Tinder - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Apr 2020 13:08:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कोरोना लॉकडाउनचा आता येणार नाही कंटाळा, हे टॉप ऑनलाईन डेटिंग ऍप्स दूर करतील तुमचा एकटेपणा https://www.91mobiles.com/marathi/top-online-dating-apps-during-corona-lockdown-in-india-facebook-tuned-tinder-happn-trulymadly-okcupid/ https://www.91mobiles.com/marathi/top-online-dating-apps-during-corona-lockdown-in-india-facebook-tuned-tinder-happn-trulymadly-okcupid/#respond Wed, 08 Apr 2020 13:08:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7038 तरुणाईसाठी आज आम्ही डेटिंग ऍप्सची एक यादी बनवली आहे ज्यांच्या माध्यमातून तरुणाईला वेळ घालवता येईल

The post कोरोना लॉकडाउनचा आता येणार नाही कंटाळा, हे टॉप ऑनलाईन डेटिंग ऍप्स दूर करतील तुमचा एकटेपणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना वायरसच्या प्रभावाने जगाला घरात कैद केले आहे. भारतात पण 21 दिवसांचा लॉकडाउन चालू आहे जो 14 एप्रिल पर्यंत चालू राहील. पण त्यानंतर सर्वकाही नेहमीसारखे सुरु होईल कि पुन्हा लॉकडाउन वाढवला जाईल याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. Corona Lockdown मुळे लोकांना घरातून बाहेर जाता येत नाही. टीव्ही, मोबाईल व गेम्स सोबतच खाणे आणि झोपणे हे करून दिवस घालवावे लागत आहेत. पण तरुणाईला घरात राहणे जरा कठीण जात आहे. तरुण व तरुणी सध्या जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर घालवत आहेत. अश्या तरुणाईसाठी आज आम्ही डेटिंग ऍप्सची एक यादी बनवली आहे ज्यांच्या माध्यमातून तरुणाईला वेळ घालवता येईलच आणि कदाचित कोरोना वायरसचा हा लॉकडाउन त्यांना नवीन गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळवण्यास मदत करू शकतो.

Facebook Tuned

हे नाव तुमच्यासाठी नवीन असेल. फेसबुकने पण संधी ओळखून आपल्या तरुण युवा यूजर्ससाठी चांगली सुरवात केली आहे. कंपनीने नवीन चॅटिंग ऍप लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे Tuned. हे ऍप खासकरून कपल्ससाठी तयार करण्यात आले आहे जी एक प्राइवेट स्पेस आहे. इथे तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असूनही संपर्कात राहू शकता. सर्व खाजगी गप्पा तसेच खास क्षण, फोटो, लव नोट्स आणि वॉयस सोबतच म्यूजिक पण शेयर करू शकता. या ऍप मध्ये Spotify लिंक करून तुम्ही तुमच्या जोडीदाराची आवडती गाणी पण प्ले करू शकता. लक्षात असू दे हा ऍप याच आठवड्यात यूएस आणि कॅनडा मध्ये लॉन्च झाला आहे, भारतातात येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

Tinder

तरुणाई कधी पहिल्या नजरेत पसंत करते किंवा कधी वेळ घेऊन समजून घेते. ज्या लोकांना समोरच्याला आपण आवडू कि नाही याची भीती असते त्यांची भीती हा ऍप काही अंशी दूर करतो हा ऍप आहे टिंडर. या ऍप मध्ये तुम्ही फेसबुकने साइन इन करू शकता. त्यानंतर हे तुमच्या माहिती तसेच आवडीनुसार तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्याची संधी देते. हा वापरण्यास खूप सोप्पा आहे. समोर आलेल्या यादीतील कोणी आवडले तर तुम्ही उजवीकडे स्वाईप करू शकता आणि नाही आवडले तर डावीकडे. आणि जर कोणी तुम्हाला लाईक बॅक केले तर समजून जा कि लॉकडाउन मध्ये तुम्हाला आता कंटाळा येणार नाही.

