Top 5 Android Smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Jun 2020 10:12:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5 बेस्ट Nokia स्मार्टफोन, 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/best-nokia-phone-under-rs-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-nokia-phone-under-rs-20000/#respond Fri, 26 Jun 2020 10:12:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7552 आम्ही 20 हजार रुपयांच्या बजेट मध्ये अश्याच 5 शानदार नोकिया फोनची माहिती दिली आहे जे तुम्हाला आवडतील.

The post 5 बेस्ट Nokia स्मार्टफोन, 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येकाचा एक आवडीचा ब्रँड असतो आणि त्या ब्रँडचे फोन आपल्याला घेण्यास आवडते. कोणाला शाओमी, कोणाला सॅमसंग, कोणाला वीवो तर कोणाला ओपो आवडतो. परंतु आज पण अनेक लोक असे आहेत जे नोकियाचे चाहते आहेत. लोक नोकिया फोन बाबत तक्रार करत असतात कि किंमतीनुसार महाग फोन्स आहेत किंवा थोडे अजून फीचर असते तर मजा आली असती. परंतु हि गोष्ट मात्र सत्य आहे कि भारतात आज पण लोकांचे नोकियावर खूप प्रेम आहे. जेव्हा एखादा नोकिया फोन येतो तेव्हा सर्वांचे त्याकडे लक्ष असते. तसेच एक असा वर्ग आहे जो आता पण नोकिया फोनच घेऊ इच्छितो. सर्वात चांगली बाब अशी कि भारतात मोठ्या प्रमाणात नोकिया फोन्स उपलब्ध पण आहेत. पुढे आम्ही 20 हजार रुपयांच्या बजेट मध्ये अश्याच 5 शानदार नोकिया फोनची माहिती दिली आहे जे तुम्हाला आवडतील.

नोकिया 8.1

हा फोन गेल्यावर्षी लॉन्च केला गेला होता. परंतु तेव्हा खुप महाग होता. परंतु आज जर या फोनचे फीचर्स आणि किंमत तुम्ही बघितले तर हा फोन महाग वाटणार नाही. तसेच याची स्मार्ट ऑपरेटिंग सिस्टम पण तुम्हाला खूप आवडेल. नोकिया फोन एंडरॉयडवन इंटीग्रेशन सह लॉन्च होतात त्यामुळे सर्वात आधी यांना नवीन एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमचा अपडेट मिळतो. नोकिया 8.1 एंड्रॉयड 9 वर सादर केला गेला होता. परंतु आता हा एंड्रॉयड 10 वर चालत आहे आणि याला एंड्रॉयड 11 चा अपडेट पण मिळेल. नोकिया 8.1 मध्ये 6.18 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो जो खूप शानदार आहे. फोन मध्ये 12 MP + 13 MP डुअल प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच बरोबर 20 MP फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी 3500 mAh ची बॅटरी उपलब्ध आहे.

नोकिया 7.2 6जीबी

जर तुम्हाला जास्त स्मार्ट कॅमेरा आणि जास्त रॅम हवा असेल तर तुम्ही नोकिया 7.2 बघू शकता. या फोन मध्ये 6.39 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन ग्लास फिनिश सह सादर केला गेला आहे आणि याची डिजाइन पण कॉम्पॅक्ट आहे. फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. राहिला प्रश्न परफॉर्मेंसचा तर नोकिया 7.2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर सादर केला गेला आहे आणि यात 6जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 64जीबी की इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी 48 MP + 8 MP + 5 MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 20 MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 3500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 5.1 प्लस

कमी रेंज मधील एखादा कॉम्पॅक्ट नोकिया फोन घेण्याचा विचार करत असाल तर 5.1 प्लस एक चांगला ऑप्शन आहे. या फोन मध्ये तुम्हाला 5.86 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल आणि हि खूप कॉम्पॅक्ट आहे. पूर्ण फोनचा वापर तुम्ही एका हाताने करू शकता. फोटोग्राफीसाठी 13 MP + 5 MP चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. हा फोन मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालतो आणि कंपनीने 6जीबी रॅम दिला आहे. पावर बॅकअपसाठी 3060 mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

नोकिया 6.2

जर कमी रेंज मध्ये नोकियाचा मोठी स्क्रीन असलेला फोन तुम्हला घ्यायचा असेल तर नोकिया 6.2 बघू शकता. हा फोन परफॉर्मंस आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत मागे राहत नाही. नोकिया 6.2 मध्ये 6.3 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे आणि कंपनीने फुल एचडी+ डिस्प्ले रेजल्यूशनचा वापर केला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कॅमेरा पाहता हा फोन 16 MP + 8 MP + 5 MP च्या ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येतो. तसेच फ्रंटला 8 MP चा सेंसर आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 3500 mAh ची बॅटरी आहे आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो. त्याचबरोबर फोन मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आहे.

