6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी

टेक ब्रँड इनफिनिक्सने गेल्या वर्षी आपल्या ‘हाॅट सीरीज’ मध्ये दोन स्मार्टफोन Infinix Hot 10 आणि Infinix Hot 10 Lite लाॅन्च केले होते. हे दोन्ही फोन लो बजेट मध्ये आले होते, जे कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देतात. आता या सीरीजचा विस्तार करत इनफिनिक्सने अजून एक नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10 Play पण बाजारात आणला आहे. इनफिनिक्स हाॅट 10 प्ले सध्या फिलिपिंस मध्ये लाॅन्च केला आहे जो येत्या काळात भारतासह जगातील इतर बाजारांमध्ये पण येईल. फिलिपिंस मध्ये या फोनची किंमत PHP 4,290 म्हणजे जवळपास 6,500 रुपये आहे.

Infinix Hot 10 Play

इनफिनिक्स हाॅट 10 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर लाॅन्च झाला आहे जो 720 X 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि एक वाॅटरड्राॅप नाॅच स्क्रीन आहे ज्यात तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी ‘वी’ शेप नाॅच देण्यात आली आहे. इंटरनॅशनल मार्केट मध्ये हा फोन Aegean Blue आणि Morandi Green कलर मध्ये लाॅन्च केला गेला आहे.

Infinix Hot 10 Play

Infinix Hot 10 Play अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन वर लाॅन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 सह चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे या फोन मध्ये गुगलचे सर्व ‘गो’ ऍप्स वापरता येतील जे कमी रॅम वर पण फास्ट काम करेल तसेच बॅटरी आणि इंटरनेटचा वापर कमी करतील. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी25 चिपसेट आहे. हा फोन 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून जीबी पर्यंत वाढवता येईल.

हे देखील वाचा : फक्त 5,999 रुपयांमध्ये विकला जाईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6.1 इंचाचा डिस्प्ले असलेला स्वस्त Infinix Smart HD 2021 फोन

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हाॅट 10 प्ले स्मार्टफोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश उलट्या ‘L’ च्या आकारात आहेत. हा फोन 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्यासह सेकेंडरी डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix Hot 10 Play एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हाॅट 10 प्ले मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार एका फुल चार्ज मध्ये 55 दिवसांपेक्षा जास्त स्टँडबाय टाईम देऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here