Happn

‘मेरे समोर वाली खिड़की मध्ये एक चॉंद सा मुखड़ा रहता आहे…’ हे फक्त गाणे राहणार नाही जर तुम्ही हॅप्पन वापरू लागलात तर. हॅप्पन ऍप फक्त एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांची भेट घडवून देत नाही तर तुम्ही जिथे जिथे जाता तिथल्या यूजर्सशी भेट घडवतो. कोरोना लॉकडाउन मध्ये तुम्ही तुमच्या घरात अडकले आहेत पण कदाचित तुमच्याच सोसायटी किंवा कॉलोनी मध्ये अजून एक तुमच्यासारखे मन असेल. फक्त हॅप्पन त्याच व्यक्तीला तुमच्या जवळ घेऊन येईल. हा ऍप तुमच्या आजूबाजूला असलेल्या हॅप्पन यूजर्सची माहिती देतो. याचा सर्वात जास्त फायदा तुम्ही जिथून जात आहेत तिथून कोण कोण गेले आहे हे जाणून घेण्यासाठी होतो.

TrulyMadly

डेटिंग साठी ट्रूलीमॅड्ली सर्वात सुरक्षित आणि रियाबल ऍप पैकी एक आहे. हा फक्त तुम्हाला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड शोधण्यास मदत करत नाही तर त्यांना जाणून घेण्याची संधी पण देतो. ऍप मधील स्पार्क फिचर तुम्हाला गर्दीतील वेगळी माणसे ओळखण्याची संधी देतो. ऍप मधील स्टीकर्स तुमच्या मेसेज मधून तुमच्या मनातले मनापर्यंत पोहचवतील. तसेच ऍप मधील क्वीज गेम्स् तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला एकमेकांना समजून घेण्यास मदत करतील. ट्रूलीमॅड्ली वापरणे म्हणजे या लॉकडाउन मध्ये तुमच्या मनाचे दरवाजे उघडणे.

OkCupid

जर तुम्हाला वाटत असेल कि तुमची प्रेम भावना इन्टेन्स आणि पॅशिनेट आहे आणि त्यामुळे तुम्ही आतापर्यंत सिंगल असाल तर अशी इच्छा ठेवणारे पण अनेक लोक आहेत. ओके क्यूपिड तुमची हीच इच्छा तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवेल. या ऍप मधील बॉडी टाईप, सेक्सुअल प्रेफरन्स सारखे ऑप्शन्स तुमच्या प्रोफाईल मध्ये लोकांची आवड वाढवतात. जास्त दिवस राहिले नाहीत, लवकरच तयार व्हा. कदाचित तुमच्या भावी पार्टनरने आमचा हा लेख वाचून यातील एखादा ऍप डाउनलोड केला असेल आणि तुम्हाला शोधात पण असेल.

हीच ती वेळ तुमच्या कंटाळवाण्या लॉकडाउन मध्ये जीव ओतण्याची. कोरोना लॉकडाउनचे पालन करा आणि तुमच्या टाईमपासची जबाबदारी या ऍप्स वर टाकून द्या.

The post कोरोना लॉकडाउनचा आता येणार नाही कंटाळा, हे टॉप ऑनलाईन डेटिंग ऍप्स दूर करतील तुमचा एकटेपणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-online-dating-apps-during-corona-lockdown-in-india-facebook-tuned-tinder-happn-trulymadly-okcupid/feed/ 0
‘सिंगल’ लोकांना फेसबुकची भेट , आता चॅटिंग सोबत होईल डेटिंग पण https://www.91mobiles.com/marathi/facebook-dating-service-tinder-match-for-single-user-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/facebook-dating-service-tinder-match-for-single-user-in-marathi/#respond Wed, 02 May 2018 10:40:38 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=215 सोशल नेट​वर्किंग साइट फेसबुक जगात सर्वात जास्त वापरली जाणारी नेट​वर्किंग साइट मधील एक आहे. फेसबुक लोकांशी कनेक्ट होण्यासाठी एक उत्तम प्लॅटफार्म आहे, जो दूरवरच्या लोकांशी ओळख वाढवण्याची संधी देतो. आपल्या यूजर्स साठी खास भेट म्हणून फेसबुक आता लवकरच चॅटिंग सोबत डेटिंग ची सुविधा घेऊन येणार आहे. फेसबुक लवकरच आपली डेटिंग सर्विस करणार आहे. फेसबुक च्या […]

