Samsung Galaxy S22 FE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 04:22:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S22 FE बद्दल टिपस्टरनी दिली माहिती; पाहा डिटेल्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-fe-launch-specs-tipped-again/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-fe-launch-specs-tipped-again/#respond Tue, 27 Dec 2022 06:37:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16379 फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन्सची वाढती संख्या पाहून सॅमसंगनं नवीन फॅन एडिशन सीरिज सुरु केली होती. या सीरिजमध्ये Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE असे दोन स्मार्टफोन लाँच झाले आहेत, जे फ्लॅगशिप लेव्हल फीचर्स कमी किंमतीत देतात. परंतु गेल्यावर्षी कंपनीनं Galaxy S22 FE लाँच केला नव्हता. आता अशी बातमी आली आहे की Samsung Galaxy S22 FE […]

The post Samsung Galaxy S22 FE बद्दल टिपस्टरनी दिली माहिती; पाहा डिटेल्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन्सची वाढती संख्या पाहून सॅमसंगनं नवीन फॅन एडिशन सीरिज सुरु केली होती. या सीरिजमध्ये Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE असे दोन स्मार्टफोन लाँच झाले आहेत, जे फ्लॅगशिप लेव्हल फीचर्स कमी किंमतीत देतात. परंतु गेल्यावर्षी कंपनीनं Galaxy S22 FE लाँच केला नव्हता. आता अशी बातमी आली आहे की Samsung Galaxy S22 FE कंपनीचा सर्वात शेवटचा गॅलक्सी फॅन एडिशन असू शकतो.

पुढील वर्षी येणार Galaxy S22 FE

विश्वासू टिपस्टर्स RGcloudS, OreXda आणि Dohyun Kim यांनी माहिती दिली आहे की, फेब्रुवारी 2023 अनपॅक्ड इव्हेंटमधून S23 series लाँच केल्यानंतर काही दिवसांनी Galaxy S22 FE च्या लाँचसाठी आणखी एक इव्हेंट आयोजित केला जाऊ शकतो. हा फोन कंपनीनं रद्द केलेल्या Galaxy A74 5G स्मार्टफोनची जागा घेऊ शकतो. कारण गॅलॅक्सी ए7 सीरिज आणि गॅलक्सी एफईचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच असतात. आधीच्या रिपोर्ट्सनुसार Galaxy A5x series गॅलक्सी ए मधील टॉपएन्ड स्मार्टफोन सीरिज ठरू शकते. हे देखील वाचा: बाबो! फोन आहे की लॅपटॉप! 16GB रॅम, 165W 6000mAh बॅटरी आणि न दिसणारा सेल्फी कॅमेरा

Samsung Galaxy S22 FE नंतर फॅन एडिशन येणार नाही?

लिक्स्टर RGcloudS नं Galaxy S22 FE मधील कॅमेरा सेन्सर आणि चिपसेटची माहिती दिली आहे. या फोनमध्ये 108MP चा ISOCELL HM6 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून दिला जाऊ शकतो. तर यात 4nm फॅब्रिकेशन प्रोसेसरवर बनलेला सॅमसंगचाच Exynos 2300 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच लीकमधून असं देखील सांगण्यात आलं आहे की Galaxy S22 FE ची रिटेल प्राईस Galaxy A7x series इतकी असू शकते.

तर टिपस्टर OreXda नं सांगितलं आहे की लवकरच Galaxy S22 FE आणि Galaxy Buds2 बाजारात लाँच होऊ शकतात. तर टिपस्टर Dohyun Kim नुसार गॅलॅक्सी एस 23 सीरिजमध्ये फॅन एडिशन असणार नाही. म्हणजे सॅमसंग फ्लॅगशिप स्मार्टफोनमधील स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स स्वस्तात देणारी आपली फॅन एडिशन सीरिज बंद करू शकते.

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डायनॉमिक अ‍ॅमोलेड 2के डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. Samsung Galaxy S21 Fan Edition अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2100 चिपसेट दिला आहे.

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यातील एक 12एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर दुसरी 12एमपीची वाइड अँगल लेन्स आहे. जोडीला एक 8 मेगापिक्सलची एक टेलीफोटो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जबरदस्त! 13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह हटके Nothing Phone (1); अशी आहे ऑफर

पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं आपला फोन 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे. हा सॅमसंग फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी सह 4जी देखील वापरता येतं. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह हा सॅमसंग मोबाइल 3.5एमएम जॅक व एनएफसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy S22 FE बद्दल टिपस्टरनी दिली माहिती; पाहा डिटेल्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-fe-launch-specs-tipped-again/feed/ 0