Tech News in India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 22 Jan 2021 12:59:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-officially-launched-in-vietnam-know-specs-price-helio-g35-5000-mah-battery-2gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-officially-launched-in-vietnam-know-specs-price-helio-g35-5000-mah-battery-2gb-ram/#respond Fri, 22 Jan 2021 12:59:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9754 रियलमी सी20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा एक लो बजेट फोन आहे जो प्लास्टिक बाॅडी वर बनला आहे आणि वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्लेला सपोर्ट करतो.

The post रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या ‘सी सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Realme C20 नावाने मार्केट मध्ये लाॅन्च केला जाईल. तर आज रियलमीने आपल्या हा नवीन डिवायस अधिकृतपणे सादर केला आहे. कंपनीने रियलमी सी20 टेक मंचावर सादर केला आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि हीलियो जी35 चिपसेट सारख्या स्पेसिफिकेशन्स सह येतो. Realme C20 सध्या वियतनाम मध्ये लाॅन्च झाला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह इतर बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Realme C20

रियलमी सी20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा एक लो बजेट फोन आहे जो प्लास्टिक बाॅडी वर बनला आहे आणि वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लाॅन्च केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. Realme C20 ची स्क्रीन नॅरो बेजल्स सह येते ज्यात खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

Realme C20 अँड्रॉइड 10 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो रियलमी वनयुआय सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. वियतनाम मध्ये हा फोन 2 जीबी रॅम वर लाॅन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनच्या एक्सपांडेबल स्टोरेजची माहिती समोर आली नाही.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमीने आपला हा फोन सिंगल रियर कॅमेऱ्यासह लाॅन्च केला आहे जो आजच्या घडीला आउट डेटेड म्हणता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे चौकोन आकारात रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि 3.5एमएम जॅक सह हा फोन सिक्योरिटीसाठी फेस अनलाॅक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वियतनाम मध्ये रियलमी सी20 स्मार्टफोन VND2,490,001 मध्ये लाॅन्च झाला आहे जो Blue आणि Black कलर मध्ये विकत घेता येईल. भारतीय करंसीनुसार हि किंमत 7,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-officially-launched-in-vietnam-know-specs-price-helio-g35-5000-mah-battery-2gb-ram/feed/ 0
Exclusive: 5000 mAh बॅटरी असलेला Vivo Y30, जून मध्ये होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या या फोन बाबत मध्ये सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/vivo-y30-to-launch-in-india-in-first-week-of-june/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y30-to-launch-in-india-in-first-week-of-june/#respond Wed, 20 May 2020 15:12:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7177 Vivo Y30 मीडियाटेक हेलिया पी35 चिपपसेट वर सादर केला गेला आहे

The post Exclusive: 5000 mAh बॅटरी असलेला Vivo Y30, जून मध्ये होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या या फोन बाबत मध्ये सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लॉकडाउनमुळे सर्व कंपन्यांची फोन लॉन्च सिस्टम खराब झाली आहे. मार्च मधेच Vivo V19 भारतात लॉन्च होणार होता पण मे मध्ये हा सादर केला गेला. परंतु आता अनेक फोन लाइनअप मध्ये आहेत. पुढल्या महिन्यात सुरवातीला वीवो अपने Y सीरीज मध्ये नवीन फोन येणार आहे. 91मोबाईल्स कडे या फोन बद्दल एक्सिक्लूसिव माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार Vivo पुढल्या महिन्याच्या सुरवातीला आपला Vivo Y30 मॉडेल भारतात लॉन्च करू शकते. अलीकडेच हा फोन कंपनीने मलेशिया मध्ये सादर केला होता.

फोनच्या लॉन्चची तयारी कंपनीने केली आहे आणि पुढच्या आठवड्यापासून याचे प्रमोशन पण शुरू होऊ शकते. आम्हाला हि माहिती वीवोच्या एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे ज्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. हा फोन ऑनलाइन उपलब्ध होईल पण मिड रेंजचा हा फोन खासकरून ऑफलाइन स्टोर्स लक्षात ठेऊन सादर केला जाईल. फोन मध्ये मोठ्या स्क्रीन सह तुम्हाला मोठी बॅटरी मिळू शकते.

Vivo Y30 चे स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे वीवो वाय30 काही दिवसांपूर्वी मलेशिया मध्ये लॉन्च झाला आणि हा फोन कंपनी भारतात घेऊन येणार आहे. फोन मध्ये पंच होल डिस्प्ले सह 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.47 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला एचडी+ डिस्प्ले मिळेल.

हा फोन एंड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो आणि यात तुम्हाला वीवो चा फन टच ओएस मिळेल. Vivo Y30 मीडियाटेक हेलिया पी35 चिपपसेट वर सादर केला गेला आहे आणि यात 2.3गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये तुम्हाला मेमरी कार्ड सपोर्ट पण मिळेल.

कॅमेरा सेग्मेंट पाहता इथे पण तुमची निराशा होणार नाही. कंपनीने हा क्वाड कॅमेरा सेटअप सह सादर केला आहे आणि फोन मध्ये 13 + 8 + 2 + 2 एमपी चा कॅमेरा सेंसर मिळेल. फोनचा मुख्य सेंसर एफ/2.2 अपर्चर सह येतो. सेल्फीसाठी कंपनीने यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर वायफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. सिक्योरिटीसाठी मागच्या पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच फेस अनलॉक पण तुम्हाला मिळेल. राहिला प्रश्न बॅटरीचा तर कंपनीने हा 5,000 एमएएच च्या मोठी बॅटरी सह सादर केला आहे. फास्ट चार्जिंग नाही. भारतीय बाजारात हा फोन 15,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Exclusive: 5000 mAh बॅटरी असलेला Vivo Y30, जून मध्ये होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या या फोन बाबत मध्ये सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y30-to-launch-in-india-in-first-week-of-june/feed/ 0