Samsung Galaxy A32 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 Feb 2021 12:04:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतात येत आहे सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32, यात आहे 5000mAh आणि 48MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-support-page-live-india-launch-48mp-camera-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-support-page-live-india-launch-48mp-camera-5000mah-battery/#respond Thu, 25 Feb 2021 12:04:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10181 Samsung Galaxy A32 मध्ये इनफिनिटी ‘वी’ 6.5 इंचाचा एचडी+ टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा फोन मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेटवर लाॅन्च केला गेला होता.

The post भारतात येत आहे सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32, यात आहे 5000mAh आणि 48MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात वाढती 5G फोन्सची मागणी पाहता Samsung पण लवकरच आपला सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy A32 लॉन्च करणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोनचा सपोर्ट पेज सॅमसंग इंडिया वेबसाइटवर लाइव झाला आहे. त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि हा डिवाइस लवकरच भारतीय बाजारात येईल. कंपनीने आतापर्यंत गॅलेक्सी ए32 च्या इंडिया लॉन्चिंग आणि किंमतीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन सर्वप्रथम यूरोप मध्ये यावर्षी जानेवारी मध्ये सादर केला गेला होता. दुसऱ्या देशात लॉन्च होण्याआधी आपल्याला या फोनचे फीचर्स समजले आहेत. (samsung galaxy a32 support page live india launch 48mp camera 5000mah battery)

सपोर्ट पेज झाला लाइव

सॅमसंग इंडिया वेबसाइटवरील सपोर्ट पेजनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए32 SM-A326B/DS मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंगवरून डिवाइसच्या फीचर किंवा किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच सपोर्ट पेजवरून हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करेल कि नाही हे देखील समजले नाही. पण, यूरोप मध्ये फोन 5G सपोर्टसह आला होता त्यामुळे आम्हाला आशा आहे कि भारतात पण फोन 5G सोबतच येईल.

हे देखील वाचा : 7000mAh बॅटरी आणि 4 बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung चा नवीन फोन Galaxy M62

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A32 मध्ये इनफिनिटी ‘वी’ 6.5 इंचाचा एचडी+ टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा फोन मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेटवर लाॅन्च केला गेला होता. तुम्हाला सांगू इच्छितो कि मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच यूरोप मध्ये फोन तीन रॅम वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला होता.

फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम, दुसरा वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम होता. रॅम व्यतिरिक्त फोन मध्ये 64GB स्टोरेज आणि 128GB स्टोरेज वेरिएंट होते. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

हे देखील वाचा : अश्याप्रकारे करा Netflix वरून चित्रपट डाउनलोड, खूप सोप्पी आहे हि पद्धत

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल च्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी गॅलेक्सी ए32 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post भारतात येत आहे सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32, यात आहे 5000mAh आणि 48MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-support-page-live-india-launch-48mp-camera-5000mah-battery/feed/ 0
Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार https://www.91mobiles.com/marathi/samsung-cheapest-5g-phone-galaxy-a32-launched-specifications-features-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-cheapest-5g-phone-galaxy-a32-launched-specifications-features-price-sale/#respond Wed, 10 Feb 2021 12:22:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9973 Samsung Galaxy A32 इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लाॅन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बाॅडी पार्ट देण्यात आला आहे.

The post Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत Samsung Galaxy A32 5G स्मार्टफोन सादर केला होता. ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये आलेला हा मोबाईल फोन सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5जी फोन आहे. ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून फोन ऑफिशियल केल्यानंतर आता सॅमसंग अधिकृतपणे हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करत आहे. Samsung Galaxy A32 5G ची विक्री स्पेन मध्ये सुरु झाली आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांसह भारतात पण उपलब्ध होईल. स्पेन मध्ये फोनची किंमत €279 म्हणजे 24,500 रुपयांच्या आसपास आहे.

डिस्प्ले व डिजाईन

Samsung Galaxy A32 इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लाॅन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बाॅडी पार्ट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी चे डायमेंशन 76.1 x 164.2 x 9.1एमएम आहे आणि फोनचे वजन 205 ग्राम आहे. या फोनने Awesome Black, Awesome White, Awesome Blue आणि Awesome Violet कलर मध्ये एंट्री घेतली आहे.

