Samsung Galaxy M12 किंवा Samsung Galaxy F12 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एफ12 एक रीब्रँडेड गॅलेक्सी एम12 असू शकतो. काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy F12 मॉडेल नंबर SM-F127G सह स्पॉट केला गेला होता. तर आता 91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मॉडेल नंबर M127F / F127G सह एक स्मार्टफोनच्या बॅक पॅनलचे लाइव फोटो मिळाले आहेत जे फोनच्या रियर लुकची माहिती देतात. आतापर्यंत सॅमसंगने Galaxy M12 किंवा Galaxy F12 बाबत कोणतीही माहिती दिली नाही.
लाइव इमेज वर दिसलेल्या मॉडेल नंबर वरून वाटत आहे कि हा Samsung Galaxy M12 किंवा Samsung Galaxy F12 असू शकतो. तसेच या फोटोज मध्ये आम्ही M05 पण स्पॉट केले आहे. त्यामुळे वाटत आहे कि फोन Galaxy M05 असू शकतो. डिवाइस प्रोडक्शन मध्ये गेला आहे आणि लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर
लाइव इमेज मध्ये गॅलेक्सी एम12 / एफ12 च्या बॅक पॅनलचे फोटोज समोर आले आहेत. बॅक पॅनल चार सर्कुलर कटआउट सह एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिसतो, ज्यावरून स्पष्ट समजते कि अपकमिंग सॅमसंग फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप सह येईल. डिवाइसच्या बॉटमला यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक पण दिसतो. इथे बॅक पॅनल मध्ये M127F / F127G मॉडेल नंबर लिहिण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट
आम्हला मिळालेल्या माहितीनुसार गॅलेक्सी एम12 / एफ12 मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असेल ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट असेल. तसेच हा मोठ्या 7,000mAh बॅटरीसह येईल. याआधी कंपनीने Galaxy M51 मध्ये 7,000 एमएएच क्षमता असलेली बॅटरी दिली आहे.
वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही मॉडेल नंबर्स मध्ये समानता पाहता, असे म्हणता येईल कि सॅमसंग गॅलेक्सी एफ12 गॅलेक्सी एम12 चा रीब्रँडेड वेरिएंट असू शकतो. सॅमसंगची F-सीरीज कंपनीची सर्वात नवीन स्मार्टफोन सीरीज आहे, ज्यात आता पर्यंत किफायती Galaxy F41 लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी एफ41 Galaxy M31 चा रीब्रँडेड वेरिएंट आहे, जो इशारा करतो कि गॅलेक्सी एफ12 मुळात रीब्रँडेड गॅलेक्सी एम12 असू शकतो.















