TikTok Ban - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 Jun 2020 10:24:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 TikTok App डिलीट केल्यानंतर पण सर्वर वर राहते तुमची खाजगी माहिती, या स्टेप्स फॉलो केल्या तर होईल संपूर्ण सफाई https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-your-tiktok-account-and-personal-data-know-full-steps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-your-tiktok-account-and-personal-data-know-full-steps/#respond Thu, 25 Jun 2020 10:24:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7546 फक्त TikTok ऍपचा फोन मधून डिलीट होऊ नये तर त्या ऍप मध्ये असलेली तुमची सर्व माहिती पूर्णपणे डिलीट व्हावी तर आम्ही पुढे सांगितलेल्या सोप्प्या स्टेप्स फॉलो करा.

The post TikTok App डिलीट केल्यानंतर पण सर्वर वर राहते तुमची खाजगी माहिती, या स्टेप्स फॉलो केल्या तर होईल संपूर्ण सफाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok वर वीडियो बनवणाऱ्यांपासून ते वीडियो बघणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांना पकडून भारतात 61 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आपल्या फोन मध्ये टिकटॉक ऍप डाउनलोड म्हणजे इंस्टाल केला आहे. भारतात टिकटॉक आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. आणि या गोष्टीकडे पण दुर्लक्ष करता येणार नाही कि वादग्रस्त असूनही TikTok देशातील सर्वात हिट ऍप्स पैकी एक बनला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून टिकटॉकची पत कमी होत आहे पण अजूनही टिकटॉक यूजर्सची संख्या लाखात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी TikTok ऍप आपल्या स्मार्टफोन्स मधून डिलीट केला आहे. काहींनी चायना विरोधी भावनांमुळे तर काहींनी यू-ट्यूबच्या समर्थनासाठी. 91मोबाईल्स कोणतेही ऍप फोन मध्ये इंस्टाल करण्याची शिफारीश किंवा डिलीट करण्याचे आव्हान करत नाही. पण टिकटॉक फोन मधून डिलीट करण्याच्या या ट्रेंड मध्ये हजारो यूजर एक चूक करत आहेत कि ते ऍप फोन मधून अनइंस्टाल करत आहेत, पण त्यांचे अकाउंट मात्र TikTok च्या सर्वर वर तसेच राहत आहे.

हे सोप्प्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर TikTok सारखे ऍप्स फोन मध्ये इंस्टाल केल्यानंतर त्यावर प्रत्येक यूजरला आपले अकाउंट बनवावे लागते. अकाउंट बनवण्यासाठी ई-मेल आईडी, फोन नंबर, नाव आणि वय सारखी माहिती दिली जाते आणि त्यानंतर प्रत्येक यूजरची यूनिक आईडी तयार होते. टिकटॉक यूजर्सनी पण असेच केले असेल. पण जेव्हा असे ऍप्स फोन मधून अनइंस्टाल किंवा डिलीट केले जातात, तेव्हा तो ऍप तर फोन मधून जातो पण ऍप वर टाकलेली माहिती आणि बनवलेले प्रोफाइल ऍप सर्वर वर सुरक्षित राहते.

जोपर्यंत हि माहिती तुम्ही स्वतःहून डिलीट करत नाही तोपर्यंत हि माहिती ऍप वर तशीच राहते आणि ऍक्टिव्ह राहते. त्यामुळे जेव्हा पुन्हा ऍप इंस्टाल केला जातो तेव्हा पुन्हा आईडी बनवण्याची गरज पडत नाही. जर तुम्हाला हवे असेल कि फक्त TikTok ऍपच फोन मधून डिलीट होऊ नये तर त्या ऍप मध्ये असलेली तुमची सर्व माहिती पण पूर्णपणे डिलीट व्हावी तर आम्ही पुढे सांगितलेल्या सोप्प्या स्टेप्स फॉलो करा. इथे सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो कि या सर्व स्टेप्स ऍप मधेच पूर्ण करता येतील, त्यामुळे तुम्हाला एकदा टिकटॉक ऍप तुमच्या फोन मध्ये पुन्हा इंस्टाल करावा लागेल.

1. सर्वात आधी TikTok तुमच्या स्मार्टफोन मध्ये इंस्टाल करा.

2. ऍप ओपन केल्यानंतर तुमच्या आईडी व पासवर्डने लॉग-इन करा.

3. ऍप मध्ये तुमच्या प्रोफाइल वर जा, यासाठी खाली ‘Me’ टॅब देण्यात आली आहे, तिथे क्लिक करा.

4. तुमचे प्रोफाइल येईल आणि तिथे उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा.

5. ‘Manage My Account’ चा पर्याय उघडा.

