कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच

Xiaomi नं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत रेडमी नोट 11 सीरीजमध्ये अजून एक नवीन मोबाइल फोन जोडला आहे. हा शाओमी फोन Redmi Note 11 SE नावानं भारतात लाँच झाला आहे. रेडमी नोट 11 एसई मध्ये 6GB RAM, MediaTek Helio G95, 64MP Camera आणि 5,000mAh Battery असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या हँडसेटची विक्री कंपनीच्या वेबसाईटवर 31 ऑगस्टपासून सुरु केली जाईल.

Redmi Note 11 SE चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11 SE चा डिस्प्ले

रेडमी नोट 11 एसई स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.43 इंच की अ‍ॅमोलेड डॉट डिस्प्लेवर लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन 1100निट्स ब्राइटनेस आणि 4,500,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सहित 409पीपीआयला सपोर्ट करते. शाओमीनं आपला हा नवीन स्माटफोन Reading mode 3.0 आणि Sunlight mode 2.0 सह बाजारात आणला आहे.

Redmi Note 11 SE चा प्रोसेसर

Redmi Note 11 SE अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच करण्यात आला आहे जो मीयुआय 12.5 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या शाओमी फोनमध्ये 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी95 चिपसेट आहे. तर ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली-जी76 जीपीयूला सपोर्ट करतो.

Redmi Note 11 SE चा कॅमेरा

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 11 एसई क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.9 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच Redmi Note 11 SE एफ/2.45 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 11 SE ची बॅटरी

Redmi Note 11 SE स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. या मोठ्या बॅटरी सोबतच हा नवीन रेडमी मोबाइल 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन 30 मिनिटांत 0 ते 54 टक्के चार्ज होऊ शकतो.

Redmi Note 11 SE ची किंमत

Redmi Note 11 SE स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट कंपनीनं बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते. या हँडसेटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड ईएमआयवर 1000 रुपयांची सूट मिळेल, त्यामुळे हा फोन 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्मार्टफोनची विक्री कंपनीच्या वेबसाईटवर येत्या 31 ऑगस्टपासून सुरु केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here