Vivo U20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Dec 2019 12:34:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/#respond Wed, 18 Dec 2019 12:34:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6074 या सेल अंतर्गत Vivo ब्रँडच्या सर्व स्मार्टफोन 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआई वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
क्रिसमस आणि न्यू ईयरच्या तयारीने बाजार सजला आहे. त्याचबरोबर सर्व स्मार्टफोन आणि टेक ब्रँड या संधीचा फायदा घेण्यासाठी नवीन व आर्कषक ऑफर घेऊन येत आहेत. यात स्मार्टफोन ब्रँड Vivo ने पण क्रिसमस कार्निवलची घोषणा केली आहे. Vivo Christmas Carnival आज म्हणजे 18 डिसेंबरला सुरु होऊन 20 डिसेंबर पर्यंत सुरु राहील. या तीन दिवसीय फेस्टिवल सेलचे आयोजन कंपनीने फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर केले आहे आणि यूजर्स वीवोच्या अधिकृत वेबसाइट वरच सेल अंतर्गत मिळणाऱ्या शानदार ऑफर्स, डिस्काउंट आणि फ्री गिफ्ट मिळवू शकतील.

सर्वात आधी Vivo Z सीरीज बद्दल बोलायचे तर क्रिसमस कॉर्निवल अंतर्गत Vivo Z1 Pro वर कंपनी थेट 1,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. 13,990 रुपयांचा फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट डिस्काउंटनंतर 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच 14,990 रुपयांचा 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये मिळेल. Vivo Z1 Pro चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट Vivo प्रीपेड पेमेंट वर 1,000 रुपयांनी स्वस्त विकला जात आहे.

त्याचप्रमाणे Vivo Z1x चा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट पण Vivo Christmas Carnival अंतर्गत 1,000 डिस्काउंट सह विकत घेता येईल, ज्यामुळे 15,990 रुपयांचा हा फोन 14,990 रुपयांमध्ये मिळेल. तर Vivo Z1x चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट प्रीपेड पेमेंट सह विकत घेतल्यास 1,000 चा ऑफ मिळत आहे.

Vivo U10 चा 3 जीबी रॅम वेरिएंट्स क्रिसमस कॉर्निवल अंतर्गत 500 रुपये डिस्काउंट सह विकत घेता येईल. सेल अंतर्गत 8,990 रुपयांचा Vivo U10 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच 9,490 रुपयांचा Vivo U10 चा 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर Vivo U10 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंटचे प्रीपेड पेमेंट केल्यास हा वेरिएंट थेट 1,000 स्वस्त मिळत आहे.

Vivo Christmas Carnival संबंधित अजून एक खास बाब अशी कि या सेल अंतर्गत Vivo Z1 Pro, Vivo Z1x आणि Vivo U20 स्मार्टफोन विकत घेतल्यास कंपनी कडून मोबाईल यूजर्सना एक Selfie Stick पण फ्री मिळत आहे. तर Vivo V17, Vivo V17 Pro, Vivo V15 Pro, Vivo S1 आणि Vivo Y19 च्या खरेदीवर एचडीएफसी आणि आईसीआईसीआई बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. या सेल अंतर्गत Vivo ब्रँडच्या सर्व स्मार्टफोन 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआई वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला VIVO U20, फक्त 10,990 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launched-in-india-price-triple-rear-camera-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launched-in-india-price-triple-rear-camera-5000mah-battery/#respond Fri, 22 Nov 2019 12:25:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5849 VIVO U20 कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे जो 10,990 रुपयांच्या बेस किंमतीती 28 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला VIVO U20, फक्त 10,990 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या VIVO च्या डायमंड शेप रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन V17 ची चर्चा सगळीकडे आहे. दिवसांपासून प्रश्न विचारला जात आहे कि VIVO V17 भारतात कधी लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने V17 च्या लॉन्च तर कोणतीही माहिती दिली नाही पण VIVO V17 च्या आधी कंपनीने आज भारतीय बाजारात एक दुसरा स्मार्टफोन VIVO U20 लॉन्च केला आहे. VIVO U20 कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे जो 10,990 रुपयांच्या बेस किंमतीती 28 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Vivo U20 बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या वर ‘यू’ शेप थोडी रुंद नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. नॉचच्या वर स्पीकर देण्यात आला आहे. Vivo U20 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

Vivo U20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली ‘AI Triple Camera’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या रियर पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे तर खालच्या बाजूला Vivo ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. तर फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे, ज्याच्या उजव्या बाजूला 3.5एमएम जॅक आहे.

स्पेसिफिकेशन्स

Vivo U20 90.3 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनला आहे तसेच हा स्मार्टफोन 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने Vivo U20 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo U20 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.78 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सुपर वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या सुपर मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo U20 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo U20 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. Vivo U20 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा डिवाईस 5000एमएएच च्या बॅटरी सपोर्ट करतो.

