Samsung Galaxy M01 Core - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 15 Mar 2021 10:36:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung ने पुन्हा नाराज केले आपल्या ग्राहकांना, लो बजेटमधील Galaxy M01 Core ची वाढवली किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-price-hike-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-price-hike-in-india/#respond Mon, 15 Mar 2021 10:36:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10331 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार कोरियन कंपनीने भारतात Samsung Galaxy M01 Core महाग केला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनची विक्री आता 4,999 रुपयांच्या ऐवजी 5,199 रुपयांपासून सुरू होत आहे.

The post Samsung ने पुन्हा नाराज केले आपल्या ग्राहकांना, लो बजेटमधील Galaxy M01 Core ची वाढवली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung साठी मागचे वर्ष भारतीय बाजारात खुप शानदार गेले होते. यावर्षी कंपनी आपले नवे फोन्स सादर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात कंपनीद्वारे भारतीय बाजारात Galaxy A52 आणि Galaxy A72 सादर केले जातील. दुसरीकडे कंपनी आपल्या ग्राहकांना एकामागून एक झटके पण देत आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या लो बजेट Galaxy M02 फोनची किंमत वाढवली होती. आता पुन्हा कंपनीने स्वस्त फोनची किंमत वाढवली आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार कोरियन कंपनीने भारतात Samsung Galaxy M01 Core महाग केला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनची विक्री आता 4,999 रुपयांच्या ऐवजी 5,199 रुपयांपासून सुरू होत आहे.

नवीन किंमत
सॅमसंगने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या या फोनची किंमत 200 रुपयांनी वाढवली आहे. Samsung Galaxy M01 Core चा 1 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज वेरिएंट आधी 4,999 रुपयांमध्ये विकला जात होता जो आता 5,199 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर, 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट आधी 5,999 रुपयांमध्ये विकला जात होता जो आता 6,199 रुपयांमध्ये विकला जाईल. कंपनीच्या साइटवर फोन अजूनही कमी किंमतीत विकला जात आहे.

Samsung Galaxy M01 Core
सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर लो एंड मोबाईल आहे जो जुन्या डिजाईन वर सादर झाला आहे. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही उलट स्क्रीनच्या चारही बाजूंना बेजल्स आहेत. हा फोन कंपनीने 5.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M01 Core अँड्रॉइड गो आधारित स्मार्टफोन आहे जो वन यूआई सह क्वॉड कोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

Samsung Galaxy M01 Core च्या बॅक पॅनल वर फोटोग्राफीसाठी फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Samsung ने पुन्हा नाराज केले आपल्या ग्राहकांना, लो बजेटमधील Galaxy M01 Core ची वाढवली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-price-hike-in-india/feed/ 0
Samsung Galaxy M01s आणि Galaxy M01 Core झाले अजून स्वस्त, आता फक्त 4999 रुपयांपासून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-m01-core-price-cut-in-india-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-m01-core-price-cut-in-india-specs-sale/#respond Fri, 18 Sep 2020 10:07:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8214 जुलै मध्ये सॅमसंगने दोन लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M01s आणि Samsung Galaxy M01 Core भारतात लॉन्च केले होते, ते आता कंपनीने अजूनही स्वस्त केले आहेत.

The post Samsung Galaxy M01s आणि Galaxy M01 Core झाले अजून स्वस्त, आता फक्त 4999 रुपयांपासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung चे हे वर्ष भारतीय बाजारात चांगले जात आहे. या कोरियन कंपनीने प्रत्येक बजेट मध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले मोबाईल फोन भारतीय बाजारात आणले आहेत, जे लोकांना आवडत आहेत. जुलै मध्ये सॅमसंगने दोन लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M01s आणि Samsung Galaxy M01 Core भारतात लॉन्च केले होते, ते आता कंपनीने अजूनही स्वस्त केले आहेत. सॅमसंगच्या या स्मार्टफोन्सची विक्री आता फक्त 4,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

सॅमसंगने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. Samsung Galaxy M01s 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता जो आता 8,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. दुसरीकडे Samsung Galaxy M01 Core चा 1 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 5,499 रुपये तर 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता प्राइस कट नंतर हे क्रमश: 4,999 रुपये आणि 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

Samsung Galaxy M01s

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M01s च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम01एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम01एस मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M01 Core

सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर लो एंड मोबाईल आहे जो जुन्या डिजाईन वर सादर झाला आहे. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही उलट स्क्रीनच्या चारही बाजूंना बेजल्स आहेत. हा फोन कंपनीने 5.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M01 Core अँड्रॉइड गो आधारित स्मार्टफोन आहे जो वन यूआई सह क्वॉड कोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

Samsung Galaxy M01 Core च्या बॅक पॅनल वर फोटोग्राफीसाठी फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर येत्या 29 जुलै पासून Black, Blue आणि Red कलर वेरिएंट मध्ये ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy M01s आणि Galaxy M01 Core झाले अजून स्वस्त, आता फक्त 4999 रुपयांपासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-m01-core-price-cut-in-india-specs-sale/feed/ 0
फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01 Core https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-launched-in-india-price-at-rs-5499-sale-offer-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-launched-in-india-price-at-rs-5499-sale-offer-specs/#respond Mon, 27 Jul 2020 09:53:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7698 Samsung Galaxy M01 Core कंपनीने भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे.

The post फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01 Core first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M01s लॉन्च केला होता जो 9,999 रुपयांमध्ये आला होता. 3 जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी असलेला हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. गॅलेक्सी एम01एस नंतर या सीरीज मध्ये सॅमसंगने अजून एक स्वस्त मोबाईल Samsung Galaxy M01 Core पण लॉन्च केला आहे जो फक्त 5,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M01 Core कंपनीने भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 1 जीबी रॅम सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच गॅलेक्सी एम01 कोर चा दुसरा वेरिएंट 2 जीबी रॅम + 32 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. फोनचा 1 जीबी रॅम वेरिएंट फक्त 5,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल तर फोनचा 2 जीबी रॅम वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M01 Core

सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर लो एंड मोबाईल आहे जो जुन्या डिजाईन वर सादर झाला आहे. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही उलट स्क्रीनच्या चारही बाजूंना बेजल्स आहेत. हा फोन कंपनीने 5.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M01 Core एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन आहे जो वन यूआई सह क्वॉड कोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

Samsung Galaxy M01 Core च्या बॅक पॅनल वर फोटोग्राफीसाठी फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर येत्या 29 जुलै पासून Black, Blue आणि Red कलर वेरिएंट मध्ये ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

Samsung Galaxy M01s

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M01s च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम01एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम01एस मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01 Core first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-launched-in-india-price-at-rs-5499-sale-offer-specs/feed/ 0