Uunchai Movie - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 16 Nov 2022 06:27:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Uunchai OTT release Date: मनाला स्पर्श करेल अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा चित्रपट, ऑनलाइन रिलीजची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/uunchai-ott-release-date-amitabh-bachchan-and-anupam-kher-boman-irani-when-and-where-to-watch/ https://www.91mobiles.com/marathi/uunchai-ott-release-date-amitabh-bachchan-and-anupam-kher-boman-irani-when-and-where-to-watch/#respond Wed, 16 Nov 2022 06:27:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14987 प्रसिद्ध दिग्दर्शक Sooraj Barjatya यांचा ‘Uunchai’ चित्रपट सध्या मोठा पडदा गाजवत आहे. Amitabh Bachchan, Anupam Kher आणि Boman Irani सारख्या तगड्या अभिनेत्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयानं दर्शकांची मने जिंकली आहेत. Uunchai Movie नं आतापर्यंत खूप चांगला बिजनेस देखील केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. हा चित्रपट दर्शकांना मोटिवेट […]

The post Uunchai OTT release Date: मनाला स्पर्श करेल अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा चित्रपट, ऑनलाइन रिलीजची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रसिद्ध दिग्दर्शक Sooraj Barjatya यांचा ‘Uunchai’ चित्रपट सध्या मोठा पडदा गाजवत आहे. Amitabh Bachchan, Anupam Kher आणि Boman Irani सारख्या तगड्या अभिनेत्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयानं दर्शकांची मने जिंकली आहेत. Uunchai Movie नं आतापर्यंत खूप चांगला बिजनेस देखील केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. हा चित्रपट दर्शकांना मोटिवेट करत आहे आणि याची गोष्ट मनाला स्पर्श करून जाते, असं नेटिझन्स म्हणत आहेत. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल आणि थिएटर ऐवजी ऑनलाइन रिलीजची वाट बघत असाल तर आम्ही तुमच्यासाठी Uunchai OTT release Date आणि प्लॅटफॉर्मची माहिती घेऊन आलो आहोत.

Uunchai Story

Uunchai चित्रपटामधील कलाकार मंडळी पाहत यात अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेरसह Danny Denzongpa, Parineeti Chopra, Neena Gupta आणि Sarika सारखे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. या चित्रपटातून त्या तीन वृद्ध मित्रांची गोष्ट सांगण्यात आली आहे जे आपल्या चौथ्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्ट कॅम्पची चढाई करण्याची मोहीम हाती घेतात. या प्रवासात त्यांच्या समोर येणाऱ्या संकटांचा सामना करताना त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू समोर येऊ लागतात. हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Samsung Galaxy A54 5G; लाँच पूर्वीच पाहा फोनची झलक

Uunchai Box Office Collection

ऊंचाई चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगला बिजनेस देखील केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे की या चित्रपटानं खूप चांगला बिजनेस केला आहे. आकडेवारी पाहता आतापर्यंत या चित्रपटानं चार कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. हा चित्रपट दिग्दर्शक सूरज बार्जातीय यांच्यासाठी खूप महत्वाचा मनाला जात आहे. कारण त्यांनी ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपट 2015 मध्ये केला होता, त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळी आहे. अमिताभ बच्चन काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात गुरूच्या भूमिकेत दिसले होते. हे देखील वाचा: 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत विवोचा नवाकोरा स्मार्टफोन! असे आहेत स्वस्त स्मार्टफोनचे फिचर

Uunchai OTT Date

ऊंचाई चित्रपटाच्या OTT रिलीज डेटची कोणतीही अधिकृत माहिती निर्मात्यांनी किंवा अभिनेत्यांनी दिली नाही. परंतु हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल हे स्पष्ट झालं आहे. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. कारण Zee5 प्लॅटफॉर्मनं ऊंचाई चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Uunchai OTT release Date: मनाला स्पर्श करेल अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा चित्रपट, ऑनलाइन रिलीजची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/uunchai-ott-release-date-amitabh-bachchan-and-anupam-kher-boman-irani-when-and-where-to-watch/feed/ 0