किंमत व सेल

Vivo U20 चा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 6 जीबी + 64 जीबी वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Vivo U20 ग्रेडिएंट फिनिशन वाले ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये येत्या 28 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल. VIVO फॅन्स साठी कंपनीने लॉन्च ऑफर पण सादर केली आहे ज्या अंतर्गत Vivo U20 प्रीपेड पेमेंट सह विकत घेतल्यास फोन 1,000 रुपये स्वस्त मिळेल. म्हणजे 4 जीबी रॅम वेरिएंट 9,990 आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला VIVO U20, फक्त 10,990 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launched-in-india-price-triple-rear-camera-5000mah-battery/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला Vivo U20, 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-with-5000mah-battery-6gb-ram-snapdragon-675-launch-date-22-november-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-with-5000mah-battery-6gb-ram-snapdragon-675-launch-date-22-november-india/#respond Fri, 15 Nov 2019 13:02:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5793 Vivo U20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला Vivo U20, 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo भारतात आपल्या ‘यू सीरीज’ चा विस्तार करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे कि येत्या 22 नोव्हेंबरला Vivo चा हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल आणि हा फोन Vivo U20 नावाने लॉन्च केला जाईल. Vivo U20 कंपनीने गेल्या महिन्यात लॉन्च केलेल्या Vivo U10 चा अपग्रेडेड वर्जन असेल. Vivo U20 शॉपिंग साइट अमेझॉन वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनच्या लुक आणि डिजाईन सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा करण्यात आला आहे.

असा असेल लुक

Vivo U20 च्या अमेझॉन लिस्टिंग वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. Vivo U20 अमेझॉनच्या प्रोडक्ट पेज वर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्यात स्क्रीनच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo U20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली ‘AI Triple Camera’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या रियर पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे तर खालच्या बाजूला Vivo ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. Vivo U20 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

5,000एमएएच बॅटरी

अमेझॉन वर लाईव झालेल्या प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे कि Vivo U20 स्मार्टफोन 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाईल. सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीच्या दाव्यानुसार Vivo U20 फुल चार्ज केल्यानंतर 273 तासांचा स्टॅण्डबाय टाईम, 21 तासांचा इंस्टाग्राम ऍक्सेस, 17 तासांचा फेसबुक आणि 11 तासांचा यूट्यूब ऍक्सेस देऊ शकतो.

Vivo U20 स्पेसिफिकेशन्स

फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता अमेझॉन लिस्टिंग मध्ये समजले आहे कि Vivo U20 भारतात 6 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाईल. हा फोन UFS 2.1 स्टोरेज क्षमतेसह येईल. तसेच प्रोसेसिंग साठी Vivo U20 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल. आशा आहे कि Vivo U20 इंडियन मार्केट मध्ये एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Vivo U10

या सीरीज मधील स्मार्टफोन Vivo U10 बद्दल बोलायचे तर हा फोन भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जो 8,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. सोबत Vivo U10 च्या दुसऱ्या वेरिएंटची किंमत 9,990 रुपये आहे जो 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरीला सपोर्ट करतो. Vivo U10 च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Vivo U10 मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल सह येतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आहे. तसेच फोनची स्टोरेज को 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर सुपर वाइड ऍंगल लेंस आहे. फोन मध्ये तीसरा 2-मेगापिक्सलचा tertiary सेंसर आहे. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन पण 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला Vivo U20, 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-with-5000mah-battery-6gb-ram-snapdragon-675-launch-date-22-november-india/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह 22 नोव्हेंबरला लॉन्च होईल Vivo U20 https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launching-in-india-on-november-22-with-triple-rear-camera-and-snapdragon-675-chipset-amazon-listing-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launching-in-india-on-november-22-with-triple-rear-camera-and-snapdragon-675-chipset-amazon-listing-revealed/#respond Wed, 13 Nov 2019 10:52:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5761 कंपनी आपल्या यू सीरीज मध्ये या डिवाइसचा अपग्रेडेड वेरिएंट Vivo U20 लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह 22 नोव्हेंबरला लॉन्च होईल Vivo U20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने यावर्षी ऑक्टोबर मध्ये U10 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला होता. तसेच गेल्या महिन्यात हा फोन ओपन सेल साठी सादर केला गेला होता. आता कंपनी आपल्या यू सीरीज मध्ये या डिवाइसचा अपग्रेडेड वेरिएंट Vivo U20 लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे. ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वर Vivo U20 चा पोस्टर दिसला आहे.

या पोस्टर नुसार कंपनी 22 नोव्हेंबरला Vivo U20 लॉन्च करेल. टीजर इमेज नुसार U20 मध्ये वॉटर-ड्रॉप नॉच स्क्रीन आणि मागे ट्रिपल रियर कॅमेरा व फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. पाहून असे वाटते कि फोन रियर ग्रेडिएंट फिनिशन सह येईल.

तसेच स्पष्ट झाले आहे कि Vivo U20 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट असेल. याआधी वीवो ने आपले दोन स्मार्टफोन Vivo V15 Pro आणि V17 Pro मध्ये हा प्रोसेसर दिला होता. रॅम पाहता यात 6GB की रॅम आणि UFS 2.1 स्टोरेज असेल. तसेच Vivo U20 अजून एका मेमरी वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो.

Vivo U10 बद्दल बोलायचे तर कंपनीने हा डिवाइस तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. यात 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम सह 64 जीबी की इंटरनल स्टोरेज आहे.

फोन मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल सह येतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आहे. त्याचबरोबर फोनची स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलच्या सेकंडरी सेंसर सुपर वाइड अँगल लेंस सह आहे. तसेच फोन मध्ये तिसरा 2-मेगापिक्सलचा tertiary सेंसर आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह 22 नोव्हेंबरला लॉन्च होईल Vivo U20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launching-in-india-on-november-22-with-triple-rear-camera-and-snapdragon-675-chipset-amazon-listing-revealed/feed/ 0