नोकिया 7.1

कमी रेंज मध्ये नोकियाचा अजून एक फोन आहे ज्याची चर्चा केली जाऊ शकते आणि तो आहे नोकिया 7.1 मोबाईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. राहिला प्रश्न डिस्प्लेचा तर कंपनीने हा 5.84 इंचाच्या स्क्रीन सह सादर केला आहे. स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. फोटोग्राफीसाठी 12 MP + 5 MP चा डुअल कॅमेरा आहे आणि फ्रंटला 8 MP चा सेल्फी आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी सह येतो. तसेच पावर बॅकअपसाठी 3060 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

The post 5 बेस्ट Nokia स्मार्टफोन, 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-nokia-phone-under-rs-20000/feed/ 0
जुलै मध्ये हे 5 दमदार फोन भारतात होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/top-5-phone-to-launch-in-india-vivo-z1-pro-xiaomi-redmi-7a-redmi-k20-and-redmi-k20-pro-realme-x-samsung-galaxy-a80/ https://www.91mobiles.com/marathi/top-5-phone-to-launch-in-india-vivo-z1-pro-xiaomi-redmi-7a-redmi-k20-and-redmi-k20-pro-realme-x-samsung-galaxy-a80/#respond Mon, 01 Jul 2019 14:08:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4707 मोठ्या फोन सोबतच काही छोटे बजेटचे प्रसिद्ध मॉडेल व काही नवीन सीरीज पण येऊ शकतात.

The post जुलै मध्ये हे 5 दमदार फोन भारतात होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला आपण आपले बजेट ठरवतो आणि सोबतच संपूर्ण महिन्यात काय होणार आहे याचा अंदाज पण लावतो. जुलै सुरु झाला आहे आणि हा महीना पण खूप काही घेऊन येणार आहे. तुमच्या घरासाठी तुम्ही अंदाज तर लावला असेल पण मोबाईल विषात या महिन्यात काय होणार आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . जुलै मध्ये अनेक मोठे फोन भारतात येणार आहेत. मोठ्या फोन सोबतच काही छोटे बजेटचे प्रसिद्ध मॉडेल व काही नवीन सीरीज पण येऊ शकतात. पुढे आम्ही जुलै मध्ये लॉन्च होणाऱ्या अशाच 5 दमदार फोन्स माहिती दिली आहे.

1. Vivo Z1 Pro

या महिन्यात सर्वात आधी वीवोचा Z1 प्रो मॉडेल येणार आहे. 3 जुलैला हा भारतात लॉन्च केला जाणार आहे. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो एक्सक्लूसिव ऑनलाइन स्टोर साठी लॉन्च केला जात आहे. Vivo Z1 Pro मध्ये 6.53-इंचाची फुल एचडी+ एलएसडी स्क्रीन आहे जी पंच होल डिस्प्ले सह उपलब्ध आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी आणि 6जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबतच 64जीबी आणि 128जीबी मेमरी मिळेल. फोटोग्राफी साठी 16 एमपी + 8 एमपी + 3 एमपी चा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच 32 एमपी चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोन मध्ये 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

2. Xiaomi Redmi 7A

गेल्या महिन्यात शाओमी ने Redmi 7A मॉडेल चीन मध्ये सादर केला होता. 4 जुलैला हा फोन भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने आज आपल्या ट्विटर हँडल वरून याची माहिती दिली आहे. या फोनचे पण स्पेसिफिकेशन आधीपासूनच उपलब्ध आहेत. या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट वाला 5.45-इंचाचा आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 2 जीबी रॅम मेमरी आहे. तसेच हा फोन 16जीबी आणि 32जीबी च्या स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. फोटोग्राफी साठी 13-मेगापिक्सल रियर आणि 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कंपनीने हा मोठ्या बॅटरी सह सादर केला आहे आणि फोन मध्ये 4,000एमएएच ची बड़ी बॅटरी देण्यात आली आहे.

3. Xiaomi Redmi K20 and Redmi K20 Pro

या महिन्यात शाओमीचा अजून एक फोन भारतात लॉन्च होणार आहे. कंपनी REDMI K20 आणि K20 PRO लॉन्च करणार आहे. आशा आहे कि हा 16 जुलैला लॉन्च केला जाऊ शकतो. चीन मध्ये आधीच सादर केले गेले असल्यामुळे या फोनचे स्पेसिफिकेशन पण उपलब्ध आहेत. REDMI K20 आणि K20 PRO मध्ये 6.39-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 कोटेड आहे. REDMI K20 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट वर चालतो तर REDMI K20 PRO स्नॅपड्रॅगॉन 855 आधारित आहे.

