Samsung Galaxy Fold - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 01 Oct 2019 11:58:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डायरी प्रमाणे घडी होणारा Samsung Galaxy Fold भारतात झाला लॉन्च, दोन स्क्रीन आणि 6 कॅमेरे आहेत यात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-to-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-to-launched-in-india/#respond Tue, 01 Oct 2019 11:58:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5449 हा फोन कंपनीने 1,64,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post डायरी प्रमाणे घडी होणारा Samsung Galaxy Fold भारतात झाला लॉन्च, दोन स्क्रीन आणि 6 कॅमेरे आहेत यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग ने आज भारतीय बाजारात आपला Galaxy Fold लॉन्च केला आहे. या अनोख्या डिजाइन सह कंपनीने Galaxy Fold फेब्रुवारीत पहिल्यांदा बाजारात सादर केला होता. काही दिवसांपूर्वी हा डिवाईस कंपनीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केला होता.

किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy Fold कंपनीने 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. हा फोन कंपनीने 1,64,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच हा 4 ऑक्टोबर पासून प्री-ऑर्डर करता येईल. तसेच भारतीय 20 ऑक्टोबर नंतर डिवाइस डिलिवर होण्यास सुरवात होईल.

स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगच्या या फोल्डेबल फोन मध्ये 7.3-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन घडी करून छोट्या फोन मध्ये रूपांतरित होतो, ज्यामुळे बाहेरील स्क्रीन 4.6-इंचाची होते. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा आहेत, जे फोन बॉडी मध्ये बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी आहेत. फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/2.2 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

तर दुसरा सेंसर 12एमपी चा आहे जो डुअल पिक्सल ऑटोफोकस, ओआईएस ला सपोर्ट करतो. कंपनीने हा वेरियेबल अपर्चर सह सादर केला आहे. हा एफ/1.5 ते एफ/2.4 पर्यंत शूट करतो. तसेच तिसरा सेंसर टलीफोटो आहे. यात 2एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे. तसेच फोल्डच्या आत पण 10एमपी चा एक कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 सह येतो. त्याचबरोबर तुम्हाला सेल्फी साठी फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. मेन सेंसर 10एमपी चा आहे जो एफ2.2 अपर्चर सह येतो. तिथे आरजीबी सेंसर आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी आहे आणि तो एफ/1.9 अपर्चर वाला आहे.

Samsung Galaxy Fold एंडरॉयड 9 पाई वर आधारित सॅमसंगच्या नवीन वनयूआई इंटरफेस वर चालतो. या फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. यात एक साथ तीन ऍप सह मल्टी टास्किंग करता येईल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरीज देण्यात आल्या आहेत. या दोन्ही बॅटऱ्यांची कपॅसिटी मिळून 4,380एमएएच होते. या दोन्ही बॅटऱ्या वेगवेगळ्या डिस्प्लेला पावर देतील.

The post डायरी प्रमाणे घडी होणारा Samsung Galaxy Fold भारतात झाला लॉन्च, दोन स्क्रीन आणि 6 कॅमेरे आहेत यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-to-launched-in-india/feed/ 0
सॅमसंगच्या घडी होणाऱ्या फोनचे नाव असेल गॅलेक्सी फोल्ड, असतील हि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/samsungs-foldable-phone-will-be-officially-called-galaxy-fold-galaxy-unpacked-event-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsungs-foldable-phone-will-be-officially-called-galaxy-fold-galaxy-unpacked-event-in-marathi/#respond Wed, 20 Feb 2019 12:33:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3676 गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटची लाइव स्ट्रीमिंग सॅमसंगच्या फेसबुक आणि ट्विटर पेज सोबत यूट्यूब चॅनेलवर केली जाईल.

The post सॅमसंगच्या घडी होणाऱ्या फोनचे नाव असेल गॅलेक्सी फोल्ड, असतील हि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन कंपनी सॅमसंग आज म्हणजे 20 फेब्रुवारीला आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजचे नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. सॅन फ्रँसिस्को मध्ये आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंट मध्ये गॅलेक्सी एस10+, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10ई स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील. तसेच रिपोर्ट्स नुसार कंपनी गॅलेक्सी एस10 सीरीज व्यतिरिक्त आपला पहिला फोल्डेबल फोन पण लॉन्च करेल.

आता लॉन्चच्या थोडावेळ आधीच या फोल्डेबल डिवाइसचे ऑफिशल नाव लीक झाले आहे. पॉप्युलर टिपस्टर इवान ब्लास ने ट्वीट करून सांगितले कि कंपनीच्या या फोल्डेबल फोनचे ऑफिशल नाव ‘सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड’ असेल. आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्स मध्ये या फोल्डेबल फोनला गॅलेक्सी एफ, गॅलेक्सी फ्लेक्स आणि गॅलेक्सी एक्स अशी नावे देण्यात आली होती.

डुअल कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला वीवोचा स्वस्तातला फोन यू1

सॅन फ्रँसिस्को मध्ये होणारा इवेंट आज संध्यकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार 21 फेब्रुवारी 12:30 वाजता) सुरु होईल. इतकेच तर गॅलेक्सी एस10 सीरीजच्या या फोन्सची प्री-बुकिंग पण आज रात्री सुरु होईल.

गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटची लाइव स्ट्रीमिंग सॅमसंगच्या फेसबुक आणि ट्विटर पेज सोबत यूट्यूब चॅनेलवर केली जाईल. लॉन्चच्या आधी या सर्व फोन्स बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत.

48एपमी ट्रिपल कॅमेरा, 32एमपी पॉपअप सेल्फी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला वीवो वी15 प्रो

गॅलेक्सी एस10 सीरीज मध्ये असू शकतात हे फीचर्स
समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+, एस10ई मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर असेल. तसेच गॅलेक्सी एस10 चे 6जीबी/8जीबी रॅम सोबत 128जीबी/512जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट असतील. गॅलेक्सी एस10+ पाहता याचे 6जीबी/8जीबी/12जीबी रॅम सह 128जीबी/512जीबी आणि 1टीबी स्टोरेज वेरिएंट सादर केले जाऊ शकतात. शेवटी बोलूया गॅलेक्सी एस10 सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी एस10ई बद्दल, यात 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असेल.

The post सॅमसंगच्या घडी होणाऱ्या फोनचे नाव असेल गॅलेक्सी फोल्ड, असतील हि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsungs-foldable-phone-will-be-officially-called-galaxy-fold-galaxy-unpacked-event-in-marathi/feed/ 0