Samsung Galaxy S20 Ultra - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Feb 2020 14:12:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra या किंमतीती करा प्री-बुक, मिळतील शानदार ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-series-india-prices-announced-pre-booking-starts/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-series-india-prices-announced-pre-booking-starts/#respond Mon, 17 Feb 2020 14:12:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6619 Galaxy S20 Ultra प्री-बुक करणारे ग्राहक गॅलेक्सी बड्स+ ट्रू वायरलेस ईयरबड्स आणि सॅमसंग केयर+ सब्सक्रिप्शन 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील.

The post Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra या किंमतीती करा प्री-बुक, मिळतील शानदार ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लॉन्च केला गेले होते. आता हे प्री-बुकिंगसाठी आले आहेत. इतकेच नव्हे तर प्री-बुकिंग सोबतच भारतात यांच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. हि सीरीज प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी काही ऑफर्सची घोषणा पण केली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या सीरीजची भारतातील किंमत, सेल ऑफर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत.

Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एस20 ची भारतात किंमत 66,999 रुपयांपासून सुरु होईल. गॅलेक्सी एस20+ ची भारतात किंमत 73,999 रुपयांपासून सुरु होईल आणि गॅलेक्सी एस20 अल्ट्रा ची किंमत 92,999 रुपयांपासून सुरु होईल. ग्राहक हे तीनही गॅलेक्सी फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट वर बुक करू शकतात. कंपनीचा दावा आहे कि फोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना गॅलेक्सी एस20 6 मार्च 2020 पासून मिळण्यास सुरवात होईल.

ऑफर्स

सॅमसंगने हि सीरीज बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर केल्या आहेत. Galaxy S20 प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Buds+ ट्रू वायरलेस ईयरबड्स 2,999 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळेल आणि सोबत सॅमसंग केयर+ चे सब्सक्रिप्शन 1,999 रुपयांमध्ये दिला जाईल. तसेच Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra प्री-बुक करणारे ग्राहक गॅलेक्सी बड्स+ ट्रू वायरलेस ईयरबड्स आणि सॅमसंग केयर+ सब्सक्रिप्शन 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील.

Samsung Care+ एक ऍक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन प्लान आहे, जो फोनचे नुकसान झाल्यास युजरला रिपेयरिंग वर होणाऱ्या खर्चापासून वाचवतो. हे सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी वैध असेल.

इतकेच नव्हे तर यूजर्सना ऑफर्स अंतर्गत एयरटेल, जियो आणि वोडाफोन आइडिया ग्राहकांसाठी पण सॅमसंगने ऑफर्स सादर केली आहे. यात डबल डेटा आणि 1 वर्षांची अनलिमिटेड सर्विस इत्यादी फायद्यांचा समावेश करण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra या किंमतीती करा प्री-बुक, मिळतील शानदार ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-series-india-prices-announced-pre-booking-starts/feed/ 0
16GB RAM, 108MP क्वाड कॅमेरा आणि 40MP सेल्फी, जाणून घ्या किती दमदार आहे Samsung Galaxy S20 Ultra https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-ultra-launched-16gb-ram-5000mah-battery-40mp-selfie-108mp-quad-rear-camera-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-ultra-launched-16gb-ram-5000mah-battery-40mp-selfie-108mp-quad-rear-camera-specs-price/#respond Wed, 12 Feb 2020 07:02:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6570 Samsung Galaxy S20 आणि Samsung Galaxy S20+ सह Galaxy S20 Ultra आला आहे जो अल्ट्रा पावर मुळे कोणत्याही फोनला मात देऊ शकतो.

The post 16GB RAM, 108MP क्वाड कॅमेरा आणि 40MP सेल्फी, जाणून घ्या किती दमदार आहे Samsung Galaxy S20 Ultra first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ची Galaxy S सीरीज नेहमीच दमदार असते आणि आज कंपनीने 2020 मध्ये नवीन Galaxy S20 सीरीज सादर केली आहे. कंपनीने एक साथ तीन फोन लॉन्च केले आहेत. Samsung Galaxy S20 आणि Samsung Galaxy S20+ सह Galaxy S20 Ultra आला आहे जो अल्ट्रा पावर मुळे कोणत्याही फोनला मात देऊ शकतो. कंपनीने हा खूप दमदार प्रोसेसर सह सादर केला आहे तसेच 16जीबी रॅम मुळे याची उंची अजून वाढते. मोठी बॅटरी आणि 100X जूम सारखे फीचर्स पण या फोनची शान वाढवतात. Galaxy S20 आणि Galaxy S20+ ची माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. पुढे आम्ही Samsung Galaxy S20 Ultra बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy S20 Ultra कंपनीने फुल व्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे ज्याला कंपनीने इनफिनिटी ओ चे नाव दिले आहे. या पंच होल मध्ये सेल्फी कॅमेरा फिट आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा ची स्क्रीन दोन्ही बाजुंनी कर्व्ड आहे. तसेच रियर पॅनल पाहता त्यावर उजवीकडे क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकाराचा आहे. तीन कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट चौकोनी आकारात वरच्या बाजूला आहे तसेच याच्या खाली डेफ्थ विजन कॅमेरा लेंस देण्यात आली आहे. या लेंसच्या बाजूला Space Zoom 100X लिहिण्यात आले आहे. अर्थात तुम्ही समजू शकता कि यात 100X पर्यंत Zoom सपोर्ट आहे. याची बॉडी ग्लास ने बनली आहे जी प्रीमियम वाटते.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला कंपनीची ब्रॅंडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर सह यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. Samsung Galaxy S20 Ultra चे डायमेंशन 166.9 x 76.0 x 8.8एमएम आहेत तर फोनचे वजन 220ग्राम आहे. हा फोन Cosmic Grey आणि Cosmic Black कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