फोटोग्राफी साठी दोन्ही फोन मध्ये ट्रिपल कॅमेरा आहे जो 48-मेगापिक्सल + 13-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सलच्या सेंसर सह येतो. तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा उपलब्ध आहे. दोन्ही फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

4. Realme X

एप्रिल मध्ये रियलमी ने पॉप—अप कॅमेऱ्या सह पहिला फोन चीन मध्ये लॉन्च केला होता. तर आता कंपनी हा फोन भारतात घेऊन येत आहे. बातमीनुसार 15 जुलै पर्यंत हा लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 6.53-इंचाचा फुल एचडी+ ऐमोलेड डिस्प्ले आहे. कंपनीने हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर सादर केला आहे आणि यात 48-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा मिळेल. सोबतच 16-मेगापिक्सलचा फ्रंट पॉप—अप कॅमेरा आहे. फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि हा 3,765एमएएच ची बॅटरी सह येतो.

5. सॅमसंग गॅलेक्सी ए80

मार्च मध्ये सॅमसंग ने गॅलेक्सी ए80 मॉडेल थाईलैंड मध्ये सादर केला होता. 91मोबाईल्स कडे अशी एक्सक्लूसिव माहिती आहे कि कंपनी हा जुलै मधेच भारतात लॉन्च करणार आहे. हा कंपनीचा पहिला फोन स्लाइड आउट रोटेटिंग कॅमेरा सह येणार फोन आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए80 मध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो आणि यात 8जीबी रॅम मेमरी आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 48-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + टीओएफ डेफ्थ सेंसिंग कॅमेरा उपलब्ध आहे. यात रियर कॅमेराच सेल्फी साठी वापरता येतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाली 3,700एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post जुलै मध्ये हे 5 दमदार फोन भारतात होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-5-phone-to-launch-in-india-vivo-z1-pro-xiaomi-redmi-7a-redmi-k20-and-redmi-k20-pro-realme-x-samsung-galaxy-a80/feed/ 0
20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/#respond Fri, 21 Dec 2018 13:22:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3194 आम्ही 5 शानदार फोन्सचा उल्लेख या लेखात केला आहे जे या बजेट मध्ये येतात.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुमचे बजेट 20,000 रुपये असेल तर तुम्ही या बजेट मध्ये सर्वकाही शोधात. तुम्हाला फोनचा लुक प्रीमियम हवा असतो, तुम्हाला याचा कॅमेरा दमदार, बॅटरी बॅकअप शानदार पाहिजे असतो आणि जास्त मेमरी सोबत प्रोसेसिंग पण पावरफुल हवी असते. एकंदरीत तुम्ही फ्लॅगशिप फीचर कमी बजेट मध्ये शोधता. भारतीय बाजारात असे फोन आहेत जे तुमच्या प्रत्येक गरज पूर्ण करतात. खाली आम्ही अशाच 5 शानदार फोन्सचा उल्लेख केला आहे.

पोको एफ1

परफॉर्मेंस आणि फीचर्सच्या बाबतीती 20,000 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या सर्वात बेस्ट फोन्स पैकी एक आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ऑनर प्ले

ऑनर चा हा फोन पोको एफ1 पेक्षा कमी नाही. गेमिंग असो किंवा अजूनही काही सर्व बाबतीती हा टक्कर देतो.मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे. ऑनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

असूस ने नुकताच झेनफोन मॅक्स प्रो एम1चा अपग्रेड आणला आहे. हा फोन पण कमाल आहे. डिजाइन डिस्प्ले किंवा मग स्पेसिफिकेशन प्रत्येक बाबतीती हा चांगलाच आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो असलेली 6.3-इंचाची फुलएचडी+ आईपीएस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित हा फोन 3जीबी, 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह येतो. तसेच इंटरनल मेमरी 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी आहे. फोटोग्राफी साठी 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे जो वाइड एंगल ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी 13—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आधारित या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी 2 प्रो

रियलमी 2 प्रो का जिक्र आज हर जगह पर हो रहा आहे. उसका सर्वात बड़ा कारण आहे कमी प्राइस मध्ये बेस्ट स्पेसिफिकेशन. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी ए2

परफॉर्मेंस च्या बाबतीती हा फोन पण इतरांपेक्षा कमी नाही. शानदार प्रोसेसर सह कंपनी ने हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर केला आहे जो दोन वर्षांपर्यंत ओएस अपडेट देतो. अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 5.99-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टड आहे. क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या डिवाइस मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मी ए2 मध्ये 20-मेगा​पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/feed/ 0