Samsung Galaxy A8s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Dec 2018 13:28:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग गॅलेक्सी ए8एस लॉन्च, यात आहे अनोखा नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेंसर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galxy-a8s-launched-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galxy-a8s-launched-price-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 11 Dec 2018 13:28:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3113 सॅमसंगचा हा फोन सध्या चीन मध्ये प्रीआॅडर साठी उपलब्ध आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए8एस लॉन्च, यात आहे अनोखा नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आता पर्यंत जवळपास सर्व स्मार्टफोन निर्मात्यांनी आपले नॉच स्क्रीन असलेले फोन सादर केले आहेत सॅमसंग सोडून. आज सॅमसंग ने गॅलेक्सी ए8एस लॉन्च करून हि कमतरता दूर केली आहे. कंपनी ने चीन मध्ये हा फोन लॉन्च केला आहे, आशा आहे की भारतात पण हा लवकरच येईल. सॅमसंग ने या फोन मध्ये एक वेगळ्या नॉचची सुरवात केली आहे ज्यात स्क्रीन मध्ये डावीकडे एक होल दिसेल ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंग ने याला नॉचचे नाव दिले नाही. कंपनी ने या डिस्प्लेला इनफिनिटी ओ म्हटले आहे. डिजाइनच्या बाबतीती हा फोन आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व फोन्स पेक्षा वेगळा आहे.

डिजाइन

सॅमसंग गॅलेक्सी ए8एस ग्लास डिजाइन मध्ये सादर केला गेला आहे. नुकत्याच कंपनी द्वारा लॉन्च ए7 आणि ए9 मध्ये अशाप्रकारचा बॅक पॅनल दिसला होता. गॅलेक्सी ए7 आणि गॅलेक्सी ए9 पेक्षा याचे पॅनल थोडे जास्त कर्व्ड आहेत. त्यामुळे मागूनही थोडा एस9 सारखा वाटतो. रियर कॅमेरा प्लेसमेंट तसाच आहे जसा ए7 मध्ये दिसला होता. बाजूला वर्टिकल स्टाइल मध्ये रियर कॅमेरा आहे आणि त्याच्या खाली फ्लॅश आहे. बाजूलाच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

डिस्प्ले
सॅमसंग गॅलेक्सी ए8एस फुल बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला गेला आहे, बाजूला एक होल आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. इतर कंपन्या याला नॉच म्हणत असल्या तरी सॅमसंग ने याला इनफिनिटी ओ म्हटले आहे. कंपनी ने 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह 6.2—इंचाची स्क्रीन दिली आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन एफएचडी+ (2340×1080 पिक्सल) आहे. सॅमसंग ने स्क्रीन कोटिंगची माहिती दिली आहे.

प्रोसेसर आणि रॅम
सॅमसंग गॅलेक्सी ए8एस कंपनी ने क्वालकॉम च्या नवीन 710 चिपसेट वर सादर केला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. क्रयो आर्किटेक्चर वाला हा प्रोसेसर चांगल्या स्पेसिफिकेशन साठी ओळखला जातो. सोबत 6जीबी आणि 8जीबी रॅम मिळेल. दोन्ही रॅम सोबत 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेमरी कार्डचा आॅप्शन पण आहे. हा फोन एंडरॉय आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो. यात सॅमसंग एक्सपीरियंस यूआई मिळेल.

कॅमेरा
सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्याची सुरवात कंपनी ने ए7 2018 पासून केली होती. फोन मध्ये एक कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.0 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर रियर पॅनल वर आहे. फ्रंट कॅमेरा पाहता 24-मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर आहे. सॅमसंग ने आपला हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला आहे.

बॅटरी
पावर बॅकअप साठी सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये 3,300 एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन मध्ये सिक्योरिटी साठी रियर माउंट फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक सपोर्ट पण आहे. ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी एलटीई सह ब्लूटूथ वाईफाई आणि जीपीएस देण्यात आला आहे.

प्राइस
सॅमसंगचा हा फोन सध्या चीन मध्ये प्रीआॅडर साठी उपलब्ध आहे. कंपनी ने किंमत सांगितली नाही पण हा फोन 40,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च होईल.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए8एस लॉन्च, यात आहे अनोखा नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galxy-a8s-launched-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये असेल 6.39-इंचाचा वेगळाच इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले, स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-infinity-o-display-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-infinity-o-display-feature-specifications-in-marathi/#respond Tue, 27 Nov 2018 10:05:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2988 मसंग ने आॅफिशियली गॅलेक्सी ए8एस च्या निर्मितीची तसेच याच्या ​​डिस्प्लेची घोषणा केली आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये असेल 6.39-इंचाचा वेगळाच इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले, स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग आपल्या नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए8एस वर काम करत आहे. काही दिवसांपूर्वी या फोनच्या डिस्प्ले संबंधित एक लीक समोर आला होता ज्यावरून समजले होते कि गॅलेक्सी ए8एस मध्ये ‘O’ शेप असलेली नॉच दिली जाईल. आता पुन्हा एकदा गॅलेक्सी ए8एस ची चर्चा टेक बाजारत सुरु आहे. फोन बद्दल नवीन लीक समोर आला आहे ज्यात गॅलेक्सी ए8एस च्या डिजाईन व डिस्प्ले सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए8एस संबंधित या नवीन लीक मध्ये पण हेच स्पष्ट झाले आहे कि सॅमसंगचा हा फोन ‘ओ’ शेप असलेल्या नॉच सह येईल आहे. या फोन मध्ये फ्रंट पॅनलच्या वरच्या बाजूला छोट्याश्या छिद्रात सेल्फी कॅमेरा फिट केला जाईल. विशेष म्हणजे अशाप्रकारची नॉच सह लॉन्च होणारा गॅलेक्सी ए8एस फक्त सॅमसंगचा नव्हे तर संपूर्ण टेक विश्वातील पहिला स्मार्टफोन असेल ज्यात नॉच फोन बॉडी पासून लांब डिस्प्लेच्या आत असेल.

