सर्वात स्वस्त कीपॅड असलेले फोन; किंमत 500 रुपयांपेक्षा कमी

Keypad Phone Under 500

भारतात 4G आल्यापासून स्मार्टफोन युजर्सची संख्या वेगानं वाढली आहे. प्रत्येकाच्या हातात टचस्क्रीन मोबाइल जरी दिसत असला तरी आजही लाखो लोक असे आहेत जे कीपॅड असलेल्या फोन्सना पसंती देतात. हे फोन्स वापरण्यास सोपे असतात आणि यांची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकते. घरातील वयोवृद्ध या फोन्सची मागणी करतात कारण यातील फिजिकल बटन्समुळे नंबर डायल करणं सोपं जातं. काही लोक सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी तर काही बॅकअप फोन म्हणून फीचर्स फोन्सचा वापर करत असतात.

कारण कोणतंही असू दे, परंतु जर तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी किंवा स्वतःसाठी एक स्वस्त कीपॅड असलेला फोन घेण्याचा विचार करत असलं तर पुढील यादी पाहा. पुढे दिलेल्या फिचर फोन्सच्या किंमती 500 रुपयांपेक्षा कमी आहेत. एक महत्वाची बाब म्हणजे मी या फोन्सच्या ऑनलाइन किंमती दिल्या आहेत, आणि हे फोन्स तुम्ही ऑफलाइन देखील करू शकता, फक्त किंमती थोड्या बदलू शकतात.

Keypad Phone under 500

1. I Kall K74

सर्वात स्वस्त कीपॅड फोन्सबद्दल बोलायचं झाला तर हा फोन फक्त 378 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. मी आय कॉल के74 बद्दल बोलत आहे जो 2जीवर चालणारा सिंगल सिम फीचर फोन आहे. हा मोठ्याप्रमाणावर Nokia सारखा दिसतो आणि याचे Blue, Red आणि Yellow कलर व्हेरिएंट उपलब्ध आहेत. हा मोबाइल फोन एफएम रेडियोसह येतो, जे ऐकण्यासाठी बॅक पॅनलवर स्पिकर देखील देण्यात आला आहे.

Keypad Phone Under 500

I Kall K74 मध्ये 128 x 128 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 1.44 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 126पीपीआयला सपोर्ट करती आहे. या कीपॅड मोबाइल फोनमध्ये 800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी दीर्घ बॅकअप देऊ शकते. या स्वस्त मोबाइलमध्ये रिंगटोन, कॅल्क्युलेटर, स्टॉपवॉच, कॅलेंडर आणि अलॉर्म सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या

2. Rocktel R6

मोठा आवाज करून गाणी ऐकण्यासाठी रॉकटेल आर6 उपयुक्त ठरेल. या कीपॅड असलेल्या मोबाइलची प्राइस फक्त 449 रुपये आहे जो Black आणि White कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 1.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 128 x 160 पिक्सल रिजोल्यूशन आणि 114पीपीआयवर चालतो.

Keypad Phone Under 500

Rocktel R6 मध्ये 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी 1,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Calculator, Stopwatch, Calendar आणि Alarm सोबतच 3GP, MP4 आणि MP3 सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो 2जीवर चालतो.

3. Rocktel W8

स्टायलिश कीपॅड असलेला फोन हवा असेल तर रॉकटेल डब्ल्यू8 तुम्हाला नक्कीच आवडेल. या फोनचा बॅक पॅनल रिमूव्हेबल आहे ज्यात डबल शेड मिळते. कव्हर ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये येतो त्याखाली बॉडी पार्ट ऑरेंज कलरमध्ये देण्यात आले आहेत. हा मोबाइल फोन पण 449 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे ज्यात 1,050एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

Keypad Phone Under 500

कीपॅड मोबाइल फोन Rocktel W8 मध्ये 1.8 इंचाचा डिस्प्ले आहे जो 114पीपीआयवर चालतो. या फोनच्या बॅक पॅनलवर 0.3एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशसह येतो. या फोनमध्ये पण 8जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल तसेच यात एमपी3, एमपी4 आणि 3जीपी सारखे इंटरटेनमेंट ऑप्शन मिळतात.

4. Rocktel R3

रॉकटेल आर3 मोबाइल फोनमध्ये 128 x 160 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 1.8 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन 114पीपीआयला सपोर्ट करती आहे. हा कीपॅड मोबाइल फोन फक्त 449 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे जो Black, Blue, Green आणि White कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये युजरला Calculator, Stopwatch, Calendar आणि Alarm असे फिचर मिळतात.

Keypad Phone Under 500

हा ड्युअल सिम फोन 2जी वर काम करती आहे तसेच मनोरंजनासाठी रॉकटेल आर3 एमपी3, एमपी4 आणि 3जीपीला सपोर्ट करतो. फोनची मेमरी 8जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी आणि व्हिडीओ बनवण्यासाठी या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच दीर्घ बॅकअप देण्यासाठी या मोबाइल फोनमध्ये 1,000एमएएच बॅटरी आहे.

5. Rocktel W7

जर सिंगल चार्जमध्ये अनेक आठवड्यांचा बॅकअप हवा असेल तर रॉकटेल डब्ल्यू7 एक परफेक्ट ऑप्शन आहे. या फोनमध्ये 1,200एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी एकदा फुल चार्ज केल्यास बराच काळ टिकते. हा कीपॅड मोबाइल 449 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे जो Black आणि White कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Airtel युजर्ससाठी खुशखबर! 5GB डेटा मिळतोय अगदी FREE; रिचार्ज करण्याची देखील गरज नाही

Keypad Phone Under 500

Rocktel W7 मध्ये 240 x 320 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2.4 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 167पीपीआयला सपोर्ट करती आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो 2जी वर चालतो. फोनमध्ये एमपी3 आणि 3जीपी मिळतात तसेच 8जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here