‘ओ’ शेप नॉच सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए8एस, फोनचा डिस्प्ले झाला लीक

सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘ए’ सीरीज वाढवत एक साथ दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए6एस आणि गॅलेक्सी ए9एस लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन्स लॉन्च करण्यासोबतच सॅमसंग ने असा पण खुलासा केला होता कि कंपनी ए सीरीजच्या अजून एका डिवाईस गॅलेक्सी ए8एस वर काम करत आहे आणि हा फोन कंपनीच्या आता पर्यंत लॉन्च स्मार्टफोन्स पेक्षा वेगळ्या डिजाईन वाला असेल. तर काळ समोर आलेल्या एका लीक मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए8एस च्या डिस्प्ले व लुकचा खुलासा झाला आहे. हा फोन ‘O’ शेप वाली नॉच सह येईल.

सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी ए8एस बद्दल समोर आलेल्या लीक मध्ये फोनच्या डिस्प्ले पॅनलचा फोटो शेयर करण्यात आला आहे. या लीक मध्ये फक्त डिस्प्ले पॅनल दाखवण्यात आला आहे तसेच या पॅनलच्या वरच्या बाजूला छोटे छिद्र आहे. हे छिद्र गोलाकार आहे जे डिस्प्लेच्या वरील बेजलच्या खूप जवळ स्थित आहे. या छिद्रात सेल्फी कॅमेरा फिट होईल हे स्पष्ट झाले आहे तसेच हे पण स्पष्ट झाले आहे कि सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन मध्ये ‘ओ’ शेप वाली नॉच असेल.

लीक मध्ये या फोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ए8एस सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सॅमसंग कडून अजूनतरी अशाप्रकारच्या डिजाईनचा कोणताही फोन सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे गॅलेक्सी ए8एस सॅमसंगचा पहिला फोन असेल ज्यात ‘O’ शेप नॉच वाला इनफिनिटी डिस्प्ले देण्यात येईल. फोटो मध्ये डिस्प्लेच्या कडा कर्व्ड दाखवण्यात आल्या आहेत. अशा आहे कि गॅलेक्सी ए8एस कर्व्ड ऐज डिस्प्ले सह लॉन्च होईल.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए8एस च्या अनांउसमेंट व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती दिली नाही. आशा आहे कि कपंनी 2019 मध्ये हा फोन सादर करेल. तसेच असे होऊ शकते कि गॅलेक्सी ए8एस स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 सोबतच टेक मंचावर येईल. तसेच सॅमसंग ने आज भारतात आपला पहिला 4 रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here