एयरटेल युजर्सना धक्का; या 19 सर्कल्समधून काढून टाकला सर्वात स्वस्त प्लॅन

Highlights

  • Airtel नं Rs 99 recharge plan आता 19 सर्कल्समधून काढून टाकला आहे.
  • टेलीकॉम नेटवर्कनं आपल्या सर्वात स्वस्त प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे.
  • 19 सर्कलमध्ये आता ग्राहकांकडे Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन Rs 155 चा असेल.

एयरटेलनं 19 सर्कल्समधून 99 रुपयांचा बेस प्लॅन हटवला आणि महाराष्ट्र आणि केरळमध्ये ग्राहकांसाठी 155 रुपयांचा पॅक लाँच केला आहे. अर्थात टेलीकॉम नेटवर्क आता 22 पैकी 19 सर्कल्समध्ये 99 रुपयांचा प्लॅन देत नाही. त्यामुळे जर ग्राहकांना सिम कार्ड नंबर सुरु ठेवायचं असेल तर त्यांना 155 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. परंतु काही कारणांमुळे 99 रुपयांचा प्लॅन अजूनही कोलकाता, गुजरात आणि मध्य प्रदेशात उपलब्ध आहे. CNBC-TV18 च्या एका रिपोर्टनुसार, एयरटेल 155 रुपयांचा प्लॅन सादर करून ग्राहकांना चांगली सर्व्हिस देऊ पाहत आहे.

Rs 99 प्लॅन लवकरच होणार बंद

99 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त 200MB डेटा आणि 28 दिवस 2.5 पैसे प्रति मिनिट दराने कॉल करता येतात. जो की आता फक्त तीन सर्कल्समध्ये उपलब्ध आहे आणि कदाचित लवकरच इथून देखील हा प्लॅन हद्दपार करू शकते. यामागे अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर अर्थात ARPU वाढवण्याच्या कंपनीचा हेतू असू शकतो. 155 रुपयांच्या पॅकचा ट्रायल नोव्हेंबर 2022 मध्ये सुरु करण्यात आली होती आणि लवकरच सर्व सर्कल्समध्ये हा एयरटेलचा बेस प्लॅन बनू शकतो. हे देखील वाचा: 1 मार्चला येतोय Vivo V27e; सीरिज मधील स्वस्त फोनमध्ये देखील दमदार फिचर

एयरटेल 155 रुपयांचा रिचार्ज पॅक

टेलीकॉम कंपनीनुसार हा एक शानदार पॅक आहे आणि हा प्लॅन 24 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल, 300 एसएमएस आणि 1GB डेटा देतो. या फायद्याव्यतिरिक्त एयरटेलच्या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत Wynk Music आणि Hellotunes बेनिफिट्स देखील मिळतात. वर सांगितल्याप्रमाणे गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये हरियाणा आणि ओरिसामध्ये या प्लॅनचं परीक्षण सुरु करण्यात आलं होतं. या दोन्ही सर्कल्समध्ये फक्त पाच टक्के ग्राहक एयरटेलची सेवा वापरत आहेत. हे देखील वाचा: 6000mAh ची अवाढव्य बॅटरी! अत्यंत कमी किंमतीत Infinix Smart 7 भारतात लाँच

तसेच ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टेनलीनुसार एयरटेल येत्या काही महिन्यांमध्ये सर्व सर्कल्समध्ये 155 रुपयांचा प्लॅन सादर करेल. परंतु अशी देखील चर्चा आहे की यामुळे कंपनीच्या महसुलावर काही खास फरक पडणार नाही. फर्मनं असं म्हटलं आहे की एयरटेलचा महसूल 1.3-1.5 टक्क्यांनी वाढू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here