डिस्प्ले

Samsung Galaxy S20 Ultra फक्त आकारत मोठा नाही तर शानदार विजुअल क्वॉलिटी असलेल्या डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये 3200 X 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.9 इंचाचा क्वॉड एचडी+ डायनामिक एमोलेड 2एक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन एचडीआर10+ सर्टिफाइड आहे आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. कंपनीने माहिती दिली आहे कि बाय डिफॉल्ट हा 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर असतो त्यामुळे 120हर्ट्जसाठी तुम्हाला सेटिंग ऑन करावी लागेल.

कॅमेरा सेग्मेंट

Samsung Galaxy S20 Ultra क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याचा मेन कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तसेच यात वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी ओआईएस व पीडीएएफ सारख्या फीचर्स सह येते. त्याचबरोबर या फोन मध्ये एफ/3.5 अपर्चर असलेली 48 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे आणि सोबत ओआईएस व पीडीएएफ सपोर्ट देण्यात आला आहे. तिसरा सेंसर एफ/2.2 अपर्चर सह येतो आणि कंपनीने 12 मेगापिक्सलची लेंस दिली आहे. हि लेंस अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करते. फोटोग्राफी शानदार व्हावी म्हणून रियर कॅमेरा सेटअप सह खाली डेफ्थ विजन कॅमेरा लेंस पण आहे.

सेल्फीसाठी कंपनीने Samsung Galaxy S20 Ultra एफ/2.2 अपर्चर असलेला 40 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

प्रोसेसिंग

दरवेळी आपण पाहतो कि सॅमसंग आपले फ्लॅगशिप फोन दोन प्रोसेसर सह सादर करते. यावेळी पण असेच झाले आहे. कंपनीने हा एएक्सिनोस 910 आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर सादर केला आहे. भारतात Samsung Galaxy S20 Ultra एक्सिनोस चिपसेट सह उपलब्ध होईल. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 7 एनएस फॅब्रिकेशन असलेला प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड सह येतो. कंपनीने 64बिट्स असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर केला आहे.

सॉफ्टवेयर

हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंगच्या यूजर इंटरफेस यूआई 2.0 वर चालतो. त्याचबरोबर तुम्हाला वाईफाई कॉलिंग आणि स्मार्ट स्क्रीन आणि सॅमसंग डेक्स सारखे फीचर्स मिळतील ज्यात तुम्ही तुकम फोन एखाद्या केबलच्या माध्यमातून स्क्रीन वर कास्ट करू शकता.

रॅम व स्टोरेज

Samsung Galaxy S20 Ultra ग्लोबल मंचावर तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा सर्वात मोठा वेरिएंट 16 जीबी रॅम मेमरी सह 512 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी देण्यात आली आहे आणि तिसरा वेरिएंट 12 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे तिन्ही वेरिएंट LPDDR5 रॅम सह येतात आणि 5G व LTE दोन्ही कनेक्टिविटीला सपोर्ट करतात.

सिक्योरिटी व बॅटरी

Samsung Galaxy S20 Ultra कपंनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह लॉन्च केला आहे. त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 45वॉट सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा टाईप सी पोर्ट सोबत वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो.

वॉटरप्रूफ

हा फोन आईपी68 सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा पाणी व धुळीपासून वाचतो. हा फोन दीड मीटर पाण्यात 30 मिनिटे राहू शकतो.

The post 16GB RAM, 108MP क्वाड कॅमेरा आणि 40MP सेल्फी, जाणून घ्या किती दमदार आहे Samsung Galaxy S20 Ultra first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-ultra-launched-16gb-ram-5000mah-battery-40mp-selfie-108mp-quad-rear-camera-specs-price/feed/ 0
Samsung Galaxy S20 आणि Galaxy S20 Plus लॉन्च, यात आहे 12 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-launched-5g-phone-full-specifications-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-launched-5g-phone-full-specifications-price-sale/#respond Wed, 12 Feb 2020 06:24:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6567 एक साथ तीन फोन लॉन्च केले आहेत ज्यात Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20 Plus आणि Samsung Galaxy S20 Ultra चा समावेश आहे. लवकरच हे तिन्ही फोन भारतात उपलब्ध होतील.