लीकनुसार गॅलेक्सी ए8एस मध्ये 6.39-इंचाचा इनफिनिटी ओ फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. लीकनुसार सॅमसंगचा फोन 59.11 x 74.88 x 7.38 एमएम डायमेंशन सह येईल तसेच नॉच साठी असलेल्या छिद्रांची साईज 6.7एमएम असेल. या फोनच्या फ्रंट पॅनल वर पूर्णपणे डिस्प्ले स्क्रीन असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग आपला हा फोन लेटेस्ट एंडरॉयड व्हर्जन वर सादर करेल तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए8एस 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच लीक नुसार या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल, जी कार्ड ने वाढवता येईल. लीकनुसार सॅमसंगचा हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 24-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेेंसर सह 5-मेगापिक्सल तसेच 10-मेगापिक्सलचे दोन अजून कॅमेरा सेंसर पण दिले जातील. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 24-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

गॅलेक्सी ए8एस सॅमसंग द्वारा 3,400एमएएच बॅटरी सोबत लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग ने आॅफिशियली गॅलेक्सी ए8एस च्या निर्मितीची तसेच याच्या ​​डिस्प्लेची घोषणा केली आहे. पण हा फोन बाजारात कधी येईल आणि याचे ठोस स्पेसिफिकेशन काय असतील यासाठी कंपनीच्या पुढल्या घोषणेची वाट बघावी लागले. तसेच आता असे पण बोलले जात आहे कि कदाचित सॅमसंग कंपनी गॅलेक्सी ए8एस स्मार्टफोन आपल्या गॅलेक्सी सीरीजच्या दहाव्या वर्धापनदिनी गॅलेक्सी एस10 सोबत टेक मंचावर सादर करेल.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये असेल 6.39-इंचाचा वेगळाच इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले, स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-infinity-o-display-feature-specifications-in-marathi/feed/ 0
‘ओ’ शेप नॉच सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए8एस, फोनचा डिस्प्ले झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-with-infinity-o-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-with-infinity-o-display-in-marathi/#respond Tue, 20 Nov 2018 09:47:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2910 सॅमसंग ने गॅलेक्सी ए8एस च्या अनांउसमेंट व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती दिली नाही. आशा आहे कि कपंनी 2019 मध्ये हा फोन सादर करेल.

The post ‘ओ’ शेप नॉच सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए8एस, फोनचा डिस्प्ले झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘ए’ सीरीज वाढवत एक साथ दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए6एस आणि गॅलेक्सी ए9एस लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन्स लॉन्च करण्यासोबतच सॅमसंग ने असा पण खुलासा केला होता कि कंपनी ए सीरीजच्या अजून एका डिवाईस गॅलेक्सी ए8एस वर काम करत आहे आणि हा फोन कंपनीच्या आता पर्यंत लॉन्च स्मार्टफोन्स पेक्षा वेगळ्या डिजाईन वाला असेल. तर काळ समोर आलेल्या एका लीक मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए8एस च्या डिस्प्ले व लुकचा खुलासा झाला आहे. हा फोन ‘O’ शेप वाली नॉच सह येईल.

सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी ए8एस बद्दल समोर आलेल्या लीक मध्ये फोनच्या डिस्प्ले पॅनलचा फोटो शेयर करण्यात आला आहे. या लीक मध्ये फक्त डिस्प्ले पॅनल दाखवण्यात आला आहे तसेच या पॅनलच्या वरच्या बाजूला छोटे छिद्र आहे. हे छिद्र गोलाकार आहे जे डिस्प्लेच्या वरील बेजलच्या खूप जवळ स्थित आहे. या छिद्रात सेल्फी कॅमेरा फिट होईल हे स्पष्ट झाले आहे तसेच हे पण स्पष्ट झाले आहे कि सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन मध्ये ‘ओ’ शेप वाली नॉच असेल.

लीक मध्ये या फोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ए8एस सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सॅमसंग कडून अजूनतरी अशाप्रकारच्या डिजाईनचा कोणताही फोन सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे गॅलेक्सी ए8एस सॅमसंगचा पहिला फोन असेल ज्यात ‘O’ शेप नॉच वाला इनफिनिटी डिस्प्ले देण्यात येईल. फोटो मध्ये डिस्प्लेच्या कडा कर्व्ड दाखवण्यात आल्या आहेत. अशा आहे कि गॅलेक्सी ए8एस कर्व्ड ऐज डिस्प्ले सह लॉन्च होईल.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए8एस च्या अनांउसमेंट व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती दिली नाही. आशा आहे कि कपंनी 2019 मध्ये हा फोन सादर करेल. तसेच असे होऊ शकते कि गॅलेक्सी ए8एस स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 सोबतच टेक मंचावर येईल. तसेच सॅमसंग ने आज भारतात आपला पहिला 4 रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी (इथे क्लिक करा)

The post ‘ओ’ शेप नॉच सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए8एस, फोनचा डिस्प्ले झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-with-infinity-o-display-in-marathi/feed/ 0