Samsung Galaxy Note10+ - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ची किंमत झाली लीक, 7 ऑगस्टला होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-galaxy-note10-plus-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-galaxy-note10-plus-price/#respond Tue, 16 Jul 2019 12:24:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4802 गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 1,100 डॉलर पासून 1,200 डॉलर पर्यंत असू शकते.

The post Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ची किंमत झाली लीक, 7 ऑगस्टला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागील काही दिवसांपासुन Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ बद्दल माहिती समोर येत आहे. तसेच 91मोबाईल्सने अलीकडेच एफसीसी वर आलेला Galaxy Note 10 चा फोटो तुमच्या समोर आणला होता. आता या अपकमिंग हँडसेटची किंमत लीक झाली आहे.

नवीन लीकनुसार, Galaxy Note 10 चा 256जीबी स्टोरेज वेरिएंट युरोपियन मार्केट मध्ये 999 यूरो (जवळपास 77,000 रुपये) मध्ये सादर केला जाईल. तसेच Galaxy Note 10+ ची किंमत पण लीक झाली आहे. WinFuture च्या रिपोर्ट नुसार, गॅलेक्सी नोट 10 ची बेसिक किंमत 999 यूरो (जवळपास 77,000 रुपये) असेल.

Galaxy Note 10+ ची किंमत 1,149 यूरो (जवळपास 89,000 रुपये) असेल. हि किंमत 256 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये येणाऱ्या फोनची असेल. तसेच रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि गॅलेक्सी नोट 10 सीरीज साठी प्री-ऑर्डर 9 ऑगस्ट पासून सॅमसंगच्या घरच्या मार्केट मध्ये सुरु होईल.

हे देखील वाचा: लहान मुलगी वापरत होती iPhone 6, अचानक लागली आग

तसेच SamMobile च्या रिपोर्ट नुसार सॅमसंग साउथ कोरिया मध्ये फक्त गॅलेक्सी नोट 10 चा 5जी वेरिएंट लॉन्च करेल. तर अंतरराष्ट्रीय बाजारात 5जी आणि 4जी दोन्ही मॉडेल मिळतील. गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 1.2 मिलियन दक्षिण कोरियाई वॉन (जवळपास 70,000 रुपये) पासून सुरु होऊ शकते, तर गॅलेक्सी नोट 10+ च्या बेस वेरिएंटची किंमत 1.4 मिलियन दक्षिण कोरियाई वॉन (जवळपास 81,500 रुपये) असू शकते.

काही आठवड्यांपूर्वी हा फोन गीकबेंच वर सर्टिफाइड झाला होता त्या नुसार यात स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सोबतच 6जीबी रॅम असेल. तसेच आता पर्यंत समोर आलेल्या लीक माहिती नुसार गॅलेक्सी नोट 10 मध्ये 6.4-इंचाचा डायनमिक एमोल्ड डिस्प्ले मिळू शकतो आणि हा डिवाइस 128 जीबी स्टोरेज ऑप्शन वाल्या बेस वेरियंट सह येऊ शकतो. सोबतच यात 4,170एमएएच ची बॅटरी असल्याचे पण समोर आले आहे. दुसरीकडे गॅलेक्सी नोट 10 प्रो मॉडेल मध्ये यापेक्षा थोडा मोठा 6.8 इंचाचा एमोल्ड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. बोलले जात आहे कि हा स्टॅंडर्ड 256जीबी स्टोरेज वाला ऑप्शन असेल, ज्याचा अजून एक वेरियंट 1 टीबी मेमरी सह येऊ शकतो. यात पण 4,170एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा: Exclusive : Realme 5 पण होईल भारतात लॉन्च, कंपनी दिवाळीच्या आधी घेऊन येईल हा फोन

इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात एका रशियन पब्लिकेशन Hi Tech Mail ने माहिती दिली होती कि गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 1,100 डॉलर पासून 1,200 डॉलर पर्यंत असू शकते. बोलले जात आहे कि हा कंपनीच्या नोट 10 चा अफोर्डेबल वर्जन असेल, ज्यात रेग्युलर वेरियंट पेक्षा काही कमी फीचर्स दिले जातील.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 वीडियो

The post Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ची किंमत झाली लीक, 7 ऑगस्टला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-galaxy-note10-plus-price/feed/ 0