचा पहिला ऐसा फोन आहे जो डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.

Realme X50 5G

रियलमी एक्स50 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.57 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट वर विजुअल देईल. Realme X50 कंपनीने रियलमी यूआई आधारित एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो क्वॉलकॉमच्या Snapdragon 765G चिपसेट वर चालतो. क्वॉलकॉमचा हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. या चिपसेटमुळे 5G कनेक्टिविटी असलेला स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उपलब्ध झाला आहे.

Realme X50 कंपनीने कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हि कूलिंग सिस्टम खासकरून गेमिंगच्या चाहत्यांसाठी आहे, जी मोबाईल गेमिंग एक्सपीरियंस स्मूद, फास्ट आणि लॅग फ्री करेल. Realme X50 चीन मध्ये 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Realme X50 मध्ये पावर बॅकअपसाठी 30W VOOC 4.0 चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 2499 युआन (जवळपास 25,500 रुपये )

6 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 2699 युआन (जवळपास 27,500 रुपये )

12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 2999 युआन (जवळपास 30,500 रुपये )

The post Realme चा पहिला 5G फोन लॉन्च, यात आहे डुअल पंच-होल डिस्प्ले, 12GB RAM आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-phone-officialy-launched-sa-nsa-dual-mode-specification-price/feed/ 0
रियलमी इंडियाच्या सीईओने शेयर केला Realme च्या पहिल्या 5G फोनचा फोटो, बघा कसा आहे डिवाईस आणि कधी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-india-ceo-madhav-sheth-tweet-share-brand-first-5g-phone-photo-x50-youth/ https://www.91mobiles.com/marathi/realme-india-ceo-madhav-sheth-tweet-share-brand-first-5g-phone-photo-x50-youth/#respond Fri, 03 Jan 2020 12:16:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6186 उशिरा का होईना पण रियलमीचा 5जी फोन भारतात पण लॉन्च होईल.

The post रियलमी इंडियाच्या सीईओने शेयर केला Realme च्या पहिल्या 5G फोनचा फोटो, बघा कसा आहे डिवाईस आणि कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 7 जानेवारीला अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा नवीन डिवाईस Realme X50 सादर करेल. या दिवशी कंपनी चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Realme X50 टेक मार्केट मध्ये येईल. रियलमी एक्स50 ब्रँडचा पहिला 5G स्मार्टफोन असेल. हा फोन बाजारात येण्याआधीच रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून Realme च्या पहिल्या 5G फोनचा फोटो शेयर केला आहे. फोटो शेयर करून रियलमीने असा ईशारा केला आहे कि कंपनी भारतात पण आपला 5जी फोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे.

माधव सेठ यांनी आपल्या ट्वीट मध्ये 4 फोटोग्राफ शेयर केले आहेत. या सर्व फोटोज मध्ये फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे. फोटोज शेयर करण्यासोबतच रियलमी इंडियाच्या सीईओनी सांगितले आहे कि Realme चा हा 5G फोन फक्त लुक व डिजाईनच्या बाबतीत शानदार नसेल तर परफॉर्मेंसच्या बाबतीत पण पावरफुल असेल. या ट्वीटवर जेव्हा लोकांनी प्रश्न विचारला कि हा फोन भारतात कधी येईल तेव्हा realme India Support ने उत्तर दिले आहे कि, या माहितीसाठी कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर नजर ठेवावी. म्हणजे उशिरा का होईना पण रियलमीचा 5जी फोन भारतात पण लॉन्च होईल.

लुक व डिजाईन

Realme 5G फोन बद्दल बोलायचे तर माधव सेठ यांनी शेयर केलेल्या फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे ज्यावर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. हा कॅमेरा सेटअप पॅनलच्या उजवीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये सर्वात वरची लेंस ‘पिवळ्या सर्कल’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. विशेष म्हणजे अशीच डिजाईन Realme X सीरीजच्या इतर फोन्स मध्ये पण दिसली आहे. या फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही त्यामुळे असे म्हणता येईल कि हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे खाली Realme ची ब्रँडिंग आहे. फोटो मध्ये हा फोन ग्लॉस बॉडीवर बनलेला दिसतो जी खूप शाइनी आहे.

