Samsung W21 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 05 Nov 2020 13:49:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वेगळ्या डिजाइन आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह आला Samsung W21 5G , जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/samsung-w21-5g-launch-with-snapdragon-865-plus/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-w21-5g-launch-with-snapdragon-865-plus/#respond Thu, 05 Nov 2020 13:49:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8836 साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आपला अजून एक फोल्डेबल फोन W21 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

The post वेगळ्या डिजाइन आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह आला Samsung W21 5G , जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आपला अजून एक फोल्डेबल फोन W21 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने चीनी मार्केट मध्ये सादर केला आहे. डिजाइनच्या बाबतीत हा Samsung Galaxy Z Fold 2 पेक्षा थोडा वेगळा आहे. स्मार्टफोनची ओवरऑल डिजाइन बऱ्याच अंशी Galaxy Z Fold 2 सारखी आहे, पण यात काही बदल करण्यात आले आहेत. सॅमसंग डब्ल्यू 21 5जी च्या आंतरराष्ट्रीय उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

सॅमसंग डेब्ल्यू21 5जी बद्दल बोलायचे तर यात ‘Galaxy’ ची ब्रँडिंग नाही आणि हा फोन सिंगल कलर ऑप्शन सादर केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर देण्यात आलेल्या वर्टिकल लाईन्सची डिजाइन पण या फोन गॅलेक्सी झेड फोल्ड 2 पेक्षा वेगळी ठरवते.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy M12/ F12 ची लाइव इमेज आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग डब्ल्यू21 5जी मध्ये 7.6-इंचाचा फुल-एचडी+ (1,768×2,208 पिक्सल) फोल्डेबल, डायनामिक एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. फोन फोल्ड केल्यावर यात 816 × 2,260 पिक्सल रिजॉल्यूशन सह 6.2-इंच सुपर एमोलेड इनफिनिटी फ्लॅक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. ताकद देण्यासाठी फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865+ चिपसेट आहे. सोबतच यात 12 जीबी LPDDR5 रॅम आणि 512 जीबी UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung W21 5G फोन मध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 2 प्रमाणे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 12-मेगापिक्सल सेंसर मिळतो. कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.2 अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस सह 12-मेगापिक्सल सेंसर आणि एफ/2.4 टेलीफोटो लेंस सह 12-मेगापिक्सल सेंसरचा समावेश आहे. सेल्फीसाठी यात f/2.2 लेंस असलेला 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर

कनेक्टिविटीसाठी यात 5जी, 4जी एलटीई, वाय-फाई 6, ब्लूटूथ वी5.0, जीपीएस/ए-जीपीएस, आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. बोर्ड वर सेंसर मध्ये एक्सीलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, बॅरोमीटर, जायरोस्कोप, मैग्नेटोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि आरजीबी सेंसर आहे. सोबतच स्मार्टफोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यात 25 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग, 11 वॉट वायरलेस चार्जिंगची पावर आहे.

किंमत

सॅमसंग डब्ल्यू21 5जी च्या 12 जीबी + 512 जीबी वेरिएंटची किंमत CNY 19,999 (जवळपास 2.23 लाख रूपये) आहे. Samsung W21 5G सिंगल गोल्ड कलर ऑप्शन मध्ये येतो, ज्याची प्री-बुकिंग चीन मध्ये सुरु करण्यात आली आहे.

The post वेगळ्या डिजाइन आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह आला Samsung W21 5G , जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-w21-5g-launch-with-snapdragon-865-plus/feed/ 0