Samsung Galaxy A9 Star Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 08 Jun 2018 08:20:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट झाले लॉन्च, 24-एमपी डुअल कॅमेरा सह 6.28-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-galaxy-a9-star-lite-launched-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-galaxy-a9-star-lite-launched-price-features-specifications-in-marathi/#respond Fri, 08 Jun 2018 08:19:45 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=831 सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट सध्या चीन मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत

The post सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट झाले लॉन्च, 24-एमपी डुअल कॅमेरा सह 6.28-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आपल्या गॅलेक्सी सीरीज चे नवीन स्मार्टफोंस गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट मागच्या आठवड्यात चीन मध्ये प्रीआॅर्डर साठी लिस्ट केले होते. तर आता कपंनी ने आपले हे दोन्ही स्मार्टफोन अधिकृत पणे लॉन्च केले आहेत. सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट सध्या चीन मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत जे तिथे 15 जून पासून सेल साठी उपलब्ध होतील.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार
सॅमसंग ने आपला हा फोन मेटल फ्रेम वर बनवला आहे. यात 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.28-इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 512 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन 4जी वोएलटीई आहे तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

कपंनी ने हा फोन 4जीबी रम सह सादर केला आहे. फोन ची इंटरनल स्टोरेज 64जीबी आहे जी 256जीबी पर्यंत एक्सपांड करता येईल. या फोन मध्ये 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक आहे. बिक्सबी सपोर्ट sah या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,700एमएमएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार लाइट
गॅलेक्सी सीरीज चा हा स्मार्टफोन पण मेटल यूनिबॉडी डिजाईन वर बनला आहे. या फोन मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6-इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन 4जी वोएलटीई आहे तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

सॅमसंग ने हा फोन पण 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर करण्यात आला आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक आहे. सॅमसंग पे मिनी सपोर्ट सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,500एमएमएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता चीनी बाजारात सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार 2,999 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 31,600 रुपये आहे. तर गॅलेक्सी ए9 स्टार लाइट ची किंमत 1,999 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 21,000 रुपये आहे. हे फोन भारतीय बाजारात कधी लॉन्च होतील याची स्पष्ट माहिती मिळाली नाही.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट झाले लॉन्च, 24-एमपी डुअल कॅमेरा सह 6.28-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-galaxy-a9-star-lite-launched-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट ची प्रीबुकिंग सुरू, जाणून घ्या या फोंस बद्दल सर्व काही https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-and-star-lite-pre-order-starts-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-and-star-lite-pre-order-starts-in-marathi/#respond Mon, 04 Jun 2018 06:58:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=739 जरी हे 7 जून ला लॉन्च होणार असतील पण आता पासून सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट प्रीआॅर्डर करता येतील.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट ची प्रीबुकिंग सुरू, जाणून घ्या या फोंस बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट बद्दल बातमी आली होती. तसेच काही दिवसांपूर्वी आम्ही गॅलेक्सी ए9 स्टार चे डिटेल्स लीक केले होते ज्यात फोन बद्दल माहिती होती. ज्या प्रकारे या फोन बद्दल हालचाल चालू होती. त्यामुळे अंदाज लावला जात होता कि लवकरच हे लॉन्च केले जाऊ शकतात. आता हे फोन चीन मध्ये प्रीआॅर्डर साठी उपलब्ध झाले आहेत. जरी हे 7 जून ला लॉन्च होणार असतील पण आता पासून सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट प्रीआॅर्डर करता येतील.

फोन चे स्पेसिफिकेशन पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार मध्ये तुम्हाला 6.3-इंचाचा फुल एचडी+ इनफिनिटी स्क्रीन मिळेल. फोन स्क्रीन चे रेजल्यूशन 1080×2220 पिक्सल आहे. तसेच कंपनी ने याला 18.5:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केले आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी ची इंटरनल मेमरी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार मध्ये कंपनी ने ताकदवान कॅमेरा दिला आहे. या फोन मध्ये 24-मेगापिक्सल + 16-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. एवढ्या मोठ्या कॅमेरा सेंसर सह कंपनी चा हा पहिला फोन आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500 एमएमएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार लाइट पाहता या फोन मध्ये 6.2-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोनचे रेजल्यूशन एक समान आहे. तसेच यात पण 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल मेमरी आहे जी एक्सपांड करता येते.

कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा फोन गॅलेक्सी ए9 स्टार पेक्षा वेगळा आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार लाइट मध्ये तुम्हाला 24-मेगापिक्सल चा फ्रंट तसेच बॅक कॅमेरा मिळेल. यात डुअल कॅमेरा सेटअप नाही. तसेच या फोन मध्ये पण तुम्हाला 3,500 एमएएच ची बॅटरी मिळेल. पण या फोंस चे फुल स्पेसिफिकेशन लॉन्च नंतर समजतील.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट ची प्रीबुकिंग सुरू, जाणून घ्या या फोंस बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-and-star-lite-pre-order-starts-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे दोन दमदार डिवाइस, गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-and-galaxy-a9-star-lite-image-and-specification-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-and-galaxy-a9-star-lite-image-and-specification-leak-in-marathi/#respond Tue, 29 May 2018 05:57:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=671 जरी या फोन च्या किंमतीची माहिती मिळाली नसली तरी अंदाज लावला जात आहे की हा फोन 30,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च होईल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे दोन दमदार डिवाइस, गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगातील प्रमुख मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग ला चीनी मोबाईल निर्माता कंपन्यांकडून चांगले आव्हान मिळत आहे. त्यामुळे कंपनी आपला मोबाईल पोर्टफोलियो अजून मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी ने भारतात गॅलेक्सी ए सीरीज आणि जे सीरीज मध्ये 4 फोन लॉन्च केले आहेत. तसेच अजूनही काही फोन येणे आहेत. बातमी आहे की कंपनी लवकरच गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन चीनी वेबसाइट वर दिसला होता. तसेच आज फोन ची लाइव इमेज लीक झाली आहे.

बातमीनुसार कंपनी सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट लॉन्च करणार आहे. हा फोन आज लाइव इमेज आणि वीडियो चीनी सोशल नेटवर्किंग वेबसाइट वेइबो वर लीक झाला आहे. फोटो मध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता की या फोंस मध्ये इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन मध्ये डुअल कॅमेरा उपलब्ध आहे.

फोन च्या फ्रंट पॅनल वर स्क्रीन च्या वर स्पष्ट पणे कॅमेरा आणि फ्लॅश लाइट पण दिसत आहे. फोन ची डिजाइन ए6 पेक्षा वेगळी आहे. तसेच यात खालच्या पॅनल वर तुम्हाला यूएसबी टाइप सी दिसेल.

फोन च्या स्पेसिफिकेशन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार मध्ये तुम्हाला 5.8—इंचाचा फुल एचडी+ (2220 x 1080 पिक्सल रेजल्यूशन) वाली स्क्रीन मिळू शकते. कंपनी या फोन ला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो सह सादर करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार मध्ये तुम्हाला चांगले स्पेसि​फिकेशन मिळतील. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट आधारित असू शकतो आणि चांगल्या ग्राफिक्स साठी यात एड्रीनो 512 जीपीयू उपलब्ध होऊ शकतो. यात 4जीबी ची रॅम मेमरी मिळू शकते. त्याचबरोबर 64जीबी ची इंटरनल स्टोरेज असू शकते. कॅमेरा पाहता कंपनी यात 12—मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा देऊ शकते. तसेच 8—एमपी चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट च्या मागच्या पॅनल वर तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी असू शकते. जरी या फोन च्या किंमतीची माहिती मिळाली नसली तरी अंदाज लावला जात आहे की हा फोन 30,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च होईल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे दोन दमदार डिवाइस, गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-star-and-galaxy-a9-star-lite-image-and-specification-leak-in-marathi/feed/ 0