Samsung Galaxy A8 Star - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 06 Nov 2018 08:43:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंगची दिवाळी भेट : 5,000 रुपयांपर्यंत कमी केल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, हे फोन्स झाले स्वस्त https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-plus-galaxy-a8-star-price-cut-india-diwali-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-plus-galaxy-a8-star-price-cut-india-diwali-offer-in-marathi/#respond Tue, 06 Nov 2018 08:43:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2812 सॅमसंग गॅलेक्सी ए6+ आणि गॅलेक्सी ए8 स्टार च्या कमी झालेल्या किंमतीची माहिती प्रसिद्ध रिटेलर महेश टेलीकॉम ने आपल्या ट्वीटर हँडल वरून दिली आहे

The post सॅमसंगची दिवाळी भेट : 5,000 रुपयांपर्यंत कमी केल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, हे फोन्स झाले स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने फेस्टिव सीजनची सुरवात आधीच केली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सॅमसंग ने दिवाळी आॅफर सादर केली होती ज्या अंतर्गत गॅलेक्सी जे6, गॅलेक्सी जे4, गॅलेक्सी जे2 (2018) आणि गॅलेक्सी जे2 कोर स्मार्टफोन चांगल्या डिस्काउंट सह विकत घेता येत आहेत. तर आता सॅमसंग ने पुन्हा एकदा आपल्या फॅन्सना भेट देत कंपनीच्या दमदार स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. गॅलेक्सी जे सीरीज स्मार्टफोन आॅफर अंतर्गत डिस्काउंट वर मिळत आहेत तसेच आता कंपनीच्या गॅलेक्सी ए6+ आणि गॅलेक्सी ए8 स्टार च्या किंमती पण सॅमसंग इंडिया ने कमी केल्या आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए6+ आणि गॅलेक्सी ए8 स्टार च्या कमी झालेल्या किंमतीची माहिती प्रसिद्ध रिटेलर महेश टेलीकॉम ने आपल्या ट्वीटर हँडल वरून दिली आहे. प्राप्त माहितीनुसार सॅमसंग इंडिया ने गॅलेक्सी ए8 स्टार ची किंमत थेट 5,000 रुपयांनी कमी केली आहे तर गॅलेक्सी ए6+ ची किंमत कंपनी ने 3,000 रुपयांनी कमी केली आहे. ट्वीट नुसार हे दोन्ही स्मार्टफोन रिटेल स्टोर्स वर नवीन किंमतींसह सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार पाहता हा फोन कंपनीने 34,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. सॅमसंग ने 5,000 रुपयांची कपात केल्यामुळे हा फोन 29,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. गॅलेक्सी ए8 स्टार 6.3-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 24-एमपी + 16-एमपी चा रियर कॅमेरा आणि 24-एमपी चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,700एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

गॅलेक्सी ए6+ पाहता कंपनीने या फोनच्या किंमतीती 3,000 रुपयांची कपात केली आहे. हा फोन 21,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता जो प्राइस कट नंतर 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोन मध्ये 6-इंचाचा फुलएचडी+ इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन पण 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. गॅलेक्सी ए6+ फोन 16-एमपी + 5-एमपी च्या डुअल रियर कॅमेरा आणि 24-एमपी च्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post सॅमसंगची दिवाळी भेट : 5,000 रुपयांपर्यंत कमी केल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, हे फोन्स झाले स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-plus-galaxy-a8-star-price-cut-india-diwali-offer-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार, 27 ऑगस्ट पासून होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8-star-launched-in-india-features-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8-star-launched-in-india-features-specification-price-in-marathi/#respond Mon, 27 Aug 2018 08:36:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1821 सॅमसंग ने गॅलेक्सी ए8 स्टार देशात 34,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post 6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार, 27 ऑगस्ट पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार बदल सतत लीक्स समोर येत आहेत. फोन चे स्पेसिफिकेशन्स ते याची किंमत मीडिया रिपोर्ट्स मध्ये लीक च्या माध्यमातून शेयर करण्यात येत होती. त्यानुसार आज सॅमसंग ने आपला हा हाईएंड डिवाईस समोर आणत गॅलेक्सी ए8 स्टार भारतीय बाजारात आॅफिशियली लॉन्च केला आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी ए8 स्टार देशात 34,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन ग्लास आणि मेटल फ्रेम वर बनलेला आहे. या फोन मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस सुपर एमोलेड ​इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 6.3-इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन ला सपोर्ट करतो. लेटेस्ट एंडरॉयड सोबत या फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

