Samsung Galaxy A54 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 05:11:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-and-a34-exclusive-image-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-and-a34-exclusive-image-features-specifications/#respond Wed, 22 Feb 2023 11:37:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18061 Samsung Galaxy A34 आणि Samsung Galaxy A54 गेले अनेक दिवस चर्चेत आहेत. अनेक सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झालेल्या गॅलेक्सी ए54 आणि ए34 बद्दल अजूनही अनेक अंदाज बांधले जात आहेत. कंपनीच्या घोषणेपुर्वीच आज आम्ही या दोन्ही सॅमसंग स्मार्टफोन्सचे फुल स्पेसिफिकेशन्स आणि इमेजेस मिळवल्यात आहेत. प्रसिद्ध टिपस्टर सुधांशुच्या हवाल्याने Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची सर्व माहिती […]

The post आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A34 आणि A54 मिडबजेट 5जी फोन असू शकतात.
  • हे मोबाइल 30 मिनिट्स पाण्यात राहिल्यावर देखील सुरक्षित राहतील.
  • Galaxy A34 Dimensity 1080 तथा Galaxy A54 Exynos 1380 वर चालेल.

Samsung Galaxy A34 आणि Samsung Galaxy A54 गेले अनेक दिवस चर्चेत आहेत. अनेक सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झालेल्या गॅलेक्सी ए54 आणि ए34 बद्दल अजूनही अनेक अंदाज बांधले जात आहेत. कंपनीच्या घोषणेपुर्वीच आज आम्ही या दोन्ही सॅमसंग स्मार्टफोन्सचे फुल स्पेसिफिकेशन्स आणि इमेजेस मिळवल्यात आहेत. प्रसिद्ध टिपस्टर सुधांशुच्या हवाल्याने Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची सर्व माहिती लाँचच्या आधीच समोर आली आहे, जी तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A54 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.4″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Samsung Exynos 1380 SoC
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 25W 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी 54 स्मार्टफोन 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो जो सुपर अ‍ॅमोलेड पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन कंपनीच्या एक्सनॉस 1380 प्रोसेसरवर काम करू शकतो तसेच मार्केटमध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB च्या दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: एयरटेल युजर्सना धक्का; या 19 सर्कल्समधून काढून टाकला सर्वात स्वस्त प्लॅन

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A54 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स असू शकते. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकते.

सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए54 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. हा फोन आयपी67 रेटेड असू शकतो. अँड्रॉइड आधारित वनयुआय 5 सोबतच Galaxy A54 मध्ये ड्युअल सिम, एनएफसी, ओटीजी आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळू शकतात.

Samsung Galaxy A34 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 1080 SoC
  • 48MP Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 25W 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए34 मध्ये कंपनी 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्टज रिफ्रेश रेट असलेला 6.6 इंचाचा लार्ज फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. या फोनचे डायमेंशन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199ग्राम असू शकतं. हा वॉटरप्रूफ मोबाइल देखील आयपी67 सर्टिफाइड असू शकतो.

Samsung Galaxy A34 अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5 वर सादर केला जाऊ शकतो. हा मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर काम करू शकतो. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. हे देखील वाचा: हे 10 अंकी मोबाइल नंबर 30 दिवसांत होणार बंद; TRAI नं घेतला कडक निर्णय

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स दिली जाऊ शकते. Samsung Galaxy A34 13 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करू शकतो. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.

The post आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-and-a34-exclusive-image-features-specifications/feed/ 0