प्रोससिंग पावर

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएसवर लाॅन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन युजर इंटरफेससह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डायमनसिटी 720 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च

रॅम व स्टोरेज

Samsung Galaxy A32 कंपनीच्या ग्लोबल वेबसाइटवर तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लिस्ट केला गेला होता, ज्यात 4 जीबी रॅम, 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमचा समावेश होता. तसेच स्पेन मध्ये हा फोन 4 जीबी रॅमवर लाॅन्च झाला आहे त्याचबरोबर 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी गॅलेक्सी ए32 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर

सिक्योरिटी व पावर

Samsung Galaxy A32 स्मार्टफोन बेसिक कनेक्टिविटीसह येतो ज्यात सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी 5,000एमएएच बॅटरीसह आला आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-cheapest-5g-phone-galaxy-a32-launched-specifications-features-price-sale/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल शानदार Samsung Galaxy M02s स्मार्टफोन, 19 जानेवारी पासून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-sale-in-india-from-19-january-on-amazon-price-rs-8999-know-specs-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-sale-in-india-from-19-january-on-amazon-price-rs-8999-know-specs-offer/#respond Thu, 14 Jan 2021 09:01:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9673 Samsung Galaxy M02s बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल शानदार Samsung Galaxy M02s स्मार्टफोन, 19 जानेवारी पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपला लो बजेट सेग्मेंटचा विस्तार केला होता. सॅमसंगने साल 2021 चा पहिला स्मार्टफोन म्हणून Samsung Galaxy M02s भरतात लाॅन्च केला आहे. फोन ऑफिशियल करताना कंपनीने याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स सांगितले होते पण सेल डेट सांगितली नव्हती. तसेच आता शाॅपिंग साइट अमेजॉनने फोनचे प्रोडक्ट पेज अपडेट करत घोषणा केली आहे कि Samsung Galaxy M02s स्मार्टफोन 19 जानेवारीला भारतात सेलसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M02s बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. भारतात फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला गेला आहे तसेच 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. 19 जानेवारी पासून हा स्मार्टफोन Black, Blue आणि Red कलर मध्ये अमेजॉन इंडिया वर सेलसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M02s

सॅमसंग गॅलेक्सी एम02एसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तिन्ही बाजूंना बारीक बेजल्स देण्यात आले आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे.

Samsung Galaxy M02s एंड्रॉयड 10 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतीय बाजारात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एम02एस ट्रिपल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M02s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलाॅक फीचर आहे. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम02एस 5,000एमएएचची मोठी बॅटरीला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस वीडियो

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल शानदार Samsung Galaxy M02s स्मार्टफोन, 19 जानेवारी पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-sale-in-india-from-19-january-on-amazon-price-rs-8999-know-specs-offer/feed/ 0
Samsung चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32 झाला लाॅन्च, बघा काय आहे या फोनची ताकद https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-officially-announced-know-full-specification-and-feature/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-officially-announced-know-full-specification-and-feature/#respond Thu, 14 Jan 2021 07:31:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9665 Samsung Galaxy A32 स्मार्टफोन बेसिक कनेक्टिविटी सह येतो ज्यात सिक्योरिटीसाठी साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

The post Samsung चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32 झाला लाॅन्च, बघा काय आहे या फोनची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो Samsung Galaxy A32 5G नावाने लाॅन्च केला जाईल. त्यानुसार काल कंपनीने आपला हा शानदार डिवाईस जगासमोर ठेवला आहे. सॅमसंगने आपल्या ग्लोबल वेबसाइट वर फोन पेज लाईव करत हा फोन ऑफिशियल केला आहे जो आगामी काही दिवसांत वेगवेगळ्या बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे Samsung Galaxy A32 या कंपनीचा आता पर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन असेल.

डिस्प्ले व डिजाईन

Samsung Galaxy A32 इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर लाॅन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बाॅडी पार्ट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी चे डायमेंशन 76.1 x 164.2 x 9.1एमएम आहे आणि फोनचे वजन 205 ग्राम आहे. हा फोन Awesome Black, Awesome White, Awesome Blue आणि Awesome Violet रंगात आला आहे.