The post ‘सिंगल’ लोकांना फेसबुकची भेट , आता चॅटिंग सोबत होईल डेटिंग पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सोशल नेट​वर्किंग साइट फेसबुक जगात सर्वात जास्त वापरली जाणारी नेट​वर्किंग साइट मधील एक आहे. फेसबुक लोकांशी कनेक्ट होण्यासाठी एक उत्तम प्लॅटफार्म आहे, जो दूरवरच्या लोकांशी ओळख वाढवण्याची संधी देतो. आपल्या यूजर्स साठी खास भेट म्हणून फेसबुक आता लवकरच चॅटिंग सोबत डेटिंग ची सुविधा घेऊन येणार आहे. फेसबुक लवकरच आपली डेटिंग सर्विस करणार आहे.

फेसबुक च्या वार्षिक कॉन्फ्रेंस मध्ये एफबी चे मालक मार्क जुकरबर्ग ने घोषणा केली की त्यांची कंपनी फेसबुक लवकरच आपली डेटिंग सर्विस पण सुरु करणार आहे. मार्क ने सांगितले की जगातील सर्वात मोठी सोशल नेट​वर्किंग साइट फेसबुक आता फक्त फ्रेंडशिप नाही तर रोमांटिक रिलेशनशिप्स जोडण्यासाठी पण प्लॅटफार्म उपलब्ध करून देईल. ही घोषणा मार्क ने फेसबुक च्या सॉफ्टवेयर ​डेवलेपर्सना संबोधित करताना केली.

A 3D plastic representation of the Facebook logo is seen in this illustration in Zenica, Bosnia and Herzegovina, May 13, 2015. REUTERS/Dado Ruvic

मार्क जुकरबर्ग ने या कॉन्फ्रेंस मध्ये सांगितले की सध्या फेसबुक वर जवळपास 20 करोड यूजर्स ‘सिंगल’ आहेत आणि या सिंगल लोकांना मदत करण्यासाठी कंपनी नवीन प्लॅटफार्म घेऊन येत आहे. ही नवीन सर्विस यूजर्सना नवीन आणि चांगले रिलेशन शोधण्यास मदत करेल. या सर्विस च्या माध्यमातून यूजर आपल्या आवडी नुसार आपला पार्टनर निवडू शकतील. मार्क च्या मते ही सर्विस पूर्णपणे सिक्योर आणि खासगी असेल. जे यूजर याला वापरता आहेत, त्यांच्या फ्रेंडलिस्ट मधील मित्र पण त्यांची एक्टिविटी बघू शकणार नाहीत.

फेसबुक ही डेटिंग सर्विस केव्हा लॉन्च करेल याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे सिंगल लोकांना थोडी वाट बघावी लागेल. तसेच दुसरीकडे फेसबुक एका नवीन टूल ‘क्लियर हिस्ट्री’ वर पण काम करत आहे ज्यात फेसबुक ब्राउजिंग, चॅटिंग व एक्टिविटी संबंधित हिस्ट्री आपोआप नष्ट होईल.

The post ‘सिंगल’ लोकांना फेसबुकची भेट , आता चॅटिंग सोबत होईल डेटिंग पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/facebook-dating-service-tinder-match-for-single-user-in-marathi/feed/ 0