Realme X50 5G

माधव सेठ यांनी शेयर केलेले फोटोज रियलमी Realme X50 चे असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे रियलमी चाइना CMO Xu Qi यांनी या सीरीज बद्दल असा खुलासा केला आहे कि Realme X50 5G सोबत फोनचा लाइट वर्जन Realme X50 5G Youth पण लॉच केला जाईल. Realme X50 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट मिळेल. Realme X50 ब्रँडचा गेमिंग स्मार्टफोन असेल तसेच फोन मध्ये कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी दिली जाईल, जी गेमिंग एक्सपीरियंस स्मूद, फास्ट आणि लॅग फ्री करेल. लीक्सनुसार Realme X50 मध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो तसेच फोनची स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केली जाईल.

लीकनुसार Realme X50 मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Samsung GW1 सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5x हाइब्रिड झूम असेलला 13 मेगापिक्सलचा सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस असू शकते. लीक रिपोर्टनुसार फोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा Samsung GD1 सेंसर + 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस असलेला डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप मिळू शकतो. Realme X50 मध्ये पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 7 जानेवारीची वाट बघावी लागेल.

The post रियलमी इंडियाच्या सीईओने शेयर केला Realme च्या पहिल्या 5G फोनचा फोटो, बघा कसा आहे डिवाईस आणि कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-india-ceo-madhav-sheth-tweet-share-brand-first-5g-phone-photo-x50-youth/feed/ 0
Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/#respond Thu, 28 Nov 2019 10:43:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5907 आशा आहे कि कंपनी पुढच्यावर्षी पर्यंत भारतात Realme X50 5G सादर करू शकते.

The post Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी Realme ने अधिकृतपणे घोषणा केली होती कि ते आपल्या Realme X50 वर काम करत आहेत, जो 5G सपोर्ट सह सादर केला जाईल. हा कंपनीचा पहिला 5G फोन असेल. आता फेसबुक वर रियलमी फॅनने Realme X50 5G फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. तसेच फोटो अजून एका फोन Realme X50 Lite (Youth Edition) ची माहिती पण समोर आली आहे.

या आठवड्याच्या सुरवातीला Realme चायनाचे सीएमओ Xu Qi Chase यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करत सांगितले आहे कि रियलमी आपल्या 5जी स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा पुढच्यावर्षीच्या सुरवातीला Realme X50 नावाने सादर केला जाईल. आपल्या पोस्ट मध्ये सीएमओ ने Realme X50 ची इमेज पण दाखवली होती. यावरून समजले होते कि फोन मध्ये पिल-शेप पंच होल वरच्या बाजूला डावीकडे असेल.

Realme X50 5G स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार Realme X50 5G मध्ये सुपर-AMOLED 6.44-इंचाचा डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट असेल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 735 5G चिपसेट असेल. तसेच फोनच्या रियर पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्यात Sony IMX686 60-मेगापिक्सल प्राइमरी लेंस, 8-मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस, 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टेट लेंस असेल.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल वाइड-अँगल लेंस असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500mAh ची बॅटरी पण असेल जी सुपर VOOC 4.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सह येईल. बोलले जात आहे कि हा कंपनीचा पहिला फोन असेल जो वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. लीकनुसार Realme X50 5G मध्ये 6 GB रॅम + 128 GB स्टोरे, 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज आणि 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज दिली जाऊ शकते. पण अजूनतरी फोनची किंमत समजली नाही.

Realme X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स

या लीक मध्ये Realme X50 Lite (Youth Edition) 5G बद्दल पण माहिती समोर आली आहे. यात सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 6.55-इंचाचा IPS एलसीडी डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये MediaTek MT6885 5G असेल. यात क्वाड कॅमेरा सेटअप मागे असेल. कॅमेरा सेटअप मध्ये 16-मेगापिक्सलची मेन लेंस, 8-मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस असेल.

Realme X50 Lite (Youth Edition) 5G मध्ये सिंगल फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाईल जो 32-मेगापिक्सलचा असेल. कंपनी हा डिवाइस पंच होल डिस्प्ले सह सादर करू शकते. तसेच X50 Lite 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल जी VOOC 4.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सह येईल. चीन मध्ये फोन 6 GB रॅम + 64 GB स्टोरेज आणि 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज सह येईल.

या लीक व्यतिरिक्त एका इंडियन टिप्सटरने खुलासा केला आहे कि रियलमी के RMX2030 मॉडेल नंबर असलेल्या फोनला Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्यामुळे आशा आहे कि कंपनी पुढच्यावर्षी पर्यंत भारतात Realme X50 5G सादर करू शकते.

The post Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/feed/ 0