प्रोससिंग पावर

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी एंडराॅयडच्या लेटेस्ट ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूजर इंटरफेस सह काम करतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्लाॅक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगने फोन मधील चिपसेटची माहिती दिली नाही पण बोलले जात आहे की मार्केट मध्ये हा फोन मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेट वर लाॅन्च होईल. मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

Samsung Galaxy A32 फोनने ग्लोबल मार्केट मध्ये तीन रॅम वेरिएंट्स मध्ये एंट्री केली आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो. तसेच गॅलेक्सी ए32 च्या दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार हा फोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल जी माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल च्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी गॅलेक्सी ए32 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटी व पावर

Samsung Galaxy A32 स्मार्टफोन बेसिक कनेक्टिविटी सह येतो ज्यात सिक्योरिटीसाठी साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी 5,000एमएएच बॅटरी सह येतो जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

The post Samsung चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32 झाला लाॅन्च, बघा काय आहे या फोनची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-officially-announced-know-full-specification-and-feature/feed/ 0
Samsung Galaxy A32 5G चा लाॅन्च आला अजून जवळ, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-nbtc-certification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-nbtc-certification-launch-soon/#respond Wed, 13 Jan 2021 10:54:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9642 Samsung Galaxy A32 5G संबंधित लीक्स नुसार हा 6.5-इंच फ्लॅट फ्रंट ड्यू-ड्रॉप नॉच सह इनफिनिटी-वी डिस्प्ले वर लाॅन्च होईल.

The post Samsung Galaxy A32 5G चा लाॅन्च आला अजून जवळ, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung यावर्षी आपली ‘गॅलेक्सी ए सीरीज’ अजून एडवांस करणार आहे. या सीरीज अंतर्गत Samsung Galaxy A32 5G, Samsung Galaxy A52 5G आणि Samsung Galaxy A72 5G स्मार्टफोन लाॅन्च होतील, ज्यांची माहिती वेळोवेळी समोर आली आहे. मागे यातील एक सॅमसंग गलेक्सी ए32 अमेरिकन सर्टिफिकेशन साइट एफसीसी आणि ब्लूटूथ एसआईजी वर सर्टिफाइड करण्यात आला होता तर आता हा मोबाईल फोन थायलंडच्या सर्टिफिकेशन साइट एनबीटीसी वर पण लिस्ट झाला आहे. या सर्व लिस्टिंग वरून समजते की आता लवकरच हा फोन टेक मार्केट मध्ये एंट्री करणार आहे.

Samsung Galaxy A32 एनबीटीसी वर SM-A326B/DS माॅडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे, सोबत फोनचे नाव पण लिहिण्यात आले आहे. साधारणतः या सर्टिफिकेशन साइट वर फोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले जात नाहीत त्यामुळे गॅलेक्सी ए32 संबंधित नवे स्पेसिफिकेशन तर समोर आले नाहीत पण या लिस्टिंग नंतर अंदाज लावला जात आहे की सॅमसंग आपला हा 5जी फोन जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीला लाॅन्च करेल. चर्चा अशी आहे की Samsung Galaxy A32 ब्रँडचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल.

असा असेल लुक

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी च्या रेंडर्सनुसार हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनला असेल. तसेच फोन फ्लॅट रियर पॅनल सह येईल जे आश्चर्यकारक आहे कारण कंपनीने अलीकडेच कर्व्ड रियर पॅनल सह आपले फोन्स सादर केले आहेत. सोबतच मागे असलेला कॅमेरा मॉड्यूल पण सॅमसंग फोन्स पेक्षा वेगळा असेल. फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप असेल. फोन मध्ये तीन कॅमेरा सेंसर वर्टिकली डावीकडे असतिल. या तीन कॅमेरा सेंसर सोबत एक चौथा कॅमेरा सेंसर व एक एलईडी फ्लॅश असेल. फोटोनुसार फोन मध्ये खालच्या बाजूला 3.5 एमएम हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि एक लाउड स्पीकर ग्रिल आहे. हँडसेट मध्ये वरच्या बाजूला एक सेकंडरी माइक दिला जाईल.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A32 5G संबंधित लीक्स नुसार हा 6.5-इंच फ्लॅट फ्रंट ड्यू-ड्रॉप नॉच सह इनफिनिटी-वी डिस्प्ले वर लाॅन्च होईल. हँडसेट मध्ये डावीकडे एक सिम कार्ड स्लॉट दिला जाईल. डिवाइस उजवीकडे वॉल्यूम रॉकर्स आणि एक पावर बटन असेल. पावर बटन मधेच फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. पण रिपोर्ट वरून गॅलेक्सी ए32 5G हँडसेटच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला नाही. याआधी आलेल्या लीक मध्ये समजले होते की हँडसेट मध्ये अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेर्‍यासह 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी A32 चे डायमेंशन 164.2×76.1×9.1एमएम असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्स नुसार या फोनचा 5G मॉडेल मीडियाटेकच्या डायमेंशन 720 चिपसेट वर लाॅन्च केला जाऊ शकतो जो एंडराॅयडच्या लेटेस्ट ओएस एंडराॅयड 11 सह काम करेल. या फोन मध्ये 15वाॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळू शकतो. अलीकडेच आलेल्या लीकनुसार Samsung Galaxy A32 5G ची किंमत EUR 299 म्हणजे भारतीय करंसीनुसार 26,900 रुपयांच्या आसपास असू शकते. पण भारतात हा फोन अजून स्वस्त होऊ शकतो.

