Smartphone Tips and Tricks - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 09 Jul 2024 07:18:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कशी करावी आपल्या फोन साठी योग्य चार्जर ची निवड https://www.91mobiles.com/marathi/how-to-know-best-suitable-right-charger-for-your-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-know-best-suitable-right-charger-for-your-smartphone-in-marathi/#respond Tue, 24 Apr 2018 10:57:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=79 कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की हाच चार्जर तुमचा फोन बिघडवू शकतो.

The post कशी करावी आपल्या फोन साठी योग्य चार्जर ची निवड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी टीवी वर एक जाहिरात आली होती ज्यात एक व्यक्ति आपला फोन घेऊन चार्जर-चार्जर ओरडताना दिसत होती. ही जाहिरात तशी खोटी नाही. स्मार्टफोन चा वापर आजकाल इतका वाढला आहे की घर असो वा आॅफिस, प्रवासात असो किंवा मीटिंग मध्ये, जिथे पण चार्जर दिसतो तिथे आपण फोन कनेक्ट करतो. पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की हाच चार्जर तुमचा फोन बिघडवू शकतो.

फोन चार्जिंग ला लावताना तुम्हाला हे माहीत नसते की कोणता चार्जर किती वोल्ट देत आहे. कारण प्रत्येक चार्जर ची पावर सप्लाई वेगळी असते. काही मध्ये कमी वोल्ट तर काही मध्ये जास्त वोल्ट. जर फोन मध्ये उच्च वोल्ट सपोर्ट नसेल तर फोन चार्ज करणे खतरनाक ठरू शकते तसेच कमी वोल्ट बॅटरी खराब करू शकते. त्यामुळे कधीही कोणताही फोन चार्ज करण्याआधी त्याला तपासून घ्या. आता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल की कोणत्या चार्जर ने फोन चार्ज करावा आणि कोणता चार्जर योग्य वोल्ट देतो. त्याच्या उत्तरासाठी तुम्हाला हा लेख वाचावा लागेल.

एंडरॉयड स्मार्टफोन मध्ये बॅटरी पावर जाणून घेण्यासाठी तुम्ही अॅम्पेयर अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हा अॅप डाउनलोड केल्यानंतर सर्वात आधी सेल्स पॅक सोबत मिळालेला चार्जर कनेक्ट करा आणि अॅम्पेयर अॅप्लिकेशन आॅन करा. काही सेकेंड च्या चार्जिंग नंतर तुम्हाला हा माहिती देईल की तुमचा फोन किती वोल्ट ने चार्ज होत आहे. त्याचबरोबर चार्जिंग दरम्यान अधिकतम वोल्ट आणि न्यूनतम वॉल्ट ची माहिती पण मिळेल. अॅप मध्ये बॅटरी हेल्थ आणि तापमानाची माहिती पण देण्यात आली आहे. तुम्ही या माहितीचा स्क्रीन शॉट घ्या.

यानंतर तुम्ही कुठेही जाल आणि दुसरा चार्जर कनेक्ट कराल तेव्हा सर्वात आधी अॅम्पेयर अॅप्लिकेशन आॅन करा. थोड्या वेळात तुम्हाला माहिती दिली जाईल की किती पावर ने तुमचा फोन चार्ज केला जात आहे. चार्जर अधिकतम किती वोल्ट सप्लाई करत आहे आणि न्यूनतम वोल्ट ची पण माहिती मिळेल. आणि तुम्ही याची तुलना आधी घेतलेल्या स्क्रीन शॉट सोबत करू शकाल.

12,000 रुपयांमध्ये 10 सर्वात बेस्ट फोन

जर दुसरा चार्जर तुमच्या ओरिजिनल चार्जर इतका वोल्ट सप्लाई नसेल करत आणि त्यापेक्षा थोडा कमी किंवा जास्त सप्लाई करत असेल तर तो वापरण्या लायक आहे. पण जर जास्त फरक असेल तर तो चार्जर न वापरलेला बरा.

