Samsung ने केली नवीन वर्षाची तयारी, हे दोन स्वस्त फोन इंडियन साईट वर झाले लिस्ट

Samsung कंपनीने नवीन वर्षाची तयारी सुरु केली आहे. कंपनी साल 2021 मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन लाॅन्च करण्याचे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा पुरावा म्हणजे सॅमसंगचे दोन स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाइट वर सर्टिफाइड झाले आहेत. कंपनीच्या गॅलेक्सी ‘एफ’ सीरीजचा Samsung Galaxy F12 स्मार्टफोन आणि ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा Samsung Galaxy M12 स्मार्टफोन बीआयएस वर लिस्ट झाला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच आपले हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करणार आहे.

ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे बीआयएसच्या या लिस्टिंग मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम12 SM-M127G/DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे तसेच गॅलेक्सी एफ12 SM-F127G मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. विशेष म्हणजे बीआयएस लिस्टिंग मध्ये अमूमन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स दिसत नाहीत. त्यामुळे सॅमसंगच्या या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स पण समजले नाहीत. पान या लिस्टिंगनेस्पष्ट केले आहे कि कंपनी लवकरच आपल्या हे स्मार्टफोन्स बाजारात घेऊन येणार आहे आणि नवीन वर्षात हे फोन देशात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Samsung Galaxy F41

दोन्ही स्मार्टफोन्सचे लीक्स सोडून अलीकडेच गॅलेक्सी एफ सीरीज मध्ये लाॅन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ 41 पाहता हा फोन भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 512 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. मार्केट मध्ये गॅलेक्सी एफ41 चा 6 जीबी + 64 जीबी वेरिएंट 16,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here