6. इथे सर्वात खाली तुम्हाला ‘Delete My Account’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

7. हि शेवटची पायरी आहे, स्क्रीन वर दिलेल्या सूचनांचे पालन करा म्हणजे तुमचे काम होईल.

तुमचे अकाउंट TikTok च्या सर्वर वरून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. आता तुम्ही कोणतीही माहिती इथे राहणार नाही. तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित झाली आहे आणि आता हे ऍप पण तुम्ही फोन मधून काढून टाकू शकता.

The post TikTok App डिलीट केल्यानंतर पण सर्वर वर राहते तुमची खाजगी माहिती, या स्टेप्स फॉलो केल्या तर होईल संपूर्ण सफाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-your-tiktok-account-and-personal-data-know-full-steps/feed/ 0
TikTok वरचा बॅन हटला ! पुन्हा करता येईल फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-ban-download-lifted-india-madras-high-court/ https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-ban-download-lifted-india-madras-high-court/#respond Wed, 24 Apr 2019 16:23:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4151 TikTok ने मार्च तिमाहीत जगभरात 18.8 कोटी नवीन यूजर जोडले होते, ज्यात भारताचा वाटा 8.86 कोटी इतका होता.

The post TikTok वरचा बॅन हटला ! पुन्हा करता येईल फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok एक असं नाव आहे जे जवळपास सर्व युवकांना माहित आहे, मग ते हे ऍप वापरत नसतीलही. हा प्रसिद्ध वीडियो ऍप आहे चीनी पण चीन पेक्षा जास्त आपल्या भारतात प्रसिद्ध आहे. मागे मद्रास हायकोर्टाने या ऍप वर बंदी होती आणि TikTok वर ​अश्लीलता पसरवण्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टाकडे हा बॅन करण्याची मागणी केली होती. या वादानंतर ऍप्पल आणि गूगल ने हे ऍप्लिकेशन आपल्या प्लॅटफॉर्म वरून काढून टाकले होते. पण आज TikTok यूजर्स साठी आनंदाची बातमी आहे कि कोर्टाने या ऍप वरील बॅन काढला आहे.

TikTok बनवणारी कंपनीच नव्हे तर भारतातातील टिकटॉकच्या लाखों फॅन्ससाठी पण हि बातमी आनंदाची लहर घेऊन आली आहे. मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या वीडियो मेकिंग ऍपला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे आणि मद्रास हायकोर्ट ने ऍप वरील बॅन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बॅन नंतर आईफोनच्या ऍप्पल ऍप स्टोर तसेच एंडरॉयड फोनच्या गूगल प्ले स्टोर वरून हा ऍप काढून टाकण्यात आला होता पण आता कोर्टाने बॅन काढल्यामुळे TikTok आता फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून TikTok साठी भारत मोठी बाजारपेठ बनली आहे. हैराणीची बाब म्हणजे देशात TikTok बॅन झाल्यामुळे चीनी कंपनीला रोज एका दिवसात $500,000 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 3.5 कोटी रुपयांचे नुकसान होत होते. तसेच हा ऍप बनवणाऱ्या कंपनी शंघाई बाइटडांस टेक्नोलॉजी ने असे सांगितले होते कि भारतात TikTok बॅन झाल्यामुळे 250 पेक्षा जास्त नोकऱ्या संपणार आहेत. कंपनी नुसार भारतात TikTok चे 300 मिलियन पेक्षा जास्त यूजर आहेत.

TikTok वर बॅनची मागणी केल्यांनंतर सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टला आदेश देऊन या ऍप वर फाइनल वर्डिक्ट देण्यास सांगितले होते. या ऑर्डर मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले होते कि जर मद्रास हायकोर्ट TikTok वर बॅन संविधानिकरित्या का वैध आहे हे सांगण्यात अयशस्वी ठरल्यास या ऍप वरून बॅन काढून टाकण्यात यावा.

दुसरीकडे TikTok बॅन नंतर याची पॅरेंट कंपनी बाइटडांस टेक्नोलॉजी ने असे विधान केले होते कि टिकटॉक बंद केल्यास भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येईल. असे बोलताना कंपनी ने TikTok वरून असे 60 लाख वीडियोज काढून टाकण्याचा दावा पण केला होता जे त्यांना कम्यूनिटी गाइडलाइनच्या विरोधात वाटले होते.

विशेष म्हणजे यावर्षी पहिल्या तिमाहीत TikTok जगभरात तिसरा सर्वात जास्त इंस्टॉल केला जाणारा ऍप बनला होता. TikTok ने मार्च तिमाहीत जगभरात 18.8 कोटी नवीन यूजर जोडले होते, ज्यात भारताचा वाटा 8.86 कोटी इतका होता.

The post TikTok वरचा बॅन हटला ! पुन्हा करता येईल फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-ban-download-lifted-india-madras-high-court/feed/ 0