Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर

Nokia ने आपल्या फॅन्सचा व्हॅलेंटाईन वीक खास बनवला आहे. कंपनीने मोबाईल युजर्सना भेट देत एकसाथ दोन नवीन मोबाईल फोन भारतात लाॅन्च केले आहेत ज्यांनी Nokia 3.4 आणि Nokia 5.4 नावाने भारतीय बाजारात एंट्री घेतली आहे. नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने हे दोन्ही स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये सादर केले आहेत, यातील Nokia 5.4 ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होत आहे तर Nokia 3.4 11,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला आहे.

वेरिएंट व प्राइस

Nokia 5.4 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. नोकिया 5.4 चा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 13,999 रुपये तर 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 15,499 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो Dusk आणि Polar Night कलर मध्ये 17 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ब्ध होईल.

लुक व डिजाईन

Nokia 5.4 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या दोन्ही कडा साईड बेजलला जाऊन मिळतात तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे त्यावर Nokia ची ब्रँडिंग आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो एका रिंग मध्ये आहे. या सेटअपच्या डावीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच खालच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर पण वर्टिकल शेप मध्ये ब्रँडचे नाव लिहिण्यात आले आहे.

फीचर व स्पेसिफिकेशन्स

Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. एचएमडी ग्लोबलने आपला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 10 च्या स्टॉक वर्जनवर लॉन्च केला आहे जो लवकरच अँड्रॉइड 11 ओएसवर अपडेट होईल. तसेच प्रोसेसिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.4 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.4 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here