जर तुम्ही सतत जास्त वोल्ट ने फोन चार्ज केला तर बॅटरी लवकर खराब होईल. पण बॅटरी हेल्थ वर लगेच प्रभाव दिसून येणार नाही पण काही दिवसांमध्ये तुम्हाला हा बदल दिसून येईल. तसेच जर दुसरा चार्जर खुप जास्त वोल्ट सप्लाई करत असेल आणि फरक जवळपास दुप्पट असेल तर लगेच काढून टाका.

 

या अॅप्लिकेशन मध्ये तुम्ही हे पण जाणून घेऊ शकता की तुमचा फोन किती पावर वापरत आहे. हे बघून तुम्ही बॅटरी मॅनेजमेंट ने बॅटरी आॅप्टिमाइज पण करू शकता ज्यामुळे कमी चार्जिंग असूनही फोन जास्त चालेल. फोन मधील बॅटरी वापर जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्ही अॅम्पेयर अॅप्लिकेशन च्या सेटिंग मध्ये जा. सेटिंग चा पर्याय तुम्हाला अॅप्लिकेशन च्या उजवीकडे वरच्या बाजूला मिळेल. तिथे बेसिक सेटिंग निवडा.

या सेक्शन मध्ये तुम्हाला इन्हांस्ड मेजरमेंट चा आॅप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही बाहेर अॅप्लिकेशन च्या मुख्य स्क्रीन वर जा. तुम्हाला माहिती मिळेल की तुमच्या फोन ने किती पावर वापरली आहे. तुम्ही डेटा, वाईफाई आणि ब्राइटनेस बंद करून जास्त बॅटरी वाचवू शकता.

जर तुमच्या फोन चा चार्जर खराब झाला तर तुम्ही या अॅप च्या मदतीने योग्य चार्जर निवडू शकाल. जो योग्य पावर सप्लाई करेल तोच चार्जर चांगला असेल. हा अॅप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

The post कशी करावी आपल्या फोन साठी योग्य चार्जर ची निवड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-know-best-suitable-right-charger-for-your-smartphone-in-marathi/feed/ 0
जर तुमचा फोन वापरत असेल जास्त रॅम तर करा हे उपाय https://www.91mobiles.com/marathi/how-to-improve-smartphone-battery-power-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-improve-smartphone-battery-power-in-marathi/#respond Fri, 20 Apr 2018 11:28:38 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=19 एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो सध्यातरी गूगल ची सर्वात नवीन मोबाइल आॅपरेटिंग सिस्टम आहे आणि आज जवळपास सर्वच फोन या आॅपरेटिंग सिस्टम वर सादर केले जातात. ही आॅपरेटिंग सिस्टम खुप अडवांस आहे आणि यात काही नवीन फीचर्स पण आहेत. पण एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम ची एक मोठी कमजोरी ही पण म्हणू शकतो की यात रॅम जास्त […]

The post जर तुमचा फोन वापरत असेल जास्त रॅम तर करा हे उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो सध्यातरी गूगल ची सर्वात नवीन मोबाइल आॅपरेटिंग सिस्टम आहे आणि आज जवळपास सर्वच फोन या आॅपरेटिंग सिस्टम वर सादर केले जातात. ही आॅपरेटिंग सिस्टम खुप अडवांस आहे आणि यात काही नवीन फीचर्स पण आहेत. पण एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम ची एक मोठी कमजोरी ही पण म्हणू शकतो की यात रॅम जास्त वापरला जातो.

ओरियो आॅपरेटिंग सिस्टम वापरणारे अनेक लोक हीच तक्रार करत आहेत की जास्त रॅम वापरल्या मुळे फोन स्लो होत आहे. ही तक्रार घेऊन तुम्ही सर्विस सेंटर मध्ये जरी गेलात तर ते तुमचा फोन फॅक्टरी रिसेट करतील आणि वरून पैसे पण घेतील. त्यानंतर काही दिवसांपर्यंत तरी फोन चांगला चालेल पण नंतर पुन्हा तोच त्रास सुरू होईल. आम्ही खाली काही उपाय सांगितले आहेत ज्यांचा दीर्घकाळासाठी तुम्हाला फायदा होईल.

