Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लॉन्च केला गेले होते. आता हे प्री-बुकिंगसाठी आले आहेत. इतकेच नव्हे तर प्री-बुकिंग सोबतच भारतात यांच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. हि सीरीज प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी काही ऑफर्सची घोषणा पण केली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या सीरीजची भारतातील किंमत, सेल ऑफर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत.
Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra ची किंमत
सॅमसंग गॅलेक्सी एस20 ची भारतात किंमत 66,999 रुपयांपासून सुरु होईल. गॅलेक्सी एस20+ ची भारतात किंमत 73,999 रुपयांपासून सुरु होईल आणि गॅलेक्सी एस20 अल्ट्रा ची किंमत 92,999 रुपयांपासून सुरु होईल. ग्राहक हे तीनही गॅलेक्सी फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट वर बुक करू शकतात. कंपनीचा दावा आहे कि फोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना गॅलेक्सी एस20 6 मार्च 2020 पासून मिळण्यास सुरवात होईल.
ऑफर्स
सॅमसंगने हि सीरीज बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर केल्या आहेत. Galaxy S20 प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Buds+ ट्रू वायरलेस ईयरबड्स 2,999 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळेल आणि सोबत सॅमसंग केयर+ चे सब्सक्रिप्शन 1,999 रुपयांमध्ये दिला जाईल. तसेच Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra प्री-बुक करणारे ग्राहक गॅलेक्सी बड्स+ ट्रू वायरलेस ईयरबड्स आणि सॅमसंग केयर+ सब्सक्रिप्शन 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील.
Samsung Care+ एक ऍक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन प्लान आहे, जो फोनचे नुकसान झाल्यास युजरला रिपेयरिंग वर होणाऱ्या खर्चापासून वाचवतो. हे सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी वैध असेल.
इतकेच नव्हे तर यूजर्सना ऑफर्स अंतर्गत एयरटेल, जियो आणि वोडाफोन आइडिया ग्राहकांसाठी पण सॅमसंगने ऑफर्स सादर केली आहे. यात डबल डेटा आणि 1 वर्षांची अनलिमिटेड सर्विस इत्यादी फायद्यांचा समावेश करण्यात आला आहे.













