काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि वीवो लवकरच आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. पण यावेळी सीरीज अगदी नवीन असेल. कंपनी यू1 नावाने नवीन मॉडेल सादर करू शकते. आज कंपनी ने हा फोन समोर आणला आहे. मिड रेंजचा हा फोन दिसायला खूप स्टाइलिश आहे आणि फीचर्स पण दमदार आहेत. पण वीवो यू1 सध्या चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे पण कंपनी हा लवकरच भारतात पण सादर करू शकते. हा फोन ऑरा, ऑरा रेड आणि स्टारी नाइट ब्लॅक सहित तीन रंगात उपलब्ध आहे.
वीवो यू1 चे स्पेसिफिकेशन
वीवो यू1 कंपनी ने ग्लास फिनिश पॉलिकार्बोनेट बॉडी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच असलेली स्क्रीन आहे जी 19:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. फोनची स्क्रीन साइज 6.2—इंच आहे आणि एचडी+ रेजल्यूशन सह येतो. कंपनी ने 2.5डी कर्व्ड ग्लासचा वापर केला आहे. स्क्रीन प्रोटेक्शन बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
वीवो यू1 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट सह सादर केला गेला आहे. यात तुम्हाला 1.95गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी सह येतो. तसेच फोन मध्ये 256जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोनचा प्रोसेसर थोडा जुना आहे असे म्हणता येईल.
वीवोचा हा फोन फनटच ओएस 4.5 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. पण हि ऑपरेटिंग सिस्टम आता जुनी झाली आहे. हा एंडरॉयड 9 पाई वर सादर झाला असता तर चांगले झाले असते.
वीवो यू1 चा कॅमेरा
वीवो यू1 च्या बॅक पॅनल मध्ये कंपनी ने डुअल कॅमेरा दिला आहे. यात मेन सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक पण देण्यात आला आहे.
वीवो यू1 कनेक्टिविटी
या फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट सह 4जी वोएलटीई आहे. तसेच चार्जिंग व डेटा ट्रांसफर साठी माइक्रो यूएसबी देण्यात आला आहे. चांगली बाब अशी कि पावर बॅकअप साठी 4030 एमएएच ची मोठी बॅटरी यात आहे.
राहिला प्रश्न किंमतीचा तर चीन मध्ये हा 1199 यूआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करन्सीनुसार 11,000 रुपये होतात.


















