Realme ने आज इंडियन मार्केट मध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Realme X आणि Realme 3i चा समावेश आहे. Realme X हाईएंड फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आला आहे तर Realme 3i कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केला आहे. या दोन्ही फोन व्यतिरिक्त आगामी काळात भारतात अजून एक नवीन डिवाईस लॉन्च करेल जो ‘Realme 5’ असेल. Realme च्या प्रोडक्ट लॉन्च वेळी 91मोबाईल्सला Realme 5 संबंधित एक्सक्लुसिव्ह माहिती मिळाली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी दिवाळीच्या आधी Realme 5 स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल.
91मोबाईल्सला Realme 5 संबंधित बातमी स्वतः कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. रियलमीच्या अधिकाराच्या मते कंपनी भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो मध्ये आता अजून नवीन व आधुनिक डिवाईस आणेल. त्यासाठी कंपनी Realme 5 स्मार्टफोन वर पण काम करत आहे आणि हा स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत दिवाळीच्या आधी बाजारात सादर केला जाईल. सोबतच Realme च्या अधिकाऱ्यांनी असे पण स्पष्ट केले आहे कि सध्या इंटरनेट वर वायरल असलेला Realme 4 चा रिटेल बॉक्स पूर्णपणे खोटा आहे आणि कंपनीने हा फोन व फोन बॉक्स निर्माण केलेला नाही.
Realme 3i
आज लॉन्च झालेला Realme 3i पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे हा फोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Realme 3i मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Realme 3i डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3i मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या एका वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तर दुसरा वेरिंएट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हा फोन डायमंड ब्लू, ब्लॅक आणि रेड कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.
Realme X
Realme X भारतात 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे या दोन्ही वेरिएंट्सच्या किंमती क्रमश: 16,999 रुपये आणि 19,999 रुपये आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.53-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आला आहे. तसेच एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर झालेला हा फोन क्वॉलकॉम के स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी साठी Realme X मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 3,765एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इंडियन मार्केट मध्ये Realme X पोलर व्हाईट आणि स्पेस ब्लू कलर मध्ये लॉन्च हुआ आहे.
रियलमी एक्स वीडियो