जगातील प्रमुख मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग ला चीनी मोबाईल निर्माता कंपन्यांकडून चांगले आव्हान मिळत आहे. त्यामुळे कंपनी आपला मोबाईल पोर्टफोलियो अजून मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी ने भारतात गॅलेक्सी ए सीरीज आणि जे सीरीज मध्ये 4 फोन लॉन्च केले आहेत. तसेच अजूनही काही फोन येणे आहेत. बातमी आहे की कंपनी लवकरच गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन चीनी वेबसाइट वर दिसला होता. तसेच आज फोन ची लाइव इमेज लीक झाली आहे.
बातमीनुसार कंपनी सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि ए9 स्टार लाइट लॉन्च करणार आहे. हा फोन आज लाइव इमेज आणि वीडियो चीनी सोशल नेटवर्किंग वेबसाइट वेइबो वर लीक झाला आहे. फोटो मध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता की या फोंस मध्ये इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन मध्ये डुअल कॅमेरा उपलब्ध आहे.
फोन च्या फ्रंट पॅनल वर स्क्रीन च्या वर स्पष्ट पणे कॅमेरा आणि फ्लॅश लाइट पण दिसत आहे. फोन ची डिजाइन ए6 पेक्षा वेगळी आहे. तसेच यात खालच्या पॅनल वर तुम्हाला यूएसबी टाइप सी दिसेल.
फोन च्या स्पेसिफिकेशन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार मध्ये तुम्हाला 5.8—इंचाचा फुल एचडी+ (2220 x 1080 पिक्सल रेजल्यूशन) वाली स्क्रीन मिळू शकते. कंपनी या फोन ला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो सह सादर करणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार मध्ये तुम्हाला चांगले स्पेसिफिकेशन मिळतील. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट आधारित असू शकतो आणि चांगल्या ग्राफिक्स साठी यात एड्रीनो 512 जीपीयू उपलब्ध होऊ शकतो. यात 4जीबी ची रॅम मेमरी मिळू शकते. त्याचबरोबर 64जीबी ची इंटरनल स्टोरेज असू शकते. कॅमेरा पाहता कंपनी यात 12—मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा देऊ शकते. तसेच 8—एमपी चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट च्या मागच्या पॅनल वर तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी असू शकते. जरी या फोन च्या किंमतीची माहिती मिळाली नसली तरी अंदाज लावला जात आहे की हा फोन 30,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च होईल.