The post Samsung Galaxy S20 आणि Galaxy S20 Plus लॉन्च, यात आहे 12 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेनंतर सॅमसंगने आपली नवीन गॅलेक्सी एस20 सीरीज लॉन्च केली. कंपनीने सॅन फ्रॅसिको मध्ये आयोजित ईवेंट मध्ये एक साथ तीन फोन लॉन्च केले आहेत ज्यात Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20 Plus आणि Samsung Galaxy S20 Ultra चा समावेश आहे. हे तिन्ही स्मार्टफोन सॅमसंगचे 5G फोन आहेत जे 4G LTE कनेक्टिविटीला पणला सपोर्ट करतात. लवकरच हे तिन्ही फोन भारतात उपलब्ध होतील. आम्हला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मार्च मध्ये हे लॉन्च केले जाऊ शकतात. Galaxy S20 Ultra च्या बातमीसाठी तुम्ही इथे क्लिक करा. राहिला प्रश्न सॅमसंग गॅलेक्सी एस20 आणि एस20 प्लस चा तर पुढे आम्ही यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Samsung Galaxy S20

सॅमसंग गॅलेक्सी एस20 ग्लास बॉडी मध्ये सादर केला गेला आहे जो प्रीमियम वाटतो . या फोन मध्ये 6.2 इंचाचा क्वॉड एचडी+ एमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 3200 X 1440 पिक्सल रेज्ल्यूशन सह येतो. कंपनीने पहिल्यांदाच आपल्या फोन मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटचा वापर केला आहे जो स्मूथ ऍनिमेशन सह शानदार व्यूजुअल क्वॉलिटी देतो. Samsung Galaxy S20 एंडरॉयड 10 वर चालतो आणि यात वन यूआई ची लेयरिंग मिळेल. तसे पाहता जागतिक मंचावर हा दोन प्रोसेसर सह सादर केला गेला आहे पण भारतात 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेल्या एक्सिनोस 910 चिपसेट सह उपलब्ध होईल. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.7गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S20 चे दोन मॉडेल इंटरनेशन मार्केट मध्ये आले आहेत. फोनचा 5G मॉडेल 12 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर 4G मॉडेल मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी पण यावेळीचे सॅमसंग फोन खूप दमदार आहेत. Samsung Galaxy S20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एक कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. हा सेंसर एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करतो आणि हि टेलीफोटो लेंस आहे. तर दुसरा सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. हा सेंसर अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. यासोबत तिसरा सेंसर एफ/1.8 अपर्चर असलेला आहे आणि कंपनीने 12 मेगापिक्सलच्या लेंसचा वापर केला आहे. हा सेंसर पण वाइड अँगलला सपोर्ट करतो. हा सुपर स्पीड डुअल पिक्सल फीचर सह येतो. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy S20 10 मध्ये मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे जो एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हि 45 वॉट पर्यंतच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy S20 कपंनीने Cosmic Grey, Cloud Blue आणि Cloud Pink कलर मध्ये लॉन्च केला आहे.

Samsung Galaxy S20 Plus

डिजाइनच्या बाबतीत हा फोन एस20 सारखाच आहे पण स्पेसिफिकेशन मध्ये थोडा फरक आहे. फोनची बॉडी ग्लासची बनली आहे आणि दोन्ही बाजुंनी कर्व आहे. या फोन मध्ये 3200 X 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.7 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये क्वॉड एचडी+ एमोलेड 2एक्स इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आली आहे जी एचडीआर 10+ सर्टिफाइड आहे आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते.

Samsung Galaxy S20+ एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे आणि यात वन यूआई ची लेयरिंग मिळेल. फोन मध्ये तुम्हाला माइक्रोसॉफ्ट ऍप्स व्यतिरिक्त डेक्स सारखे फीचर्स पण मिळतील.

एस20 प्रमाणे हा फोन पण 7 नॅनो मीटर फॅब्रिकेशन असलेल्या एक्सिनोस 910 चिपसेट वर चालतो. यात 2.7गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये 3 5जी वेरियंट आहेत जे 12GB RAM सह 512GB इंटरनल मेमरी, 12GB RAM सह 256GB मेमरी आणि 12GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.

तर 4जी वेरियंट मध्ये 8GB RAM सह 128GB मेमरी देण्यात आली आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1टीबी पर्यंत मेमरी एक्सपांड करू शकता. पण दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S20 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात पण एक सेंसर 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे जी एफ/2.0 अपर्चर सह येते. हि पीडीएएफ आणि ओआईएसला सपोर्ट करते. तर दुसरा सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे आणि हा एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करतो. हि लेंस 120 डिग्री पर्यंत अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करू शकते. तसेच तिसरी लेंस एफ/1.8 अपर्चर सह येते आणि हि 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे. त्याचबरोबर हि सुपर स्पीड डुअल पिक्सल आणि ओआईएस ला पण सपोर्ट करते. कंपनीने यात एक अतिरिक्त सेंसर दिला आहे जो डेफ्थविजन चे काम करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए20 प्लस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. यात वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण आहे. Galaxy S20+ सॅमसंगने Cosmic Grey, Cloud Blue आणि Cosmic Black कलर मध्ये लॉन्च केला आहे.

The post Samsung Galaxy S20 आणि Galaxy S20 Plus लॉन्च, यात आहे 12 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-launched-5g-phone-full-specifications-price-sale/feed/ 0