Tecno POVA - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Jul 2023 11:37:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Tecno देखील घेऊन येत आहे एलईडी लाइट्स असलेला मोबाइल फोन, कॉल आणि मेसेज आल्यावर चमकणार बॅक पॅनल https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-new-smartphone-with-led-lights-notifications-in-pova-series-arc-interface/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-new-smartphone-with-led-lights-notifications-in-pova-series-arc-interface/#respond Tue, 18 Jul 2023 11:37:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22449 टेक ब्रँड टेक्नो सतत असे प्रोडक्ट घेऊन येतो की मोठ्या मोबाइल कंपन्यांची झोप उडते. काही दिवसांपूर्वीच Phantom V Fold आणून कंपनीनं थेट Samsung आणि Motorola ला आव्हान दिलं होतं. आता कंपनी आणखी एक मोबाइल फोन घेऊन येत आहे ज्याच्या बॅक पॅनलवर एलईडी नोटिफिकेशन लाइट असेल. हा POVA series smartphone असेल जो Nothing Phone ला टक्कर […]

The post Tecno देखील घेऊन येत आहे एलईडी लाइट्स असलेला मोबाइल फोन, कॉल आणि मेसेज आल्यावर चमकणार बॅक पॅनल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • एलईडी लाइट नोटिफिकेशन्स टेक्नॉलॉजीलचे नाव Arc Interface आहे.
  • लाईट फोन कॉल, मेसेज तसेच अन्य नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल.
  • हा फोन टेक्नो पोवा सीरीज अंतगर्त लवकरच भारतात लाँच होईल.

टेक ब्रँड टेक्नो सतत असे प्रोडक्ट घेऊन येतो की मोठ्या मोबाइल कंपन्यांची झोप उडते. काही दिवसांपूर्वीच Phantom V Fold आणून कंपनीनं थेट Samsung आणि Motorola ला आव्हान दिलं होतं. आता कंपनी आणखी एक मोबाइल फोन घेऊन येत आहे ज्याच्या बॅक पॅनलवर एलईडी नोटिफिकेशन लाइट असेल. हा POVA series smartphone असेल जो Nothing Phone ला टक्कर देईल.

एलईडी लाइट असलेला टेक्नो फोन

एलईडी लाइट असलेल्या नवीन टेक्नो फोनची माहिती टिपस्टर ईशान अग्रवालच्या माध्यमातून समोर आली आहे. ईशाननं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून आगामी टेक्नो फोनचा शार्ट व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात फोनच्या बॅक पॅनलवर आणि त्यावर लावलेल्या लाईट्स देखील स्पष्ट दिसत आहेत. टिपस्टरनं स्पष्ट केलं आहे की हा फोन टेक्नो पोवा सीरीज अंतगर्त येईल आणि लवकरच भारतात लाँच होईल.

Tecno POVA स्मार्टफोनमध्ये वापरली जाणाऱ्या एलईडी लाइट नोटिफिकेशन्स टेक्नॉलॉजीलचे नाव ईशाननं Arc Interface असं सांगितलं आहे. वरील जीफमध्ये तुम्ही पाहू शकता की फोनच्या बॅक पॅनलवर एका बाजूला काच आहे तर दुसरीकडे लेदर, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एलईडी स्ट्रीप लावण्यात आली आहे जी ब्लिंक करते. ही लाईट फोन कॉल, मेसेज तसेच अन्य नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल.

Tecno Pova 5

अलीकडेच टेक्नो पोवा 5 स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्याचा फ्री फायर स्पेशल एडिशन देखील आला आहे जो गरेना बॅटल रॉयल गेम निर्माता कंपनीसह मिळून बनवण्यात आला आहे. हा फोन Turbo Mecha डिजाइनसह बनवण्यात आला आहे ज्याचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत.

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता टेक्नो पोवा 5 मध्ये 6.78 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 1080×24460 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो.
  • प्रोसेसर : हा फोन MediaTek Helio G99 प्रोसेसरसह येतो. हा प्रोसेसर 6mm प्रोसेसवर आधारित आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी Z अ‍ॅक्सेस लीनियर वायब्रेशन मोटर देखील आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे जोडीला 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते आहे.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ चालणारी 6000mAh ची बॅटरी आणि 45 वोल्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच डिवाइसमध्ये 10W पर्यंतचा रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि एक डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.

The post Tecno देखील घेऊन येत आहे एलईडी लाइट्स असलेला मोबाइल फोन, कॉल आणि मेसेज आल्यावर चमकणार बॅक पॅनल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-new-smartphone-with-led-lights-notifications-in-pova-series-arc-interface/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 16एमपी क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन भारतात लॉन्च, किंमत फक्त 9,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-launched-in-india-with-6000mah-battery-starting-price-rs-9999/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-launched-in-india-with-6000mah-battery-starting-price-rs-9999/#respond Fri, 04 Dec 2020 12:21:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9161 कंपनीने हि सीरीज ‘POVA’ टायटल सह सादर केली आहे जिच्या अंतर्गत लॉन्च होणाऱ्या पहिल्या स्मार्टफोनचे नाव TECNO POVA आहे. ब्रँडचा हा स्वस्त स्मार्टफोन फक्त 9,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो येत्या 11 डिसेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 6,000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 16एमपी क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन भारतात लॉन्च, किंमत फक्त 9,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लो बजेट मध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन आणणाऱ्या TECNO ब्रँडने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात केली आहे. कंपनीने हि सीरीज ‘POVA’ टायटल सह सादर केली आहे जिच्या अंतर्गत लॉन्च होणाऱ्या पहिल्या स्मार्टफोनचे नाव TECNO POVA आहे. ब्रँडचा हा स्वस्त स्मार्टफोन फक्त 9,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो येत्या 11 डिसेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

TECNO POVA

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता टेक्नोने आपला नवीन डिवायस 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या डॉट-इन एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.4 टक्के आहे जो 480निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

TECNO POVA को अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 जीपीयूला सपोर्ट करतो तसेच गेमिंग स्मूद आणि लॅगफ्री करण्यासाठी हा हाइपरइंजन गेम टेक्नोलॉजी सह बाजारात आला आहे.

हे देखील वाचा : मित्राला घ्यायला सांगा Samsung का स्मार्टफोन आणि मिळवा 7500 रुपयांची बक्षीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नोचा हा नवीन स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.85 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसर सह एक एआय लेंसला पण सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

TECNO POVA एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो पोवा मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि एका चार्ज मध्ये हा फोन 30 दिवस स्टँडबाय टाईम देऊ शकतो.

वेरिएंट व किंमत

टेक्नोने आपला नवीन स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. TECNO POVA चा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपये तर 6 जीबी रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच हा फोन Dazzle black, Magic Blue आणि Speed Purple कलर मध्ये 11 डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 6,000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 16एमपी क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन भारतात लॉन्च, किंमत फक्त 9,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-launched-in-india-with-6000mah-battery-starting-price-rs-9999/feed/ 0