Samsung Galaxy F12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Apr 2021 11:38:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy F12 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f12-officially-launch-in-india-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f12-officially-launch-in-india-price-specs-sale-offer/#respond Mon, 05 Apr 2021 11:38:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10498 Samsung Galaxy F12 वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post 6,000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy F12 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनी एकीकडे हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेल्या फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत आहे तर दुसरीकडे लो बजेट सेग्मेंटमध्ये पण कंपनी आपली पकड मजबूत करत आहे. भारतीय मोबाईल युजर्सच्या गरजा समजून सॅमसंग कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येत आहे जे खूप पसंतीस उतरत आहेत. त्यानुसार कंपनीने आज भारतात दोन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F02s आणि Samsung Galaxy F12 लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी एफ02एस एंट्री लेवल डिवायस आहे तर गॅलेक्सी एफ12 48एमपी ट्रिपल कॅमेरा, 90हर्ट्ज डिस्प्ले आणि 6,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. (samsung galaxy f12 officially launch in india price specs sale offer)

लुक व डिजाईन

Samsung Galaxy F12 वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर उजव्या बाजूला वर चौकोनी रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात चार कॅमेरा सेंसर आहेत. फोनचा बॅक पॅनल हलकासा रग्ड बनवण्यात आला आहे ज्यावर वर्टिकल शेप लाईन्सची डिजाईन बनवण्यात आली आहे. फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईपी सी पोर्ट, स्पीकर आणि 3.5एमएम जॅक दिला आहे तर राईट पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण आहे.

Samsung Galaxy F12

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F12 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. सॅमसंगने याला इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ12 अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो वन युआय 3.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 8नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ12 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. इथे एक GM2 सेंसर आहे जो ISOCELL Plus टेक्नोलॉजीवर चालतो. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy F12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्स एफ12 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स व प्राइस

Samsung Galaxy F12 दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिंएटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे, तर 4 जीबी + 128 जीबी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ1 येत्या 12 एप्रिलपासून Sea Green, Sky Blue आणि Celestial Black कलर वेरिएंट्समध्ये विकत घेता येईल.

The post 6,000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy F12 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f12-officially-launch-in-india-price-specs-sale-offer/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy F02s, यात आहे 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 4जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-launch-at-price-rs-8999-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-launch-at-price-rs-8999-specs-sale-offer/#respond Mon, 05 Apr 2021 11:25:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10495 Samsung Galaxy F02s ची फ्रंट डिजाईन तर गॅलेक्सी एफ12 सारखी आहे पण बॅक पॅनलवर डायमंड कट डिजाईन पॅटर्न बनवण्यात आला आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy F02s, यात आहे 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये धमाल करणारी टेक कंपनी Samsung सध्या लो बजेट सेग्मेंटमध्ये पण खूप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कारण भारतात सर्वात जास्त मागणी या सेग्मेंटच्या स्मार्टफोन्सची आहे. स्वस्त स्मार्टफोनची मागणी करणाऱ्या लोकांसाठी सॅमसंगने आज दोन नवीन फोन बाजारात आणले आहेत जे Samsung Galaxy F02s आणि Samsung Galaxy F12 नावाने मार्केटमध्ये आले आहेत. फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या कंपनीच्या Samsung Galaxy F02s ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. (Samsung Galaxy F02s India Launch at Price rs 8999 Specs Sale Offer)

लुक व डिजाईन

Samsung Galaxy F02s ची फ्रंट डिजाईन तर गॅलेक्सी एफ12 सारखी आहे पण बॅक पॅनलवर डायमंड कट डिजाईन पॅटर्न बनवण्यात आला आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. सॅमसंगने याला इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर उजवीकडे आयताकृती रियर कॅमेरा सेटअप बनवण्यात आला आहे ज्यात तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेपमध्ये आहेत तर बाजूला फ्लॅश लाईट आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण उजव्या पॅनलवर देण्यात आले आहेत तर डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे.

Samsung Galaxy F12

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F02s 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एफ02एसने अँड्रॉइड 10 ओएस आधारित वन युआय 2.5 सह बाजारात एंट्री घेतली आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेटवर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एफ02एस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy F02s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy F02s

वेरिएंट व प्राइस

Samsung Galaxy F02s ने दोन वेरिंएट्ससह मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो 4 जीबी रॅमसह 64 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन येत्या 9 एप्रिलपासून Diamond Blue, Diamond White आणि Diamond Black कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy F02s, यात आहे 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-launch-at-price-rs-8999-specs-sale-offer/feed/ 0
Exclusive: असे आहेत 6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12/F12 चे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12f12-specs-exclusive-revealed-quad-cameras-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12f12-specs-exclusive-revealed-quad-cameras-6000mah-battery/#respond Thu, 21 Jan 2021 12:01:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9730 सॅमसंग गॅलेक्सी एम12 किंवा गॅलेक्सी एफ12 6.5 इंचाच्या एचडी + टीएफटी एलसीडी पॅनल सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 6GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज असेल.

