Samsung W2019 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Nov 2018 11:39:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग ने केला सादर, दोन डिस्प्ले असलेला हा अनोखा फ्लिप फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-w2019-dual-display-camera-flip-phone-specifications-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-w2019-dual-display-camera-flip-phone-specifications-feature-in-marathi/#respond Mon, 12 Nov 2018 11:39:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2826 सॅमसंग ने डब्ल्यू2019 चीनच्या आॅफिशियल वेबसाइट वर लिस्ट केला आहे पण फोनची किंमत अजून सांगितली नाही. हा फोन लाख रुपयांच्या प्राइस टॅग सह सेल साठी उपलब्ध होऊ शकतो.

The post सॅमसंग ने केला सादर, दोन डिस्प्ले असलेला हा अनोखा फ्लिप फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वीच सॅमसंगच्या फ्लिप फोन W2019 (डब्ल्यू2019) चे मीडिया इन्वाईट समोर आले होते ज्यात फोन लॉन्च संबंधित माहिती मिळाली होती. त्यानुसार आता सॅमसंग ने आपला हा शानदार स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या फ्लिप फोन डब्ल्यू2018 चा नवीन वर्जन आहे. शानदार लुक आणि चांगली डिजाईन असलेला हा फ्लिप एंडरॉयड सॅमसंग ने लॉन्च केला आहे. डुअल डिस्प्ले सोबतच सॅमसंगचा हा फ्लिप फोन दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो.

सॅमसंग डब्ल्यू2019 च्या दोन्ही फोल्डेबल पॅनल वर डिस्प्ले देण्यात आला आहे म्हणजे हा फोन दोन ​स्क्रीनला सपोर्ट करतो. ​फोनच्या दोन्ही पॅनेल्स वर 4.2-इंचाचा फुलएचडी सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डब्ल्यू2019 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी चा पावरफुल रॅम दिला आहे. सॅमसंग ने हा फोन 128जीबी तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 512जीबी पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा सेग्मेंट पाहता सॅमसंग डब्ल्यू2019 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वरील दोन्ही कॅमेरा सेंसर 12-मेगापिक्सलचे आहेत. एक कॅमेरा सेंसर एफ/1.5 अपर्चरला सपोर्ट करतो तर दुसरा कॅमेरा सेंसर एफ/2.4 अपर्चर सह येतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिजीटल असिस्टेंस साठी फोन मध्ये बिक्सबे बटन पण आहे.

सॅमसंग डब्ल्यू2019 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये एनएफसी, ब्लूटथ व एएनटी+ सारखे कनेक्टिविटी आॅप्शन्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3070एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन खूप महाग एल्युमीनियम धातु ने बनला आहे जो ग्लास पॅनल सोबत डायमंड कट डिजाईनला सपोर्ट करतो. सॅमसंग ने डब्ल्यू2019 चीनच्या आॅफिशियल वेबसाइट वर लिस्ट केला आहे पण फोनची किंमत अजून सांगितली नाही. हा फोन लाख रुपयांच्या प्राइस टॅग सह सेल साठी उपलब्ध होऊ शकतो.

The post सॅमसंग ने केला सादर, दोन डिस्प्ले असलेला हा अनोखा फ्लिप फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-w2019-dual-display-camera-flip-phone-specifications-feature-in-marathi/feed/ 0
1,82,000 रुपयांचा सॅमसंग फ्लिप फोन, 9 नोव्हेंबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-flip-phone-w2019-to-launch-on-9-november-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-flip-phone-w2019-to-launch-on-9-november-specifications-price-in-marathi/#respond Fri, 02 Nov 2018 12:28:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2776 सॅमसंग ने आॅफिशयली अनाउंस केले आहे कि कपंनी येत्या 9 नोव्हेंबरला नवीन फ्लिप एंडरॉयड फोन लॉन्च करणार आहे. सॅमसंगचा हा फ्लिप फोन W2019 (डब्ल्यू2019) नावाने लॉन्च केला जाईल.

The post 1,82,000 रुपयांचा सॅमसंग फ्लिप फोन, 9 नोव्हेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या वर्षी एंडरॉयड स्मार्टफोन्सना नवीन लुक देत खूप शानदार फ्लिप फोन डब्ल्यू2018 लॉन्च केला होता. चांगली डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स असलेला हा फोन अनेकांना आवडला होता. आता सॅमसंग पुन्हा तेच यश मिळवू पाहत आहे. सॅमसंग ने आॅफिशयली अनाउंस केले आहे कि कपंनी येत्या 9 नोव्हेंबरला नवीन फ्लिप एंडरॉयड फोन लॉन्च करणार आहे. सॅमसंगचा हा फ्लिप फोन W2019 (डब्ल्यू2019) नावाने लॉन्च केला जाईल.

सॅमसंग ने डब्ल्यू2019 च्या लॉन्चचे मीडिया इन्वाईट पाठवणे सुरु केले आहेत. सॅमसंग 9 नोव्हेंबरला चीन मधील शंघाई मध्ये एका ईंवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईंवेंटच्या मंचावरून डब्ल्यू2019 टेक विश्वात येईल. आपल्या जुन्या वर्जन प्रमाणे सॅमसंगचा नवीन फ्लिप फोन पण फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये लॉन्च होईल. मीडिया रिपोर्ट्स वरून समजले आहे कि चीन मध्ये हा फोन लक्जरी प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये लॉन्च केला जाईल.

सॅमसंग डब्ल्यू2019 चे स्पेसिफिकेशन्स पाहता चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना नुसार या फोन मध्ये 4.2-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. ​फोनच्या दोन्ही पॅनल वर समान साईजची स्क्रीन असेल. टेना नुसार सॅमसंगचा हा आगामी फोन क्वालकॉम च्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल. फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

​सॅमसंगच्या या फ्लिप फोन मध्ये ​डेडिकेटेड ’बिस्सबे’ बटन देण्यात येईल. सॅमसंग डब्ल्यू2019 रोज गोल्ड कलर मध्ये लॉन्च केला जाईल तसेच अशा आहे कि हा फोन रेड आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये पण कंपनी लॉन्च करेल. किंमत पाहता हा फोन सॅमसंग हा फोन जवळपास एक लाख ब्यांशी हजार (1,82,000) रुपयांमध्ये लॉन्च करू शकते. पण फोनची ठोस किंमत आणि स्पेसिफिकेशन्ससाठी 9 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल.

The post 1,82,000 रुपयांचा सॅमसंग फ्लिप फोन, 9 नोव्हेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-flip-phone-w2019-to-launch-on-9-november-specifications-price-in-marathi/feed/ 0