TikTok App डिलीट केल्यानंतर पण सर्वर वर राहते तुमची खाजगी माहिती, या स्टेप्स फॉलो केल्या तर होईल संपूर्ण सफाई

TikTok वर वीडियो बनवणाऱ्यांपासून ते वीडियो बघणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांना पकडून भारतात 61 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आपल्या फोन मध्ये टिकटॉक ऍप डाउनलोड म्हणजे इंस्टाल केला आहे. भारतात टिकटॉक आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. आणि या गोष्टीकडे पण दुर्लक्ष करता येणार नाही कि वादग्रस्त असूनही TikTok देशातील सर्वात हिट ऍप्स पैकी एक बनला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून टिकटॉकची पत कमी होत आहे पण अजूनही टिकटॉक यूजर्सची संख्या लाखात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी TikTok ऍप आपल्या स्मार्टफोन्स मधून डिलीट केला आहे. काहींनी चायना विरोधी भावनांमुळे तर काहींनी यू-ट्यूबच्या समर्थनासाठी. 91मोबाईल्स कोणतेही ऍप फोन मध्ये इंस्टाल करण्याची शिफारीश किंवा डिलीट करण्याचे आव्हान करत नाही. पण टिकटॉक फोन मधून डिलीट करण्याच्या या ट्रेंड मध्ये हजारो यूजर एक चूक करत आहेत कि ते ऍप फोन मधून अनइंस्टाल करत आहेत, पण त्यांचे अकाउंट मात्र TikTok च्या सर्वर वर तसेच राहत आहे.

हे सोप्प्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर TikTok सारखे ऍप्स फोन मध्ये इंस्टाल केल्यानंतर त्यावर प्रत्येक यूजरला आपले अकाउंट बनवावे लागते. अकाउंट बनवण्यासाठी ई-मेल आईडी, फोन नंबर, नाव आणि वय सारखी माहिती दिली जाते आणि त्यानंतर प्रत्येक यूजरची यूनिक आईडी तयार होते. टिकटॉक यूजर्सनी पण असेच केले असेल. पण जेव्हा असे ऍप्स फोन मधून अनइंस्टाल किंवा डिलीट केले जातात, तेव्हा तो ऍप तर फोन मधून जातो पण ऍप वर टाकलेली माहिती आणि बनवलेले प्रोफाइल ऍप सर्वर वर सुरक्षित राहते.

जोपर्यंत हि माहिती तुम्ही स्वतःहून डिलीट करत नाही तोपर्यंत हि माहिती ऍप वर तशीच राहते आणि ऍक्टिव्ह राहते. त्यामुळे जेव्हा पुन्हा ऍप इंस्टाल केला जातो तेव्हा पुन्हा आईडी बनवण्याची गरज पडत नाही. जर तुम्हाला हवे असेल कि फक्त TikTok ऍपच फोन मधून डिलीट होऊ नये तर त्या ऍप मध्ये असलेली तुमची सर्व माहिती पण पूर्णपणे डिलीट व्हावी तर आम्ही पुढे सांगितलेल्या सोप्प्या स्टेप्स फॉलो करा. इथे सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो कि या सर्व स्टेप्स ऍप मधेच पूर्ण करता येतील, त्यामुळे तुम्हाला एकदा टिकटॉक ऍप तुमच्या फोन मध्ये पुन्हा इंस्टाल करावा लागेल.

1. सर्वात आधी TikTok तुमच्या स्मार्टफोन मध्ये इंस्टाल करा.

2. ऍप ओपन केल्यानंतर तुमच्या आईडी व पासवर्डने लॉग-इन करा.

3. ऍप मध्ये तुमच्या प्रोफाइल वर जा, यासाठी खाली ‘Me’ टॅब देण्यात आली आहे, तिथे क्लिक करा.

4. तुमचे प्रोफाइल येईल आणि तिथे उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा.

5. ‘Manage My Account’ चा पर्याय उघडा.

6. इथे सर्वात खाली तुम्हाला ‘Delete My Account’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

7. हि शेवटची पायरी आहे, स्क्रीन वर दिलेल्या सूचनांचे पालन करा म्हणजे तुमचे काम होईल.

तुमचे अकाउंट TikTok च्या सर्वर वरून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. आता तुम्ही कोणतीही माहिती इथे राहणार नाही. तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित झाली आहे आणि आता हे ऍप पण तुम्ही फोन मधून काढून टाकू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here