Tecno POP 6 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 27 Sep 2022 10:05:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 42 दिवस चार्जींगविना चालेल हा फोन! फक्त 6099 रुपयांमध्ये नवीन Tecno POP 6 Pro भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/tecno-pop-6-pro-launched-in-india-at-rs-6099-price-know-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-pop-6-pro-launched-in-india-at-rs-6099-price-know-specifications-sale-offer-details/#respond Tue, 27 Sep 2022 10:05:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13485 91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमधून सांगितलं होतं की टेक ब्रँड टेक्नो आपल्या ‘पॉप’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन Tecno POP 6 Pro वर काम करत आहे जो 6,099 रुपयांमध्ये भारतीय बाजारात सादर केला जाईल. आज आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत कंपनीनं टेक्नो पॉप 6 प्रो याच किंमतीत भारतीय बाजारात ऑफिशियली लाँच केला आहे. हा टेक्नो मोबाइल फोन […]

The post 42 दिवस चार्जींगविना चालेल हा फोन! फक्त 6099 रुपयांमध्ये नवीन Tecno POP 6 Pro भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमधून सांगितलं होतं की टेक ब्रँड टेक्नो आपल्या ‘पॉप’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन Tecno POP 6 Pro वर काम करत आहे जो 6,099 रुपयांमध्ये भारतीय बाजारात सादर केला जाईल. आज आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत कंपनीनं टेक्नो पॉप 6 प्रो याच किंमतीत भारतीय बाजारात ऑफिशियली लाँच केला आहे. हा टेक्नो मोबाइल फोन Tecno POP 6 Pro नावानं 6,099 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

Tecno POP 6 Pro Specifications

टेक्नो पॉप 6 प्रो 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह भारतात आला आहे, जो 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 270 पीपीआयला सपोर्ट करतो. डॉट नॉच स्टाइल असलेल्या या फोनची स्क्रीन 2.5डी ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनची जाडी फक्त 8.75 एमएम आहे. हे देखील वाचा: Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Tecno POP 6 Pro Launched In India At Rs 6099 Price Know Specifications Sale Offer Details

Tecno POP 6 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेटवर चालतो. हा मोबाइल फोन 2GB LPDDR4x RAM आणि 32GB eMMC5.1 ROM ला सपोर्ट करतो ज्यात 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

6099 price smartphone Tecno POP 6 Pro india launch date and specifications

फोटोग्राफीसाठी नवीन टेक्नो मोबाइलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. पॉप 6 प्रो च्या बॅक पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि तेवढ्याच अपर्चरची सेकंडरी एआय लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन फ्रंट फ्लॅश से लैस 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Tecno POP 6 Pro Launched In India At Rs 6099 Price Know Specifications Sale Offer Details

Tecno POP 6 Pro ड्युअल सिम फोन आहे ज्यात 3.5एमएम जॅक व ओटीजी सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फेस अनलॉक फीचर मिळतं. तसेच पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की हा फोन 42 दिवस स्टँडबाय टाइम देऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त कीपॅड असलेले फोन; किंमत 500 रुपयांपेक्षा कमी

Tecno POP 6 Pro Launched In India At Rs 6099 Price Know Specifications Sale Offer Details

Tecno POP 6 Pro Price

टेक्नो पॉप 6 प्रो भारतात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 6,099 रुपये आहे. हा टेक्नो मोबाइल Peaceful Blue आणि Polar Black कलरमध्ये अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. बंडल ऑफर अंतगर्त फक्त 399 रुपये एक्स्ट्रा देऊन Tecno POP 6 Pro सह Boat Bassheads देखील मिळवता येतील.

The post 42 दिवस चार्जींगविना चालेल हा फोन! फक्त 6099 रुपयांमध्ये नवीन Tecno POP 6 Pro भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-pop-6-pro-launched-in-india-at-rs-6099-price-know-specifications-sale-offer-details/feed/ 0