9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

Samsung ने या महिन्याच्या सुरवातीलाच आपल्या ‘गॅलेक्सी एस20 सीरीज’ चा लेटेस्ट स्मार्टफोन Samsung Galaxy S20 Fan Edition लॉन्च केला आहे जो स्टाईलिश लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात आणला आहे ज्याची बेस किंमत 49,999 रुपये आहे. पण आपला फॅन्स पर्यंत हा फोन पोहोचवण्यासाठी सॅमसंगने दिवाळीच्या निमित्ताने शानदार ऑफर सादर केली आहे ज्यात गॅलेक्सी एस20 एफई थेट 9,000 रुपये स्वस्तात विकत घेता येईल.

Samsung Galaxy S20 FE विकत घेतल्यास स्पेशल फेस्टिव ऑफर अंतगर्त सॅमसंग डायरेक्ट 5,000 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक देत आहे. त्याचबरोबर गॅलेक्सी एस20 एफई जर एचडीएफसी बँकेच्या कोणत्याही कार्डने विकत घेतला तर 4,000 रुपयांचा एक्स्ट्रा कॅशबॅक पण मिळेल. म्हणजे फोनच्या किंमतीत थेट 9,000 रुपयांची मोठी सूट. सॅमसंगची हि आज पासून येत्या 17 नोव्हेंबर पर्यंत चालेल.

अशी असेल नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई भारतात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 53,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. ऑफर अंतगर्त फोनचा 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 40,999 रुपये तर 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 44,999 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे. हा फोन Cloud Red, Cloud Lavender, Cloud Mint, Cloud Navy आणि Cloud White कलर मध्ये विकत घेता येईल.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S20 FE कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वरच्या बाजूला फक्त मधोमध फक्त 3.34mm साईजचा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर चालतो.

Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.73 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट आक्टा-कोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर फेब्रिकेशन वर बनलेला सॅमसंगचा पावरफुल एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Exclusive: या दमदार फीचर्स सह एंट्री करेल Samsung Galaxy S21 Ultra, लवकरच होईल लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूला डावीकडे बनलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S20 Fan Edition आईपी68 रेटिड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफई मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलीली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो.

सॅमसंग गॅलेक्साी एस20 एफसी व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here