Redmi Note 11SE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Aug 2022 07:32:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-11-se-launched-in-india-know-price-specs-sale-xiaomi-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-11-se-launched-in-india-know-price-specs-sale-xiaomi-offer-details/#respond Fri, 26 Aug 2022 07:32:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12524 Xiaomi नं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत रेडमी नोट 11 सीरीजमध्ये अजून एक नवीन मोबाइल फोन जोडला आहे. हा शाओमी फोन Redmi Note 11 SE नावानं भारतात लाँच झाला आहे. रेडमी नोट 11 एसई मध्ये 6GB RAM, MediaTek Helio G95, 64MP Camera आणि 5,000mAh Battery असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या […]

The post कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi नं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत रेडमी नोट 11 सीरीजमध्ये अजून एक नवीन मोबाइल फोन जोडला आहे. हा शाओमी फोन Redmi Note 11 SE नावानं भारतात लाँच झाला आहे. रेडमी नोट 11 एसई मध्ये 6GB RAM, MediaTek Helio G95, 64MP Camera आणि 5,000mAh Battery असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या हँडसेटची विक्री कंपनीच्या वेबसाईटवर 31 ऑगस्टपासून सुरु केली जाईल.

Redmi Note 11 SE चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11 SE चा डिस्प्ले

रेडमी नोट 11 एसई स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.43 इंच की अ‍ॅमोलेड डॉट डिस्प्लेवर लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन 1100निट्स ब्राइटनेस आणि 4,500,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सहित 409पीपीआयला सपोर्ट करते. शाओमीनं आपला हा नवीन स्माटफोन Reading mode 3.0 आणि Sunlight mode 2.0 सह बाजारात आणला आहे.

Redmi Note 11 SE चा प्रोसेसर

Redmi Note 11 SE अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच करण्यात आला आहे जो मीयुआय 12.5 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या शाओमी फोनमध्ये 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी95 चिपसेट आहे. तर ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली-जी76 जीपीयूला सपोर्ट करतो.

Redmi Note 11 SE चा कॅमेरा

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 11 एसई क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.9 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच Redmi Note 11 SE एफ/2.45 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 11 SE ची बॅटरी

Redmi Note 11 SE स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. या मोठ्या बॅटरी सोबतच हा नवीन रेडमी मोबाइल 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन 30 मिनिटांत 0 ते 54 टक्के चार्ज होऊ शकतो.

Redmi Note 11 SE ची किंमत

Redmi Note 11 SE स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट कंपनीनं बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते. या हँडसेटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड ईएमआयवर 1000 रुपयांची सूट मिळेल, त्यामुळे हा फोन 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्मार्टफोनची विक्री कंपनीच्या वेबसाईटवर येत्या 31 ऑगस्टपासून सुरु केली जाईल.

The post कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-11-se-launched-in-india-know-price-specs-sale-xiaomi-offer-details/feed/ 0
रियलमीला मात देण्यासाठी शाओमी सज्ज; Redmi Note 11 SE “या” दिवशी होणार भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-11-se-india-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-11-se-india-launch-date/#respond Wed, 24 Aug 2022 09:24:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12435 भारतात सध्या बजेट सेगमेंटमध्ये शाओमी आणि रेडमीमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दोन्ही कंपन्या एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन सादर करत आहेत. आता शाओमी आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत लवकरच Note 11 सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ही रेडमीची खूप लोकप्रिय सीरिज आहे. शाओमीनं आगामी Redmi Note 11 SE स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. हा फोन […]

The post रियलमीला मात देण्यासाठी शाओमी सज्ज; Redmi Note 11 SE “या” दिवशी होणार भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात सध्या बजेट सेगमेंटमध्ये शाओमी आणि रेडमीमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दोन्ही कंपन्या एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन सादर करत आहेत. आता शाओमी आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत लवकरच Note 11 सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ही रेडमीची खूप लोकप्रिय सीरिज आहे. शाओमीनं आगामी Redmi Note 11 SE स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. हा फोन भारतात 26 ऑगस्ट 2022 ला लाँच केला जाईल.

Redmi India नं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करून ही माहिती दिली आहे की Redmi Note 11 SE दोन दिवसांनी भारतात लाँच होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात लाँच होणारा हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या Redmi Note 10 चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. परंतु या फोनचा इंडिया व्हेरिएंट चीनपेक्षा खूप वेगळा असू शकतो. तर काही रिपोर्टमध्ये असा देखील दावा केला जात आहे की रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन अपकमिंग Poco M5s सारखा असेल. रेडमीकडून मात्र या स्मार्टफोनबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.

Redmi Note 11 SE चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार Redmi Note 11 SE स्मार्टफोन भारतात 6.43-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह सादर काळे जाऊ शकतो. ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ असेल. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात येईल.

रेडमीचा हा स्मार्टफोन MediaTek च्या Helio G95 प्रोसेसर आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित MIUI 13 सह बाजारात येऊ शकतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. हा फोन ड्युअल स्टिरियो स्पिकर्ससह बाजारात येईल. तसेच यात चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट देण्यात येईल.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi Note 11 SE स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळेल. प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP चा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2MP चे दोन सेन्सर मिळतील, ज्यात डेप्थ आणि मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश असेल. रेडमीच्या या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी मोठी बॅटरी मिळेल. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केली जाईल.

Redmi Note 11 SE ची किंमत

Redmi Note 11 SE च्या किंमतीची अधिकृत माहिती मात्र अजूनतरी समोर आली नाही. परंतु हा फोन मिडरेंजमध्ये सादर होण्याची शक्यता जास्त आहे. भारतात लाँच झाल्यानंतर हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

The post रियलमीला मात देण्यासाठी शाओमी सज्ज; Redmi Note 11 SE “या” दिवशी होणार भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-11-se-india-launch-date/feed/ 0