कोरोना लॉकडाउनचा आता येणार नाही कंटाळा, हे टॉप ऑनलाईन डेटिंग ऍप्स दूर करतील तुमचा एकटेपणा

कोरोना वायरसच्या प्रभावाने जगाला घरात कैद केले आहे. भारतात पण 21 दिवसांचा लॉकडाउन चालू आहे जो 14 एप्रिल पर्यंत चालू राहील. पण त्यानंतर सर्वकाही नेहमीसारखे सुरु होईल कि पुन्हा लॉकडाउन वाढवला जाईल याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. Corona Lockdown मुळे लोकांना घरातून बाहेर जाता येत नाही. टीव्ही, मोबाईल व गेम्स सोबतच खाणे आणि झोपणे हे करून दिवस घालवावे लागत आहेत. पण तरुणाईला घरात राहणे जरा कठीण जात आहे. तरुण व तरुणी सध्या जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर घालवत आहेत. अश्या तरुणाईसाठी आज आम्ही डेटिंग ऍप्सची एक यादी बनवली आहे ज्यांच्या माध्यमातून तरुणाईला वेळ घालवता येईलच आणि कदाचित कोरोना वायरसचा हा लॉकडाउन त्यांना नवीन गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळवण्यास मदत करू शकतो.

Facebook Tuned

हे नाव तुमच्यासाठी नवीन असेल. फेसबुकने पण संधी ओळखून आपल्या तरुण युवा यूजर्ससाठी चांगली सुरवात केली आहे. कंपनीने नवीन चॅटिंग ऍप लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे Tuned. हे ऍप खासकरून कपल्ससाठी तयार करण्यात आले आहे जी एक प्राइवेट स्पेस आहे. इथे तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असूनही संपर्कात राहू शकता. सर्व खाजगी गप्पा तसेच खास क्षण, फोटो, लव नोट्स आणि वॉयस सोबतच म्यूजिक पण शेयर करू शकता. या ऍप मध्ये Spotify लिंक करून तुम्ही तुमच्या जोडीदाराची आवडती गाणी पण प्ले करू शकता. लक्षात असू दे हा ऍप याच आठवड्यात यूएस आणि कॅनडा मध्ये लॉन्च झाला आहे, भारतातात येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

Tinder

तरुणाई कधी पहिल्या नजरेत पसंत करते किंवा कधी वेळ घेऊन समजून घेते. ज्या लोकांना समोरच्याला आपण आवडू कि नाही याची भीती असते त्यांची भीती हा ऍप काही अंशी दूर करतो हा ऍप आहे टिंडर. या ऍप मध्ये तुम्ही फेसबुकने साइन इन करू शकता. त्यानंतर हे तुमच्या माहिती तसेच आवडीनुसार तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्याची संधी देते. हा वापरण्यास खूप सोप्पा आहे. समोर आलेल्या यादीतील कोणी आवडले तर तुम्ही उजवीकडे स्वाईप करू शकता आणि नाही आवडले तर डावीकडे. आणि जर कोणी तुम्हाला लाईक बॅक केले तर समजून जा कि लॉकडाउन मध्ये तुम्हाला आता कंटाळा येणार नाही.

Happn

‘मेरे समोर वाली खिड़की मध्ये एक चॉंद सा मुखड़ा रहता आहे…’ हे फक्त गाणे राहणार नाही जर तुम्ही हॅप्पन वापरू लागलात तर. हॅप्पन ऍप फक्त एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांची भेट घडवून देत नाही तर तुम्ही जिथे जिथे जाता तिथल्या यूजर्सशी भेट घडवतो. कोरोना लॉकडाउन मध्ये तुम्ही तुमच्या घरात अडकले आहेत पण कदाचित तुमच्याच सोसायटी किंवा कॉलोनी मध्ये अजून एक तुमच्यासारखे मन असेल. फक्त हॅप्पन त्याच व्यक्तीला तुमच्या जवळ घेऊन येईल. हा ऍप तुमच्या आजूबाजूला असलेल्या हॅप्पन यूजर्सची माहिती देतो. याचा सर्वात जास्त फायदा तुम्ही जिथून जात आहेत तिथून कोण कोण गेले आहे हे जाणून घेण्यासाठी होतो.

TrulyMadly

डेटिंग साठी ट्रूलीमॅड्ली सर्वात सुरक्षित आणि रियाबल ऍप पैकी एक आहे. हा फक्त तुम्हाला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड शोधण्यास मदत करत नाही तर त्यांना जाणून घेण्याची संधी पण देतो. ऍप मधील स्पार्क फिचर तुम्हाला गर्दीतील वेगळी माणसे ओळखण्याची संधी देतो. ऍप मधील स्टीकर्स तुमच्या मेसेज मधून तुमच्या मनातले मनापर्यंत पोहचवतील. तसेच ऍप मधील क्वीज गेम्स् तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला एकमेकांना समजून घेण्यास मदत करतील. ट्रूलीमॅड्ली वापरणे म्हणजे या लॉकडाउन मध्ये तुमच्या मनाचे दरवाजे उघडणे.

OkCupid

जर तुम्हाला वाटत असेल कि तुमची प्रेम भावना इन्टेन्स आणि पॅशिनेट आहे आणि त्यामुळे तुम्ही आतापर्यंत सिंगल असाल तर अशी इच्छा ठेवणारे पण अनेक लोक आहेत. ओके क्यूपिड तुमची हीच इच्छा तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवेल. या ऍप मधील बॉडी टाईप, सेक्सुअल प्रेफरन्स सारखे ऑप्शन्स तुमच्या प्रोफाईल मध्ये लोकांची आवड वाढवतात. जास्त दिवस राहिले नाहीत, लवकरच तयार व्हा. कदाचित तुमच्या भावी पार्टनरने आमचा हा लेख वाचून यातील एखादा ऍप डाउनलोड केला असेल आणि तुम्हाला शोधात पण असेल.

हीच ती वेळ तुमच्या कंटाळवाण्या लॉकडाउन मध्ये जीव ओतण्याची. कोरोना लॉकडाउनचे पालन करा आणि तुमच्या टाईमपासची जबाबदारी या ऍप्स वर टाकून द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here