
टेक ब्रँड टेक्नो सतत असे प्रोडक्ट घेऊन येतो की मोठ्या मोबाइल कंपन्यांची झोप उडते. काही दिवसांपूर्वीच Phantom V Fold आणून कंपनीनं थेट Samsung आणि Motorola ला आव्हान दिलं होतं. आता कंपनी आणखी एक मोबाइल फोन घेऊन येत आहे ज्याच्या बॅक पॅनलवर एलईडी नोटिफिकेशन लाइट असेल. हा POVA series smartphone असेल जो Nothing Phone ला टक्कर देईल.
एलईडी लाइट असलेला टेक्नो फोन
एलईडी लाइट असलेल्या नवीन टेक्नो फोनची माहिती टिपस्टर ईशान अग्रवालच्या माध्यमातून समोर आली आहे. ईशाननं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून आगामी टेक्नो फोनचा शार्ट व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात फोनच्या बॅक पॅनलवर आणि त्यावर लावलेल्या लाईट्स देखील स्पष्ट दिसत आहेत. टिपस्टरनं स्पष्ट केलं आहे की हा फोन टेक्नो पोवा सीरीज अंतगर्त येईल आणि लवकरच भारतात लाँच होईल.
Exclusive: This is your first look of #ArcInterface from an upcoming @TecnoMobileInd POVA series smartphone.
The @pova_mobile seems to feature LED lights for notifications at the back & here it is in action as the phone gets a call.
Looks cool ? Will launch in India soon! pic.twitter.com/oghPc9FCo6
— Ishan Agarwal (@ishanagarwal24) July 18, 2023
Tecno POVA स्मार्टफोनमध्ये वापरली जाणाऱ्या एलईडी लाइट नोटिफिकेशन्स टेक्नॉलॉजीलचे नाव ईशाननं Arc Interface असं सांगितलं आहे. वरील जीफमध्ये तुम्ही पाहू शकता की फोनच्या बॅक पॅनलवर एका बाजूला काच आहे तर दुसरीकडे लेदर, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एलईडी स्ट्रीप लावण्यात आली आहे जी ब्लिंक करते. ही लाईट फोन कॉल, मेसेज तसेच अन्य नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल.
Tecno Pova 5
अलीकडेच टेक्नो पोवा 5 स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्याचा फ्री फायर स्पेशल एडिशन देखील आला आहे जो गरेना बॅटल रॉयल गेम निर्माता कंपनीसह मिळून बनवण्यात आला आहे. हा फोन Turbo Mecha डिजाइनसह बनवण्यात आला आहे ज्याचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत.
- डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता टेक्नो पोवा 5 मध्ये 6.78 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 1080×24460 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो.
- प्रोसेसर : हा फोन MediaTek Helio G99 प्रोसेसरसह येतो. हा प्रोसेसर 6mm प्रोसेसवर आधारित आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी Z अॅक्सेस लीनियर वायब्रेशन मोटर देखील आहे.
- स्टोरेज : डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे जोडीला 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते आहे.
- बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ चालणारी 6000mAh ची बॅटरी आणि 45 वोल्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच डिवाइसमध्ये 10W पर्यंतचा रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.
- कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि एक डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.














