Samsung Galaxy A54 5G च्या इमेजेस लीक; लाँच पूर्वीच पाहा फोनची झलक

अलीकडेच आलेल्या आयडीसीच्या रिपोर्ट्सनुसार भारतीय स्मार्टफोन बाजारातील मार्केट शेयरच्या बाबतीत दक्षिण कोरियन कंपनी Samsung दुसऱ्या स्थानावर आहे. ही आकडेवारी 2022 च्या दुसऱ्या तिमाहीतील आहे. आता कंपनी आपलं हे स्थान आणखी बळकट करण्यासाठी Samsung Galaxy A54 5G लाँच करण्याची तयारी करत आहे. हा एक मिडबजेट मोबाइल फोन असेल जो 5जी बँड्सला सपोर्टसह येईल. अधिकृत माहिती आली नसली तरी 91मोबाइल्सला या सॅमसंग फोनची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ मिळाला आहे. लाँचपूर्वीच Samsung Galaxy A54 5G च्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे तसेच फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

91मोबाइल्स आणि ऑनलीक्सनं मिळून सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनच्या रेंडर ईमेज शेयर केल्या आहेत. या फोटोज सोबतच फोनचा 360डिग्री व्हिडीओ देखील बनवण्यात आला आहे ज्यात फोन सर्व अँगलमधून बघता येईल. या फोटोज व व्हिडीओमध्ये Samsung Galaxy A54 5G च्या लुक व डिजाईनवरून पडदा हटवण्यात आला आहे तसेच फोन स्क्रीन, बॉडी, कॅमेरा, सेन्सर्स, पोर्ट्स व डिजाईनचा खुलासा झाला आहे. पुढे फोनच्या फोटोज सोबतच डिजाईनची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत विवोचा नवाकोरा स्मार्टफोन! असे आहेत स्वस्त स्मार्टफोनचे फिचर

Samsung Galaxy A54 5G ची डिजाईन

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी पंच-होल डिजाईन असलेल्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल जी स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी असेल. हा पंच-होल बॉडी एजपासून थोडा दूर असेल. स्क्रीनच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तर फोनच्या टॉप पॅनलवर सिम स्लॉटसह मायक्रोफोन आहे.

Samsung Galaxy A54 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेपमध्ये आहे. या सेटअपमध्ये तीन कॅमेरा लेन्स देण्यात आल्या आहेत ज्यांच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनलवर कोणतेही अन्य सेन्सर नाहीत तसेच इथे खालच्या बाजूला सॅमसंगची ब्रँडिंग देण्यात आली आहे. फोनच्या लोवर पॅनलवर स्पिकर ग्रिल, मायक्रोफोन तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: एक दोन नव्हे तर 12 5G बँड्स असलेल्या फोनवर जबरदस्त सूट; कमी किंमतीत पावरफुल प्रोसेसरची ताकद

Samsung Galaxy A54 5G चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. फोनचे डायमेंशन 158.3 x 76.7 x 8.2एमएम असू शकतात. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 7904 चिपसेट तसेच 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो. Samsung Galaxy A54 5G मध्ये 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here