South Movies - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Dec 2022 06:30:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vikram Vedha होणार OTT वर रिलीज; जाणून घ्या कधी आणि कुठे करता येईल मोफत स्ट्रीम https://www.91mobiles.com/marathi/vikram-vedha-ott-release-date-stream-on-jio-cinema-and-voot/ https://www.91mobiles.com/marathi/vikram-vedha-ott-release-date-stream-on-jio-cinema-and-voot/#respond Thu, 29 Dec 2022 06:30:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16476 Vikram Vedha OTT Release डेटची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट 9 जानेवारी 2023 ला डिजिटल प्लॅटफॉर्मवर सादर केली जाईल. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा हा चित्रपट ‘विक्रम वेधा’ Voot सह Jio Cinema वर स्ट्रीम करता येईल. जर तुम्हाला सप्टेंबरमध्ये चित्रपटगुहांमध्ये रिलीज झालेला […]

The post Vikram Vedha होणार OTT वर रिलीज; जाणून घ्या कधी आणि कुठे करता येईल मोफत स्ट्रीम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vikram Vedha OTT Release डेटची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट 9 जानेवारी 2023 ला डिजिटल प्लॅटफॉर्मवर सादर केली जाईल. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा हा चित्रपट ‘विक्रम वेधा’ Voot सह Jio Cinema वर स्ट्रीम करता येईल. जर तुम्हाला सप्टेंबरमध्ये चित्रपटगुहांमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट पाहता आला नसेल तर निराश होऊ नका कारण हा चित्रपट आता ओटीटी रिलीजसाठी एकदम तयार दिसत आहे.

30 सप्टेंबरला आला होता थिएटरमध्ये

विक्रम वेधा हिंदी 30 सप्टेंबर, 2022 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. तसेच रिलीज नंतर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन मात्र काही खास नव्हतं. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरला YouTube वर 60 मिलियनपेक्षा जास्त व्युज मिळाल्या आहेत. तुम्ही या चित्रपटाचा ट्रेलर पुढे पाहू शकता. हे देखील वाचा: जबरदस्त! 240W च्या सुपरफास्ट चार्जिंगसह होणार Realme GT Neo 5 ची एंट्री; लाँच पूर्वीच माहिती लीक

पाहा Vikram Vedha चा ट्रेलर

वर सांगितल्याप्रमाणे, विक्रम वेधा एकाचवेळी दोन ओटीटी प्लॅटफॉर्मों- Jio Cinema आणि Voot Select वर रिलीज होईल. याआधी बातमी आली होती की हा चित्रपट फक्त वूट सेलेक्टवर रिलीज होईल. परंतु जियो सिनेमावर हा चित्रपट रिलीज होत असल्यामुळे जियो ग्राहकांना या चित्रपटाचा मोफत आनंद घेता येईल. परंतु प्रोडक्शन हाउस आणि ओटीटी प्लॅटफॉर्म वूट आणि जियो सिनेमा कडून या चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट समोर आलेली नाही.

विक्रम वेधाची गोष्ट

Vikram Vedha एका तामिळ चित्रपटाचा रीमेक आहे, ज्याचे नाव देखील विक्रम वेधा होते. हा चित्रपट 2017 मध्ये आला होता आणि यात आर माधवन, विजय सेतुपती आणि श्रद्धा श्रीनाथ सारख्या बड्या कलाकारांचा भरणा होता. तर हिंदीतील विक्रम वेधा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट, ज्याचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका आहे. हे देखील वाचा: 5000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट! आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत Xiaomi 11i 5G उपलब्ध

चित्रपटाची गोष्ट एका प्रामाणिक पोलीस अधिकारी विक्रमच्या अवतीभवती फिरते जो एक गॅंगस्टर वेधाचा शोध घेत आहे. चित्रपटात विक्रमला वेधाला पकडायचं आहे आणि वेधा दरवेळी विक्रमला एखादी गोष्ट ऐकवून वाचतो आणि यावरच चित्रपट पुढे जातो. जर तुम्ही मूळ तामिळ चित्रपट पाहिलं असेल तर हिंदी व्हर्जनमध्ये इतके बदल करण्यात आले नाहीत.

The post Vikram Vedha होणार OTT वर रिलीज; जाणून घ्या कधी आणि कुठे करता येईल मोफत स्ट्रीम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vikram-vedha-ott-release-date-stream-on-jio-cinema-and-voot/feed/ 0