Samsung Galaxy Note20 FE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 03 Nov 2020 14:47:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-fe-accidentally-mentioned-on-official-website-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-fe-accidentally-mentioned-on-official-website-launch-soon/#respond Tue, 03 Nov 2020 14:47:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8793 Galaxy Note 20 FE बद्दल जास्त लीक आले नाहीत आणि वर सांगितल्या प्रमाणे कंपनीने सध्या फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

The post Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगद्वारे Galaxy S20 नंतर Galaxy Note 20 लाइनअपचा फॅन एडिशन लॉन्च केला जाऊ शकतो. हा डिवाइस कंपनी Samsung Galaxy Note20 FE नावाने सादर करू शकते. कंपनीने आपल्या नवीन गॅलेक्सी एफई मॉडेलबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, पण सॅमसंग ब्राजीलच्या वेबसाइट वर काही काळासाठी गॅलेक्सी नोट 20 एफई दिसला होता.

SamMobile च्या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि कंपनीच्या ब्राजीलियन वेबसाइट मध्ये Samsung Galaxy S20 FE च्या लँडिंग पेज वर Samsung Galaxy Note 20 FE चा उल्लेख केला गेला आहे. कंपनीने कथितरित्या गॅलेक्सी नोट 20 एफई मॉनीकरचा उल्लेख लँडिंग पेजच्या सोर्स मध्ये पण केला आहे. पण हि बातमी लिहताना साइट अपडेट करण्यात आली होती आणि हि माहिती सध्या वेबसाइट वर उपलब्ध नाही.

सध्या Galaxy Note 20 FE बद्दल जास्त लीक आले नाहीत आणि वर सांगितल्या प्रमाणे कंपनीने सध्या फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे कि येत्या काळात हा फोन मार्केट मध्ये लवकरच सादर केला जाऊ शकतो.

लक्षात असू दे कि फॅन एडिशन फोन लॉन्च करण्याचे चलन सप्टेंबर मध्ये Samsung Galaxy S20 FE द्वारे सुरु केले गेले आहे. हा विशेष मॉडेल गॅलेक्सी एस20 फ्लॅगशिपचा लाइट वर्जन म्हणून येतो आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हा अनेक रंगांच्या ऑप्शन मध्ये सादर केला आहे.

हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

गॅलेक्सी S20 FE गेल्या महिन्यात भारतात 49,990 रुपयांमध्ये सादर केला गेला होता. फोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले सारखे प्रभावी स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. तसेच फोन Exynos 990 SoC वर चालतो ज्यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. फोन OneUI 2.5 कस्टम लेयर सह Android 10 OS चालतो. कॅमेऱ्यासाठी सॅमसंग गॅलेक्सी S20 FE मध्ये एक 12MP वाइड-अँगल कॅमेरा, एक 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आणि 3x ऑप्टिकल झूम सह 8MP टेलीफोटो आणि 30x सुपर-रिजॉल्यूशन झूम सह एक ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

सोर्स

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 व्हिडीओ

The post Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-fe-accidentally-mentioned-on-official-website-launch-soon/feed/ 0