The post Exclusive: असे आहेत 6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12/F12 चे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्याच महिन्यात एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि Samsung Galaxy M12 चे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे. आता आम्हाला टिप्सटर ईशान अग्रवालने या अपकमिंग लो-कोस्ट फोन बाबत काही आणि एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. फोनच्या मॉडेल नंबर (गॅलेक्सी SM-M127 / SM-F127) च्या आधारावर एक तर हा गॅलेक्सी M12 असेल किंवा गॅलेक्सी F12 असेल. पण आता हे ठरवणे कठीण आहे कि हा कोणता फोन आहे, कारण हा गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी एफ सीरीजच्या स्मार्टफोनकडे इशारा करतो.

टिप्सटर ईशानने असे पण म्हटले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए82 5जी वर कंपनी काम करत आहे जो 2019 मध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए80 चा संभावित उत्तराधिकारी आहे. स्मार्टफोन येत्या आठवड्यांमध्ये दक्षिण कोरिया मध्ये सादर केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy M12

स्पेसिफिकेशन्स

मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एम12 किंवा गॅलेक्सी एफ12 6.5 इंचाच्या एचडी + टीएफटी एलसीडी पॅनल सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 6GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज असेल. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये कंपनीची Exynos 850 SoC दिली जाईल.

डिवाइस मध्ये 3 जीबी आणि 4 जीबी सह 32/64 जीबी स्टोरेज असलेले लोअर वेरिएंट पण उपलब्ध असतील. स्टोरेज माइक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. अखेरीस गॅलेक्सी M12 किंवा गॅलेक्सी F12 मध्ये 6,000mAh ची बॅटरी असल्याची आशा आहे. हे स्पष्ट नाही कि यात फास्ट चार्जिंग असेल.

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी M12 किंवा गॅलेक्सी F12 च्या मागे क्वाड-कॅमेरा दिला जाईल. यात प्राइमरी 48MP सेंसर सोबत 5MP अल्ट्रा वाइड-अँगल लेंस, 2MP डेप्थ सेंसर आणि 2MP मॅक्रो लेंस असेल. तसेच 8MP चा फोन मध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाईल. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर पण असेल, पण या फोनच्या स्थितीची सध्या माहिती मिळाली नाही.

The post Exclusive: असे आहेत 6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12/F12 चे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12f12-specs-exclusive-revealed-quad-cameras-6000mah-battery/feed/ 0
Samsung ने केली नवीन वर्षाची तयारी, हे दोन स्वस्त फोन इंडियन साईट वर झाले लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-f12-listed-on-bis-launching-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-f12-listed-on-bis-launching-soon-in-india/#respond Thu, 10 Dec 2020 09:08:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9247 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे बीआयएसच्या या लिस्टिंग मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम12 SM-M127G/DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे तसेच गॅलेक्सी एफ12 SM-F127G मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे.

The post Samsung ने केली नवीन वर्षाची तयारी, हे दोन स्वस्त फोन इंडियन साईट वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनीने नवीन वर्षाची तयारी सुरु केली आहे. कंपनी साल 2021 मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन लाॅन्च करण्याचे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा पुरावा म्हणजे सॅमसंगचे दोन स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाइट वर सर्टिफाइड झाले आहेत. कंपनीच्या गॅलेक्सी ‘एफ’ सीरीजचा Samsung Galaxy F12 स्मार्टफोन आणि ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा Samsung Galaxy M12 स्मार्टफोन बीआयएस वर लिस्ट झाला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच आपले हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करणार आहे.

ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे बीआयएसच्या या लिस्टिंग मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम12 SM-M127G/DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे तसेच गॅलेक्सी एफ12 SM-F127G मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. विशेष म्हणजे बीआयएस लिस्टिंग मध्ये अमूमन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स दिसत नाहीत. त्यामुळे सॅमसंगच्या या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स पण समजले नाहीत. पान या लिस्टिंगनेस्पष्ट केले आहे कि कंपनी लवकरच आपल्या हे स्मार्टफोन्स बाजारात घेऊन येणार आहे आणि नवीन वर्षात हे फोन देशात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Samsung Galaxy F41

दोन्ही स्मार्टफोन्सचे लीक्स सोडून अलीकडेच गॅलेक्सी एफ सीरीज मध्ये लाॅन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ 41 पाहता हा फोन भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 512 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. मार्केट मध्ये गॅलेक्सी एफ41 चा 6 जीबी + 64 जीबी वेरिएंट 16,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung ने केली नवीन वर्षाची तयारी, हे दोन स्वस्त फोन इंडियन साईट वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-f12-listed-on-bis-launching-soon-in-india/feed/ 0