सध्या VIVO च्या डायमंड शेप रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन V17 ची चर्चा सगळीकडे आहे. दिवसांपासून प्रश्न विचारला जात आहे कि VIVO V17 भारतात कधी लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने V17 च्या लॉन्च तर कोणतीही माहिती दिली नाही पण VIVO V17 च्या आधी कंपनीने आज भारतीय बाजारात एक दुसरा स्मार्टफोन VIVO U20 लॉन्च केला आहे. VIVO U20 कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे जो 10,990 रुपयांच्या बेस किंमतीती 28 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.
लुक व डिजाईन
Vivo U20 बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या वर ‘यू’ शेप थोडी रुंद नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. नॉचच्या वर स्पीकर देण्यात आला आहे. Vivo U20 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.
Vivo U20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली ‘AI Triple Camera’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या रियर पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे तर खालच्या बाजूला Vivo ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. तर फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे, ज्याच्या उजव्या बाजूला 3.5एमएम जॅक आहे.
स्पेसिफिकेशन्स
Vivo U20 90.3 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनला आहे तसेच हा स्मार्टफोन 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने Vivo U20 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo U20 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.78 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सुपर वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या सुपर मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo U20 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo U20 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. Vivo U20 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा डिवाईस 5000एमएएच च्या बॅटरी सपोर्ट करतो.
किंमत व सेल
Vivo U20 चा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 6 जीबी + 64 जीबी वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Vivo U20 ग्रेडिएंट फिनिशन वाले ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये येत्या 28 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल. VIVO फॅन्स साठी कंपनीने लॉन्च ऑफर पण सादर केली आहे ज्या अंतर्गत Vivo U20 प्रीपेड पेमेंट सह विकत घेतल्यास फोन 1,000 रुपये स्वस्त मिळेल. म्हणजे 4 जीबी रॅम वेरिएंट 9,990 आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.