The post Samsung Galaxy A32 5G चा लाॅन्च आला अजून जवळ, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-nbtc-certification-launch-soon/feed/ 0
Samsung च्या स्वस्त 5G फोन Galaxy A32 चे रेंडर्स झाले लीक, असा असेल लुक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-smartphone-renders-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-smartphone-renders-launch-soon/#respond Tue, 01 Dec 2020 12:59:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9122 सॅमसंग गॅलेक्सी ए32 चे एक्सक्लूसिव रेंडर्स फेमस लीक्सटर OnLeaks ने voice वेबसाइट सह मिळून लीक केले आहेत.

The post Samsung च्या स्वस्त 5G फोन Galaxy A32 चे रेंडर्स झाले लीक, असा असेल लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने अलीकडेच आपल्या A-सीरीज मध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले होते. तसेच अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि आता कंपनी ए-सीरीज मध्ये आपला नवीन फोन सॅमसंग गॅलेक्सी ए32 स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वीच Samsung Galaxy A32 5G हँडसेटचे कवर फोटो ऑनलाइन लीक झाले होते. तसेच आता Galaxy A32 चे रेंडर्स समोर आले आहेत, ज्यात फोनच्या फुल डिजाइनचा खुलासा झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए32 चे एक्सक्लूसिव रेंडर्स फेमस लीक्सटर OnLeaks ने voice वेबसाइट सह मिळून लीक केले आहेत. या रेंडर्स सोबतच सांगण्यात आले आहे कि Galaxy A32 प्लास्टिक बॉडीचा बनला असेल. तसेच फोन फ्लॅट रियर पॅनल सह येईल जे आश्चर्यकारक आहे कारण काही दिवसांपूर्वी कंपनीने कर्व्ड रियर पॅनल सह आपले फोन्स सादर केले आहेत.

सोबतच मागे असलेला कॅमेरा मॉड्यूल पण सध्याच्या सॅमसंग फोन्स पेक्षा वेगळा असेल. फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप असेल. फोन मध्ये तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल टॉप लेफ्ट मध्ये असेल. तसेच या तिन्ही कॅमेरा सेंसरच्या सोबत एक चौथा कॅमेरा सेंसर व एक एलईडी फ्लॅश असेल. फोटोजनुसार, फोन मध्ये खालच्या बाजूला 3.5 एमएम हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि एक लाउड स्पीकर ग्रिल असेल. हँडसेट मध्ये वरच्या बाजूला एक सेकंडरी माइक दिला जाईल.

तसेच, फोन मध्ये 6.5-इंचाच्या फ्लॅट फ्रंट ड्यू-ड्रॉप नॉच सह एक इनफिनिटी-वी डिस्प्ले असेल. हँडसेट मध्ये डावीकडे एक सिम कार्ड स्लॉट दिला जाईल. डिवाइस मध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर्स आणि एक पावर बटन असेल. पावर बटन मधेच फिंगरप्रिंट सेंसर पण असेल.

पण रिपोर्ट वरून गॅलेक्सी ए32 5G हँडसेटच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला नाही. याआधी आलेल्या लीक मध्ये समजले होते कि हँडसेट मध्ये अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेऱ्यासह 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा दिला जाईल.

The post Samsung च्या स्वस्त 5G फोन Galaxy A32 चे रेंडर्स झाले लीक, असा असेल लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-smartphone-renders-launch-soon/feed/ 0