सॅमसंग ने हा फोन 6जीबी च्या पावरफुल रॅम सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार डुअल रियर कॅमेरा सेटअप ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सोबत 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एफ/1.7 अपर्चर ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी गॅलेक्सी ए8 स्टार मध्ये एफ/2.0 अपर्चर वाल 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये 3,700एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार 34,990 रुपयांमध्ये 27 ऑगस्ट पासून अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. तर 5 सप्टेंबर पासून हा फोन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार, 27 ऑगस्ट पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8-star-launched-in-india-features-specification-price-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, लवकरच लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8-star-product-page-on-amazon-india-launching-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8-star-product-page-on-amazon-india-launching-soon-in-marathi/#respond Tue, 21 Aug 2018 14:23:17 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1778 सॅमसंग इंडिया ने अजूनतरी गॅलेक्सी ए8 स्टार च्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे गॅलेक्सी ए8 स्टार च्या लॉन्च डेट ची माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, लवकरच लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगचा सर्वात ताकदवान स्मार्टफोन गॅलेक्सी नोट 9 भारतात लॉन्च झाला आहे. या शानदार डिवाईस साठी इंडियन सॅमसंग फॅन्स खूप उत्साहीत आहेत. हा उत्साह वाढवणारी अजून एक बातमी आली आहे कि सॅमसंग लवकरच भारतात गॅलेक्सी ए8 स्टार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सॅमसंगचा हा आगामी स्मार्टफोन देशातील शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण लिस्ट झाला आहे, ज्यावरून अजून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि हा दमदार स्मार्टफोन अमेझॉन एक्सक्लूसिव असेल.

अमेझॉन इंडिया ने एक प्रोडक्ट पेज बनवला आहे ज्यावर एका नवीन स्मार्टफोनचा फोटो लावण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेज वर फोनच्या ब्रँड किंवा कंपनीचे नाव देण्यात आले नाही पण शोधाशोध केल्यानंतर अमेझॉन वर ‘सॅमसंग स्टार‘चे समोर आले आहे. या पेज वर फोन च्या फोटो सोबत याची किंमत 3x,xxx रुपये अशी लिहिण्यात अली आली आहे म्हणजे सॅमसंग कडून लॉन्च करण्यात येणारा गॅलेक्सी ए8 स्टार 30 हजार रुपयांच्या रेंज मध्ये लॉन्च होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार चे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये सुपर एमोलेड ​इनफिनिटी डिस्प्ले देण्यात येईल जो 6.3-इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन ला सपोर्ट करेल. लेटेस्ट एंडरॉयड सोबत या फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वापरला जाऊ शकतो. सॅमसंग आपला हा फोन 6जीबी पावरफुल रॅम सह सादर करू शकते. तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

फोटोग्राफी साठी सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल ज्यात 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असू शकतात. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 24-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार मध्ये पावर बॅकअप साठी मोठी बॅटरी मिळू शकते जी वायरलेस चार्जिंगला सर्पोट करेल. पण सॅमसंग इंडिया ने अजूनतरी गॅलेक्सी ए8 स्टार च्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे गॅलेक्सी ए8 स्टार च्या लॉन्च डेट ची माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, लवकरच लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8-star-product-page-on-amazon-india-launching-soon-in-marathi/feed/ 0