एमआरपीवर 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Xiaomi 11i 5G उपलब्ध

साल 2022 आता संपणार आहे आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स या संधीचा वापर चांगल्या चांगल्या डिल्स ग्राहकांना देण्यासाठी करत आहेत. आता Flipkart वर देखील एन्ड ऑफ द ईयर सेल सुरु झाला आहे, ज्यात अनेक स्मार्टफोन आणि अन्य डिवाइसवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. भारतातील वाढत्या 5G नेटवर्कचा अनुभव घेण्यासाठी जर तुम्ही एक 5G डिवाइस शोधत असाल तर फ्लिपकार्टवरील Xiaomi 11i 5G वर एक नजर टाकता येईल. यात 6GB रॅम, 128GB स्टोरेज, 5160mAh बॅटरी आणि 108MP कॅमेरा असे दमदार स्पेक्स आहेत.

Xiaomi 11i 5G वरील ऑफर्स

Xiaomi 11i 5G डिवाइसची एमआरपी 29,999 रुपये आहे परंतु हा फोन फ्लिपकार्टवर 5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या ईयर एन्ड सेलमध्ये हा स्मार्टफोन फक्त 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या कार्डनं खरेदी केल्यास तुम्हाला 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. त्याचबरोबर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या मदतीनं फोन घेतल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. हे देखील वाचा: 8 हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये येईल Samsung Galaxy F04; पुढील आठवड्यात होणार देशात एंट्री

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनवर अनेक मोठ्या बँका EMI ऑप्शन देत आहेत, ज्याअंतर्गत तुम्ही हा स्मार्टफोन 3 ते 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर खरेदी करू शकता. इथे तुम्हाला फक्त 4,167 च्या मासिक हप्ता द्यावा लागेल. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर कंपनी एकूण 17,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे.

Xiaomi 11i 5G Specifications

  • 6.67-inch FHD+ AMOLED Display
  • 120Hz refresh rate
  • Mediatek Dimensity 920
  • 5160mAh Battery
  • 108MP Camera

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहता स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात युजर्सना 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं. प्रोसेसर पाहता स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 920 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. पवार बॅकअपसाठी फोनमध्ये 5160 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हे देखील वाचा: वोडाफोन-आयडियाचे 25 आणि 55 रुपयांचे दोन नवे प्लॅन सादर; फायदे Jio पेक्षा जास्त

फोटोग्राफीसाठी Xiaomi 11i 5G डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात युजर्सना एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here