का वापरला जातो जास्त रॅम?
जास्त रॅम वापरल्या जाण्या मागे अनेक कारणे असू शकतात ज्यात मोठा वाटा अॅप्लिकेशन्स चा असतो. हे अॅप्लिकेशन आॅपरेटिंग सिस्टम च्या हिशोबात आॅप्टिमाइज नसतात आणि काही तर योग्य प्रकारे कोड पण केलेले नसतात आणि त्यामुळेच ते फोनचा जास्त रॅम वापरतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की काही अॅप्लिकेशन्स असे असतात ज्यांचा काहीच उपयोग नसतो पण ते जास्त मेमोरी वापरतात. त्यामुळे जर तुमचा फोन हँग होत असेल किंवा मधे मधे अडकत असेल तर सर्वात आधी तुम्ही त्या अॅप्लिकेशन्स चा शोध लावला पाहिजे जे विनाकारण रॅम वापरत आहेत.

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या ३५०

कसे शोधाल अॅप्स?
1. यासाठी सर्वात आधी तुम्हाला सेटिंग मध्ये जावे लागेल.
2. तिथे मेमोरी आणि स्टोरेज चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3. यात सर्वात वर मेमोरी आणि खाली तुम्हाला स्टोरेज ची माहिती येईल. लक्षात असू दे की मेमोरी म्हणजे रॅम आणि स्टोरेज म्हणजे फोन ची इंटरनल मेमोरी आहे.
4. तुम्हाला मेमोरी वर क्लिक करायचे आहे.
5. त्यानंतर तिथे खाली माहिती येईल की कोणता अॅप किती रॅम वापरत आहे. या सोबत तुम्हाला ही पण माहिती मिळेल की मेमोरी च्या वापरात कोणत्या अॅप्लिकेशन चा वापर होत आहे.
6. तुम्ही फोन च्या मागील 3 तासांचा, 6 तासांचा, 12 तासांचा आणि 1 दिवसाचा पूर्ण तपशील घेऊ शकता. त्यातून तुम्हाला कळेल की कोणता अॅप्लिकेशन आहे जो सर्वात जास्त रॅम वापरत आहे.

समस्या सोडविण्यासाठी हे उपाय करा
उपाय 1: जर कोणता असा अॅप्लिकेशन आहे जो तुमच्या उपयोगाचा नाही पण खुप रॅम वापरत आहे तर त्याला अनइंस्टॉल करा.

पण जर एखादा असा एंडरॉयड अॅप्लिकेशन आहे जो अनइंस्टॉल होत नाही तर तुम्ही त्याला डिसेबल करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोन च्या सेटिंग मध्ये जावे लागेल आणि तिथे अॅ​प्स पर्यायाची निवड करावी लागेल.

अॅप्स मध्ये तुम्ही आॅल टॅब मध्ये जा.

तिथे एक साथ सर्व अॅप्लिकेशन येतील तुम्ही त्या अॅप्लिकेशन ची निवड करा जो जास्त रॅम वापरत आहे.

अॅप्लिकेशन वर क्लिक केल्यावर सर्वात आधी डिसेबल आणि फोर्स स्टॉप चे पर्याय येतील. तुम्ही त्याला डिसेबल करा.

 

उपाय 2: जर अॅप्लिकेशन तुमच्या उपयोगाचा असेल तर पद्धत वेगळी आहे.
असा अॅप जो भरपुर उपयोगी आहे पण रॅम जास्त वापरत असेल तर सर्वात आधी त्याचा अपडेट चेक करा त्यासाठी तुम्ही
1. प्ले स्टोर ओपन करा
2. मग माय अॅप मध्ये जाऊन अपडेट चेक करा. जर नवीन अपडेट आला असेल तर लवकर अपडेट करून घ्या. नवीन अपडेट ने पण तुमची समस्या दूर होऊ शकते.

उपाय 3: अपडेट नंतर पण तुमची समस्या जशास तसी असेल तर तुम्ही त्या अॅप ला आधी अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा. ह्याने तुमची समस्या दूर होऊ शकते

The post जर तुमचा फोन वापरत असेल जास्त रॅम तर करा हे उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-improve-smartphone-battery-power-in-marathi/feed/ 0